IND vs AUS: ऑस्ट्रेलियाविरुद्ध चौथ्या टी-२० मध्ये खेळणार श्रेयस अय्यर, या युवा खेळाडूंची संघातून सुट्टी

मुंबई: ऑस्ट्रेलियाने(australia) ५ टी-२० सामन्यांची मालिकेतील तिसऱ्या सामन्यात टीम इंडियाला हरवले. या पद्धतीने त्यांनी मालिकेत २-१ असे पुनरागमन केले आहे. मालिकेतील उर्वरीत २ सामन्यांसाठी श्रेयस अय्यर भारतीय संघाचा भाग असणार आहे. मात्र श्रेयस अय्यरच्या पुनरागमनानंतर कोणत्या खेळाडूला बाहेर बसावे लागेल. खरंतर, या मालिकेत सलामीवीर यशस्वी जायसवाल आणि ऋतुराज गायकवाड यांनी आपला जलवा दाखवला आहे. मात्र तिलक वर्मा अपेक्षानुसार कामगिरी करू शकलेला नाही.



श्रेयस अय्यरच्या पुनरागमनानंतर तिलक वर्माची सुट्टी


असे मानले जात आहे श्रेयस अय्यर याच्या पुनरागमनानंतर प्लेईंग इलेव्हनमधून तिलक वर्माची सुट्टी होऊ शकते. म्हणजेच भारतीय संघाच्या टॉप ४मध्ये सलामीवीर यशस्वी जायसवाल यांच्याशिवाय ऋतुराज गायकवाड, इशान किशन आणि श्रेयस अय्यर असतील. तिलक वर्माचे प्लेईंग ११मधून बाहेर असणे निश्चित आहे.



रायपूरमध्ये खेळवला जाणार मालिकेतील चौथा सामना


भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील ५ टी-२० सामन्यांच्या मालिकेतील चौथा सामना १ डिसेंबरला रायपूरमध्ये खेळवला जाईल. यानंतर दोन्ही संघ मालिकेतील शेवटचा सामना ३ डिसेंबरला आमने सामने असतील. हा सामना बंगळुरूच्या एन चिन्नास्वामी स्टेडियममध्ये खेळवला जाईल. या मालिकेतील पहिल्या २ सामन्यात सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वात भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाला हरवले.

Comments
Add Comment

भारत – ऑस्ट्रेलिया T20 थरार सुरू: पहिला सामना २९ ऑक्टोबरला!

Ind vs AUS T20 : दिवाळीनंतर भारत आणि ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघांच्या चाहत्यांचे लक्ष आता T20 क्रिकेटवर वळले आहे. २९ ऑक्टोबर

राष्ट्रध्वजाचा अपमान टाळण्यासाठी विराट कोहलीने केलेल्या कृतीचे अनेकांनी केले कौतुक

सिडनी : रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्या जबरदस्त बॅटिंग भारतानं ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या तिसऱ्या सामन्यात

ऑस्ट्रेलियात पॅरा बॅडमिंटनमध्ये भारताला ११ पदके

नवी दिल्ली : ऑस्ट्रेलिया पॅरा बॅडमिंटन इंटरनॅशनल २०२५ मध्ये भारतीय पॅरा-बॅडमिंटन खेळाडूंनी शानदार कामगिरी करत

उपांत्य फेरीत भारतीय संघ खेळणार 'या' संघाविरूद्ध!

मुंबई: महिला एकदिवसीय विश्वचषक २०२५ अखेरच्या टप्प्यात येऊन पोहोचला असून उपांत्य फेरीची उत्सुकता क्रिकेट

'रो-को'ने ऑस्ट्रेलियाचा विजयरथ रोखला, रोहितचे शतक आणि विराटचे अर्धशतक; 'रो-को'ची ऐतिहासिक कामगिरी

सिडनी : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सिडनीच्या मैदानावर रंगलेला एकदिवसीय सामना भारताने नऊ गडी राखून जिंकला.

“विकसित भारत चॅलेंज ट्रॅक” मुंबईत युवा महोत्सव २७ ऑक्टोबरला

मुंबई : युवकांचा सर्वांगीण विकास, भारतीय संस्कृती आणि परंपरेचे जतन, सुप्त गुणांना प्रोत्साहन तसेच राष्ट्रीय