मुंबई: ऑस्ट्रेलियाविरुद्ध पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेनंतर भारतीय क्रिकेट संघ(indian cricket team) आता दक्षिण आफ्रिकेच्या मोठ्या दौऱ्यावर(south africa tour) जात आहे. आफ्रिकेत टीम इंडिया तीन टी-२०, तीन वनडे आणि दोन कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे. भारताच्या दक्षिण आफ्रिका दौऱ्याची सुरूवात १० डिसेंबरला होईल. येथे जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक…
भारतीय क्रिकेट मंडळाने आतापर्यंत दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा केलेली नाही. दरम्यान, आज घोषणा केली जाऊ शकते. रिपोर्टनुसार दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टी-२० मालिकेत त्या खेळाडूंना संधी मिळणार आहे ज्यांना विश्वचषक २०२४साठी निवडले जाऊ शकते.
भारताच्या दक्षिण आफ्रिका दौऱ्याबाबत बोलायचे झाल्यास याची सुरूवात तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेने होणार आहे. यानंतर तीन वनडे सामने खेळवले जातील आणि अखेरीस दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळवली जाणार आहे. टी-२० मालिकेतील पहिल सामना १० डिसेंबरला खेळवला जाणार आहे.
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिला टी-२० सामना १० डिसेंबरला डर्बनमध्ये खेळवला जाईल. यानंतर दुसरा टी-२० सामना १२ डिसेंबरला सेंट जॉर्ज पार्क आणि तिसरा व शेवटचा टी-२० सामना १४ डिसेंबरला जोहान्सबर्ग येथे खेळवला जाईल. यानंतर १७ डिसेंबरपासून वनडे मालिकेची सुरूवात होईल. पहिला वनडे सामना जोहान्सबर्ग येथे तर दुसरा वनडे सामना १९ डिसेंबरला सेंट जॉर्ज पार्क आणि तिसरा व शेवटचा वनडे सामना २१ डिसेंबरला पार्लमध्ये खेळवला जाईल. यानंतर २६ डिसेंबरला पहिला बॉक्सिंड डे कसोटी सामना सेंच्युरियनमध्ये खेळवला जाईल. तर दुसऱ्या कसोटी सामन्याची सुरूवात नव्या वर्षात ३ जानेवारीला होईल.
भारताच्या दक्षिण आफ्रिका दौऱ्याचे वेळापत्रक
पहिला टी२० – १० डिसेंबर
दुसरा टी२० – १२ डिसेंबर
तिसरा टी२० – १४ डिसेंबर
पहिली वनडे – १७ डिसेंबर
दुसरी वनडे – १९ डिसेंबर
तिसरी वनडे – २१ डिसेंबर
पहिली कसोटी – २६-३० डिसेंबर
दुसरी कसोटी – ३-७ जानेवारी