Tuesday, May 13, 2025

महाराष्ट्रताज्या घडामोडी

Income Tax Department raid : बिल्डर लॉबी हादरली! आयटीच्या २०० अधिकाऱ्यांची एकाच वेळी तब्बल ११ ठिकाणी छापेमारी

Income Tax Department raid : बिल्डर लॉबी हादरली! आयटीच्या २०० अधिकाऱ्यांची एकाच वेळी तब्बल ११ ठिकाणी छापेमारी

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगरमध्ये (Chhatrapati Sambhajinagar) आज पहाटेपासून आयकर विभागाने (Income Tax Department) छापेमारीला (Raids) सुरुवात केली आहे. शहरातील तब्बल ११ ठिकाणी एकाच वेळी छोपमारी करण्यात आली आहे. अनेक बड्या व्यावसायिकांच्या कार्यालयामध्ये आणि घरावर ही छापेमारी सुरु आहे. या कारवाईसाठी आयकर विभागाने २०० अधिकाऱ्यांची पथकं नियुक्त करुन धाड टाकल्याची माहिती आहे.


छत्रपती संभाजीनगर शहरात आज सकाळी सहा वाजेच्या सुमारास आयकर विभागाने अचानक अकरा ठिकाणी एकाचवेळी धाडी टाकल्या. शहरातील बड्या व्यावसायिकांवर ही कारवाई करण्यात येत असल्याने शहरात एकच खळबळ उडाली आहे.


कर चुकवल्याप्रकरणी व्यावसायिकांवर कारवाई केल्याचं बोललं जात आहे. धाड पडलेले लोक बांधकाम व्यावसायिक असून अद्याप त्यांच्याबद्दल अधिकृत माहिती मिळू शकलेली नाही. विशेष म्हणजे पुढील दोन ते तीन दिवस ही कारवाई सुरू राहणार असल्याची माहिती देखील समोर येत आहे.

Comments
Add Comment