Animal Movie : 'अ‍ॅनिमल'मध्ये चमकला 'हा' प्रसिद्ध मराठी अभिनेता; तर अजय-अतुलचंही वाजलं गाणं!

  460

मुंबई : बॉलिवूडमध्ये (Bollywood) सध्या 'अ‍ॅनिमल' (Animal) चित्रपट धुमाकूळ घालत आहे. अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि नॅशनल क्रश अभिनेत्री रश्मिका मंदाना (Rashmika Mandanna), बॉबी देओल (Bobby Deol), अनिल कपूर (Anil Kapoor) यांच्या अभिनयाने सजलेल्या या अ‍ॅक्शनपटाची (Action Movie) गेल्या अनेक दिवसांपासून प्रेक्षकांमध्ये जबरदस्त चर्चा होती. प्रेक्षक आतुरतेने या सिनेमाची वाट पाहत होते. अखेर आज हा सिनेमा प्रदर्शित (Release) झाला आणि या सिनेमाला प्रेक्षकांचा भरभरुन प्रतिसाद मिळत आहे.


विशेष बाब म्हणजे या सिनेमात एक प्रसिद्ध मराठी अभिनेता झळकला आहे. बॉलिवूडच्या सिनेमांमध्ये मराठी कलाकारांनी छोट्याशा भूमिकेतूनही भाव खाऊन जाणं हे जणू समीकरणच झालं आहे. अनेक मराठी नट नट्या हिंदी सिनेसृष्टी गाजवत आहेत. आलिया भट्टच्या 'राझी' सिनेमात अमृता खानविलकरने महत्त्वाची भूमिका निभावली होती, तर क्रिती सॅननच्या 'मिमी' चित्रपटात सई ताम्हणकर भाव खाऊन गेली होती. तसंच शाहिद कपूरच्या 'कबीर सिंग'मध्ये वनिता खरात, शाहरुख खानच्या 'जवान'मध्ये गिरीजा ओक, रजनीकांत यांच्या 'जेलरम'ध्ये गिरीश कुलकर्णी यांच्या भूमिकेने लक्ष वेधून घेतलं होतं.


'अ‍ॅनिमल' चित्रपटातही एका मराठी कलाकाराने उत्तम भूमिका निभावत सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. तो म्हणजे हरहुन्नरी अभिनेता उपेंद्र लिमये (Upendra Limaye). उपेंद्रने या चित्रपटात एका आर्मी ऑफिसरची भूमिका निभावली आहे. उपेंद्रने आजवर जोगवा, जत्रा, मुळशी पॅटर्न, मी सिंधुताई सपकाळ, प्यार वाली लव्ह स्टोरी, सावरखेड एक गाव अशा अनेक सुपरहिट मराठी चित्रपटांत काम केलं आहे. जोगवामधील त्याच्या भूमिकेसाठी त्याला राष्ट्रीय पुरस्कारदेखील मिळाला आहे.



अजय-अतुलचंही वाजलं गाणं!


दुसरीकडे प्रसिद्ध संगीतकार अजय-अतुलचंही (Ajay Atul) चित्रपटात मोठं स्थान आहे. त्यांचे खास आभार मानण्यात आले आहेत. अजय अतुलचं 'डॉल्बीवाल्या बोलव माझ्या डीजेला' हे गाणं एका फाईट सिक्वेन्समध्ये ऐकू येतं. हे गाणं प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेताना दिसतं, त्यामुळे त्याचीही प्रचंड चर्चा आहे.

Comments
Add Comment

Amarnath Yatra 2025: अमरनाथ यात्रेबद्दल सरकारचा मोठा निर्णय, एक आठवड्याआधीच यात्रा थांबवली! 'हे' आहे कारण

खराब हवामान आणि यात्रा मार्गांची बिघडलेली अवस्था जबाबदार श्रीनगर : वार्षिक अमरनाथ यात्रा आज (दिनांक ३ )

देवाला भेटण्यासाठी ५ व्या मजल्यावरून मारली उडी, महिलेची आत्महत्या

हैदराबाद: तेलंगणाची राजधानी हैदराबादमध्ये एका धक्कादायक घटनेने खळबळ उडाली आहे. हिमायतनगर येथील ४३ वर्षीय पूजा

Operation Akhal: जम्मू-काश्मीरमधील कुलगाममध्ये ३ दिवसांपासून चकमक सुरू, आतापर्यंत ३ दहशतवादी ठार; २ दहशतवाद्यांना घेराव

कुलगाम: जम्मू-काश्मीरमधील कुलगाममध्ये ३ दिवसांपासून लष्कराचे ऑपरेशन अखल सुरू आहे. याद्वारे एके-४७ रायफल, एके

लष्करी अधिकाऱ्याकडून स्पाइसजेटच्या कर्मचाऱ्यांना लाथा-बुक्क्यांनी मारहाण, श्रीनगर विमानतळावर नेमके घडले काय?

एका कर्मचाऱ्याच्या पाठीच्या कण्याला फ्रॅक्चर आणि जबड्याला गंभीर दुखापत श्रीनगर: जम्मू काश्मीरमधील श्रीनगर

‘इस्राो’ची मंगळ तयारी

नवी दिल्ली : ३१ जुलै रोजी इस्रोने लडाखच्या त्सो कार या दुर्गम आणि मंगळ ग्रहासारख्या भासणाऱ्या प्रदेशात आपल्या

सैन्याच्या शौर्याचा काँग्रेसकडून सतत अपमान

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाराणसीत आरोप वाराणसी  : ऑपरेशन सिंदूर पूर्णपणे यशस्वी झाले आहे, पहलगामचे