Unseasonal Rain : अवकाळीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बोलावली तातडीची बैठक

Share

केंद्राकडे मदतीसाठी पाठवणार प्रस्ताव

मुंबई : गेल्या दोन दिवसांत राज्याच्या विविध भागांत पडलेल्या अवकाळी पावसाचा (Unseasonal Rain) तडाखा आणि गारपिटीमुळे शेतातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. काही भागात गारांसह पाऊस झाल्यामुळे शेती पिकांसह फळबागांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे. अवकाळीच्या आलेल्या या संकटामुळे शेतकऱ्यांच्या अश्रूंचा बांध पुन्हा एकदा फुटला आहे. राज्यातील ही बिकट परिस्थिती लक्षात घेऊन नुकसान झालेल्या भागांची माहिती घेण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी तातडीची बैठक बोलावली आहे.

अवकाळीच्या पार्श्वभूमीवर आज संध्याकाळी मुंबईत उपमुख्यमंत्री अजित पवार आणि कृषिमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्या उपस्थितीत राज्यातील नुकसानाचा आढावा घेतला जाणार आहे. पुनर्वसन मंत्री अनिल पाटील (Anil Patil) देखील उपस्थित राहणार असल्याची माहिती आहे. त्याचबरोबर केंद्राकडून अवकाळी आणि गारपिटीने फटका बसलेल्या शेतीला मदत मिळवण्यासाठी मंत्रिमंडळ बैठकीनंतर प्रस्ताव पाठवण्यात येणार आहे.

राज्य सरकारकडून सध्या केंद्र सरकारकडे चाळीस दुष्काळी तालुक्यांसाठी २६०० कोटींच्या मदतीची मागणी केली आहे. पुढील दहा दिवसात राज्यातील नुकसान झालेल्या भागाचे पंचनामे तयार करून अहवाल सादर करण्याचे सरकारचे जिल्हाधिकाऱ्यांना आदेश देण्यात आले आहेत. नुकसान झालेल्या भागाचा अहवाल प्राप्त होताच केंद्राकडे मदतीसाठी प्रस्ताव पाठवण्यात येणार आहे.

Recent Posts

Dharmaveer 2 : ज्याच्या घरातील स्त्री दुःखी त्याची बरबादी नक्की!

मराठीसह हिंदीत 'धर्मवीर २'चा धगधगता टीझर आऊट मुंबई : कट्टर हिंदुत्ववादी आणि शिवसैनिक धर्मवीर आनंद…

42 mins ago

Assam Rain : आसाममध्ये पावसाचा हाहाकार! पुरामुळे ५२ लोकांनी गमावले प्राण

८ वर्षांचा मुलगा बेपत्ता; वडील शोधत असताना मुलाची केवळ चप्पल मिळाली दिसपूर : सध्या देशभरात…

2 hours ago

Raigad Accident : भीषण अपघात! दोन एसटी बसेसची समोरासमोर धडक

१५ ते २० प्रवासी जखमी, २ जण गंभीर रायगड : काही दिवसांपूर्वी पोलादपूर (Poladpur) येथे…

2 hours ago

PMPML Bus : पुणेकरांसाठी खुशखबर! आता घरबसल्या पीएमपीएमएलचे तिकीट काढता येणार

पासही काढू शकता ऑनलाईन पुणे : पुणेकरांसाठी एक आनंदाची बातमी (Pune news) समोर आली आहे.…

3 hours ago

Shahapur Rain : शहापूरात रात्रभर पावसाची जोर ‘धार’!

भारंगी नदीला पूर, गाड्या वाहून गेल्या, वाहतूकही ठप्प खर्डी : जुलै महिन्याला सुरुवात होताच पावसाने…

3 hours ago

Indian Army : जम्मू-काश्मीरमध्ये चार दहशतवाद्यांचा खात्मा! तर दोन जवान शहीद

अकोल्यातील जवानाला २४ व्या वर्षी आले वीरमरण अकोला : जम्मू-काश्मीरच्या (Jammu Kashmir) कुलगाम जिल्ह्यात काल…

3 hours ago