Saturday, April 19, 2025
Homeक्रीडाIND Vs AUS 2nd T20 : भारताचा धावांचा डोंगर, ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांना झोडले

IND Vs AUS 2nd T20 : भारताचा धावांचा डोंगर, ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांना झोडले

मुंबई: भारतीय संघ(team india) आपल्या घरात ऑस्ट्रेलियाविरुद्ध ५ सामन्यांची टी-२० मालिका खेळत आहे. आज भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसरा टी-२० सामना खेळवला जात आहे. हा सामना तिरूअनंतपुरममध्ये खेळवला जात आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा कर्णधार मॅथ्यू वेडने टॉस जिंकत पहिल्यांदा गोलंदाजीचा निर्णय घेतला. या सामन्यात भारताने धावांचा डोंगर उभा केला आहे. भारताने पहिल्यांदा गोलंदाजी करताना ४ बाद २३५ धावांचा मोठा डोंगर उभा केला आहे.

भारताच्या पहिल्या तीन जणांनी अर्धशतके ठोकली. गेल्या सामन्यात भारताचे सलामीवीर यशस्वी जयसवाल आणि ऋतुराज गायकवाड मोठी खेळी करण्यात अपयशी ठरले होते. मात्र या दोघांनी या सामन्यात दमदार अर्धशतके ठोकली. यशस्वी जयसवालने ५३ धावांची खेळी केली. तर ऋतुराज गायकवाडने ५८ धावा केल्या.

इशान किशनने या सामन्यात ५२ धावा तडकावल्या. या सामन्यात कर्णधार सूर्यकुमार यादवला मोठी खेळी करता आली नाही. सूर्याने १९ धावा केल्या. तर रिंकू सिंहने या सामन्यात नाबाद ३१ धावा केल्या. भारताच्या फलंदाजांनी ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांची पुरती धुलाई केली.

ऑस्ट्रेलियाच्या नॅथन एलिसने तीन विकेट मिळवल्या. तर मार्कस स्टॉयनिसला एक विकेट मिळवण्यात यश मिळाले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -