Pooja Sawant engaged : पूजा सावंतने केले हार्टब्रेक; जुळला मनाचा धागा! कोण आहे 'तो'?

जोडीदारासोबत फोटो शेअर करत पूजा सावंतने केली मोठी घोषणा


मुंबई : पूजा सावंत (Pooja Sawant) ही मराठी सिनेसृष्टीत सुपरहिट चित्रपट (Marathi movies) देणारी एक अभिनेत्री (Actress) आहे. तिचे लांबसडक केस आणि देखण्या रुपामुळे ती अनेक तरुणांची क्रश बनली आहे. मात्र, तिच्या नव्या घोषणेमुळे अनेकांचा हार्टब्रेक (Heartbreak) झाला आहे. पूजाने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन (Social Media account) आपल्या जोडीदारासोबतचा फोटो शेअर करत सर्वांना धक्का दिला आहे. तर अनेक जणांनी तिच्या आयुष्यातील या नव्या पर्वासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.


पूजाने आपल्या सोशल मीडियावर जोडीदारासोबतचे तीन फोटोज शेअर करत चाहत्यांना ही आनंदाची बातमी दिली आहे. पहिल्या फोटोत समुद्रकिनार्‍याजवळ पूजा आणि तिचा जोडीदार रोमँटिक पद्धतीने एकमेकांना मिठी मारुन उभे आहेत. 'खास व्यक्तीसोबत नव्या अध्यायासाठी माझ्या मनाची कवाडं खोलत आहे' (opening my heart to new chapter with my special one) असं कॅप्शन तिने या फोटोला दिलं आहे.





दुसर्‍या फोटोत पूजा आणि तिचा जोडीदार स्विमिंग पूलजवळ एकमेकांना मिठी मारुन उभे आहेत. 'हा फोटो प्रेमाच्या जादूसाठी आणि आमच्या पुढील सुंदर प्रवासासाठी' (Here's to the magic of love and to our beautiful journey ahead) असं कॅप्शन पूजाने दिलं आहे. तर तिसर्‍या फोटोत आम्ही एकमेकांसोबत बांधले गेले आहोत (We are engaged), अशी घोषणा पूजाने केली आहे. अनेकांनी या पोस्टवर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.





काही दिवसांपूर्वी भार्गवी चिरमुलेला दिलेल्या मुलाखतीत लग्नाबद्दल बोलताना पूजा म्हणाली होती की,"माझा लिव्ह इनपेक्षा लग्नसंस्थेवर विश्वास आहे. मला लग्न करायचं आहे. आयुष्यात स्थिरता हवी आहे. त्यामुळे ज्याच्यासोबत उरलेलं आयुष्य आनंदात घालवू शकते असा पार्टनर हवा आहे". त्यामुळे या पार्टनरची सर्वांनाच उत्सुकता लागून राहिली होती. तिने जोडीदाराची झलक दाखवली असली तरी त्याचा चेहरा मात्र स्पष्ट दिसत नाही. त्यामुळे पूजाचा जोडीदार नक्की कोण? असा प्रश्न नेटकऱ्यांना पडला आहे.





पूजाचा दगडी चाळ (Dagadi Chawl) हा सिनेमा प्रचंड गाजला. यातील 'मन धागा धागा' (Man Dhaga Dhaga) हे गाणं तरुणांच्या विशेष आवडीचं आहे. सोबतच पूजाने क्षणभर विश्रांती, पोस्टर बॉइज, नीळकंठ मास्तर, भेटली तू पुन्हा, बोनस, लपाछपी अशा अनेक गाजलेल्या सिनेमांत काम केलं आहे. आपल्या उत्तम अभिनयाने आणि नैसर्गिक सौंदर्याने तिने स्वतःचा वेगळा असा चाहतावर्ग निर्माण केला आहे. सोबतच ती नृत्यांगणादेखील आहे. पूजा आता आपल्या जोडीदारासोबत नव्या आयुष्याची सुरुवात करणार आहे.

Comments
Add Comment

BMC News : वरळी, प्रभादेवी आणि लोअर परळ मधील नागरिकांना ३ ते ४ दिवस कचऱ्याची राहणार समस्या

मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबई महानगरपालिकेच्या ‘जी दक्षिण’ प्रशासकीय विभागात कचरा संकलन आणि वाहतुकीसाठी

Sarsanghchalak Dr. Mohan Bhagwat : 'जेन-झी' आणि 'जेन-अल्फा' जुन्या पिढीपेक्षा अधिक प्रामाणिक!

- सरसंघचालक डॉ. मोहन भागवत; लोकशाहीत आंदोलनसुद्धा संवादाचेच एक माध्यम मुंबई : "भारताच्या शिक्षणव्यवस्थेत अजूनही

Air India New CEO : टाटांचा मास्टरस्ट्रोक! पाकिस्तानकडे जाणारे टेवोल्डे गेब्रेमरियम आता एअर इंडियाचे नवे बॉस

मुंबई : टाटा समूहाच्या मालकीच्या एअर इंडियाला अखेर नवे नेतृत्व मिळाले आहे. इथियोपियन एअरलाइन्स ग्रुपचे माजी

Mohan Bhagwat : सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांचा 'जेन-झी'शी संवाद

Mumbai : शिक्षणाच्या क्षेत्रात अनेक गोष्टी करता येऊ शकतात. मात्र हे सर्व करताना समाजात फूट पाडण्यासाठी नव्हे, तर

Mahalaxmi Dhobi Ghat PNG Gas Connection : महालक्ष्मी धोबीघाट धूरमुक्त होणार! लाकूड-कोळशाला रामराम, १५० पीएनजी गॅस जोडण्यांमुळे प्रदूषणमुक्तीच्या दिशेने पाऊल

मुंबई : मुंबईची ऐतिहासिक आणि जागतिक ओळख असलेल्या महालक्ष्मी धोबीघाटाने (Mahalaxmi Dhobighath) आता वायू प्रदूषणावर मात

Chandrashekhar Bawankule : संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाची १,०५३ एकर वनजमीन सुरक्षित! महसूलमंत्री बावनकुळेंच्या निर्णयाने वन विभागाचा हक्क कायम

मुंबई : संजय गांधी राष्ट्रीय उद्यानालगतच्या (Sanjay Gandhi National Park forest) महत्त्वाच्या वनक्षेत्राबाबत राज्य सरकारने मोठा