Wednesday, April 23, 2025
Homeताज्या घडामोडीपायाखालची वाळू सरकल्याने आता खालच्या पातळीवरील भाषा; मुख्यमंत्र्यांची टीका

पायाखालची वाळू सरकल्याने आता खालच्या पातळीवरील भाषा; मुख्यमंत्र्यांची टीका

मुंबई : आम्ही बाळासाहेबांचे शिवसैनिक आहोत, अशा प्रकारची भाषा वापरणं हे आपल्या संस्कृतीमध्ये नाही, पण उद्धव ठाकरेंच्या पायाखालची वाळू सरकल्याने त्यांनी आता खालच्या भाषेत टीका सुरू केल्याचा आरोप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला. ठाकरे गटाचे दत्ता दळवींनी मुख्यमंत्र्यावर टीका करताना आक्षेपार्ह भाषा वापरली होती. त्यावर मुख्यमंत्र्यांनी प्रतिक्रिया दिली. ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण दिले जाईल असंही ते म्हणाले.

खालच्या पातळीवर भाषा वापरणे हे आमच्या संस्कृतीमध्ये नाही आणि या महाराष्ट्रातील जनता सुज्ञ आहे. महाराष्ट्राला एक संस्कृती आहे, परंपरा आहे. जे घरात बसून काम करत होते, फेसबुक लाईव्हवरून काम करत होते त्यांनी माझ्यासारख्या मुख्यमंत्री कार्यकर्त्याला अशा प्रकारची शिकवण देणं योग्य नाही. त्यांच्या कार्यपद्धतीबद्दल शरद पवार साहेबांनी देखील आपल्या पुस्तकांमध्ये लिहिलेलं आहे. त्यामुळे मी जास्त बोलू इच्छित नाही.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, हे सरकार काम करणार आहे, शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहणार आहे. घोषणा करून फसवणार नाही. शेतकऱ्यांना जे रेगुलर कर्ज फेड करत होते, पन्नास हजार इन्सेंटिव्ह देण्याचा निर्णय मागच्या सरकारने घेतला. पण पैसे देण्याचे काम आम्ही केलं. दोन हेक्टरचे तीन हेक्टर करण्याचा निर्णय आम्ही घेतला. एनडीआरएफच्या नियमाप्रमाणे दुप्पट देण्याचा निर्णय आम्ही घेतला. सततच्या पावसामुळे होणारे नुकसान हे या नुकसानीमध्ये धरण्याचा निर्णय आम्ही घेतला. अशा प्रकारचे अनेक निर्णय सरकारने घेतले. एक रुपयामध्ये पीक विमा देण्याचा निर्णय आपल्या सरकारने घेतला आहे. त्याचबरोबर केंद्र सरकारचे सहा हजार रुपये शेतकऱ्यांना देण्याचा निर्णय जो आहे, त्याच्यात सहा हजार रुपये आणखी राज्याचे टाकण्याचा निर्णय आपल्या सरकारने घेतला. त्यामुळे शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहणारं हे सरकार आहे. शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणारं सरकार आमचं नाही. फक्त तोंडाला पाणी पुसणारं सरकार नाही. ते पूर्वीचे सरकार होतं आणि हे शेतकऱ्यांना देखील माहिती आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -