Friday, October 4, 2024
Homeक्रीडाVirat kohli: वनडे आणि टी२० फॉरमॅटमधून विराटला हवाय अनिश्चितकालीन ब्रेक

Virat kohli: वनडे आणि टी२० फॉरमॅटमधून विराटला हवाय अनिश्चितकालीन ब्रेक

मुंबई: विराट कोहलीशी(virat kohli) संबंधित एक मोठी बातमी समोर आली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार विराट कोहलीने बीसीसीआयला सांगितले की त्याला वनडे आणि टी-२० फॉरमॅटमधून अनिश्चितकाळासाठी ब्रेक पाहिजे. म्हणजेच त्याला वनडे आणि टी-२० फॉरमॅटमध्ये खेळायचे नाहीत. दरम्यान, वनडे आणि टी-२० फॉरमॅटबाबत संघाचा नियमित कर्णधार रोहित शर्माचे काय मत आहे हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

विराट कोहलीला वनडे आणि टी-२० फॉरमॅटमध्ये का खेळायचे नाही?

इंडियन्स एक्सप्रेसच्या बातमीनुसार,बीसीसीआयने सूत्रांनी सांगितले की विराट कोहलीला कसोटी फॉरमॅटवर लक्ष द्यायचे आहे. याच कारणामुळे त्याला वनडे आणि टी-२० फॉरमॅटमध्ये खेळायचे नाही. मीडिया रिपोर्ट्सनुसार विराट कोहलीने बीसीसीआयला सांगितले की तो मर्यादित षटकांच्या क्रिकेटसाठी उपलब्ध नाही.

सोबतच तो कधीपर्यंत खेळणार नाही याबाबत काहीच स्पष्ट झालेले नाही. भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ३ सामन्यांची टी-२० मालिका खेळणार आहे. या मालिकेसाठी विराट कोहली संघात असणार नाही. यानंतर भारतीय संघ अफगाणिस्तानविरुद्ध टी-२० मालिका खेळणार आहे.

रोहित शर्मा टी-२० फॉरमॅटमध्ये दिसणार?

भारतीय संघाचा नियमित कर्णधार रोहित शर्मा वनडे आणि टी-२० फॉरमॅटसाठी उपलब्ध असणार की नाही हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. रोहित शर्मा आणि विराट कोहली शेवटचा भारतासाठी टी-२० फॉरमॅटमध्ये वर्षभरापूर्वी खेळला होता. दोन्ही खेळाडू टी-२० विश्वचषक २०२२मध्ये दिसले होते. मात्र यानंतर दोघेही भारतासाठी टी२०मध्ये खेळलेले नाहीत.

गेल्या काही दिवसांत विश्वचषकात रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी शानदार फलंदाजीचा नजराणा सादर केला होता. साधारण ७ महिन्यानंतर टी-२० विश्वचषकाचे आयोजन होत आहे. असे मानले जात आहे की रोहित शर्मा टी-२० विश्वचषकात टीम इंडियाचे नेतृत्व करू शकतो मात्र विराट कोहलीच्या खेळण्याबाबत साशंकता आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -