Saturday, May 10, 2025

विदेशमहत्वाची बातमी

हमाससोबतच्या युद्धादरम्यान इस्त्रायलच्या राष्ट्रपतींशी पंतप्रधान मोदींनी घेतली भेट

हमाससोबतच्या युद्धादरम्यान इस्त्रायलच्या राष्ट्रपतींशी पंतप्रधान मोदींनी घेतली भेट

नवी दिल्ली: इस्त्रायल आणि पॅलेस्टाईनची दहशतवादी संघटना हमास यांच्यातील युद्ध सुरू आहे. यातच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी इस्त्रायलचे राष्ट्रपती आयजॅक हर्जोग यांच्याशी शुक्रवारी भेट घेतली.


या दरम्यान, पंतप्रधान मोदींनी हर्जोग यांच्याशी दोन-राष्ट्र समाधान, बातचीत तसेच कूटनितीच्या माध्यमातून इस्त्रायल आणि पॅलेस्टाईन मुद्द्यावर लवकरात लवकर आणि स्थायी समाधानासाठी भारताच्या समर्थनावर जोर दिला. त्यांनी संयुक्त अरब अमिरातमध्ये सीओपी २८ विश्व जलवायू शिखर परिषदेव्यतिरिक्त हर्जोग यांच्याशी भेट घेतली.



काय झाली बातचीत?


परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ता अरिंदम बागची यांनी सोशल मीडियावर लिहिले की पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सात ऑक्टोबरला झालेल्या दहशतवादी हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या लोकांच्या मृ्त्यूबाबत संवेदना व्यक्त केली तसेच बंदी केलेल्यांच्या सुटकेचे स्वागत केले.


बागची म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी प्रभावित लोकांपर्यंत मानवीय मदत निरंतर आणि सुरक्षित पद्धतीने पोहोचण्यावर भर दिला. मोदी आणि हर्जोग यांनी या क्षेत्रात सुरू असलेल्या इस्त्रायल-हमास संघर्षावर विचारांचे आदान-प्रदान केले.


आयजॅक हर्जोग काय म्हणाले, सीओपी २८ परिषदेत मी जगभरातील अनेक नेत्यांशी बोललो. हमासने कशा पद्धतीने युद्धविराम करारांच्या खुलेपणाने उल्लंघन केल्याचे त्यांनी अनेक नेत्यांशी बोलताना सांगितले. तसेच बंदी केलेल्या सुटकेला आंतरराष्ट्रीय समुदायाच्या अजेंड्यामध्ये सर्वात वर ठेवण्याची मागणी पुन्हा पुन्हा बोलून दाखवले.


हमासने सात ऑक्टोबरला सकाळी इस्त्रायलवर अचानक रॉकेट हल्ला केला होता. या दरम्यान त्यांनी घुसखोरी केली होती. यानंतर इस्त्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी सांगितले होते की आम्ही युद्धात आहोत आणि ते जिंकू. अलजजिराच्या रिपोर्टनुसार या युद्धात पॅलेस्टाईनचे १५ हजारपेक्षा जास्त लोक मारले गेले आहेत. तर इस्त्रायलमधील १२०० लोकांचा जीव गेला आहे.

Comments
Add Comment