तिरूअनंतपुरम: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसरा टी-२० सामना तिरूअनंतपुरम येथे खेळवण्यात आला होता. या सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाला पुन्हा हरवले. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने केवळ टॉस जिंकला याशिवाय त्यांना काही करता आले नाही. भारताला त्यांनी पहिल्यांदा फलंदाजीसाठी निमंत्रित केले आणि भारताने टी-२० फॉरमॅटमधील सर्वाधिक स्कोर बनवला.
भारताने २० षटकांत ४ बाद २३५ धावा केल्या तर ऑस्ट्रेलियाच्या संघाला केवळ १९१ धावा करता आल्याय. या सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाला ४४ धावांनी हरवले. या सामन्यात प्लेयर ऑफ दी मॅचचा पुरस्कार यशस्वी जायसवालला देण्यात आला. जायसवालने केवळ २५ बॉलमध्ये ५३ धावांची खेळी केली. यात ९ चौकार आणि २ षटकारांचा समावेश होता.
जायसवाल ऋतुराजला का म्हणाला सॉरी
यशस्वीने प्लेयर ऑफ दी मॅचचा पुरस्कार मिळवल्यानंतर पहिल्या टी-२० मध्ये केलेली आपली चूक स्वीकारली. यानंतर त्याने लगेचच ऋतुराज गायकवाडला सॉरी म्हटले. विशाखापट्टणम येथे खेळवण्यात आलेल्या पहिल्या टी-२० सामन्यात यशस्वी जायसवाने एक शॉट खेळला आणि वेगाने दोन धावा घेण्यासाठी धावला. पहिली धाव पूर्ण केल्यानंतर त्याने विश्वासाने दुसऱ्या धावेसाठी ऋतुराजला बोलावले आणि अर्ध्या रस्त्यात पोहोचलाही. ऋतुराजनेही त्याच्या कॉलवर विश्वास ठेवला आणि अर्ध्या पिचपर्यंत आला मात्र त्यानंतर यशस्वीला वाटले की त्याला ही धाव पूर्ण करता येणार नाही म्हणून तो मागे परतला. मात्र ऋतुराजकडे कोणतीच संधी नव्हता. त्यामुळे एकही बॉल न खेळता त्याला पॅव्हेलियनमध्ये परतावे लागले.
यशस्वीने दुसऱ्या सामन्यात प्लेयर ऑफ दी मॅचचा पुरस्कार मिळवल्यानंर सांगितले की, मी सध्या शिकत आहे. गेल्या सामन्यात जे घडले ती माझी चूक होकी. मी ऋतुराजला सॉरी म्हणालो होतो. मी माझी चूक सुधारली. ऋतु मोठा भाऊ चांगला आणि भला माणूस आहे. मी माझ्या फिटनेसवर काम केले आहे. मी आपले शॉट्स डेव्हलप करण्याचा प्रयत्न करत आहे.