IPL: हार्दिक पांड्या मुंबईचा कर्णधार, तर 'हा' खेळाडु सांभाळेल गुजरातची धुरा...

हार्दिक पांड्या गुजरात टायटन्समधून मुंबई इंडियन्समध्ये आल्याच्या चर्चांना उधाणं आलं आहे. अश्यातचं हार्दिक पांड्यानंतर शुभमन गिल हा गुजरात टायटन्स पुढचा कर्णधार असा अंदाज वर्तवला जात आहे. गुजरात संघात शुभमन गिलने अतिशय महत्त्वाची भूमिका बजावली आहे. गेल्या मोसमात गिलने आपल्या बॅटने खूप धावा केल्या आहेत. या विश्वचषकात गिलही भारतीय संघाचा एक भाग होता. अशा परिस्थितीत पांड्या गेल्यानंतर कर्णधारपद शुभमन गिलकडे सोपवले जाईल, अशी चर्चा सुरु आहे.


आता गुजरात टायटन्सनेही पुढचा कर्णधार शुभमन गिल असेल असे संकेत दिले आहेत. गुजरातने पोस्टद्वारे संकेत देत हे स्पष्ट केले आहे. गुजरात टायटन्सने आपल्या ट्विटर हँडलवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये शुभमन गिलचा एक व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे.





या व्हिडिओला कॅप्शन दिले आहे की, 'जर टीम चांगली कामगिरी करत असेल आणि तुम्ही चांगली कामगिरी करत नसाल, तरीही तुम्ही या टीमला पुढे नेऊ शकता आणि तुम्ही पुढे जाऊ शकता. हार्दिक पांड्या गुजरातमधून मुंबईत आल्याच्या बातम्या चर्चेत असतानाच ही पोस्ट आली आहे

Comments
Add Comment

क्रिकेटच्या 'थाला'ला हाऊसिंग बोर्डाची नोटीस; केवळ १५ दिवसांची मुदत

क्रिकेटचा थाला अशी ओळख असणाऱ्या भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीला झारखंड राज्य गृहनिर्माण

वेस्ट इंडिज-भारताच्या सामन्याचा पावसावर ठरणार निकाल

रन रेटवर ठरणार उपांत्य फेरीचा दावेदार नवी दिल्ली : टी-२० वर्ल्ड कपमधील सुपर ८ फेरीचे सामने अंतिम टप्प्यात असून

अर्शदीपने मोडला बोल्टचा विक्रम

बुमराहलाही टाकले मागे नवी दिल्ली : भारतीय संघाचा डावखुरा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगने टी-२० विश्वचषकात आपल्या

अखेरच्या षटकापर्यंत रंगलेल्या सामन्यात फटकेबाजी करत इंग्लंडने मारली बाजी

कोलंबो : आयसीसी मेन्स टी ट्वेंटी वर्ल्डकप २०२६ च्या सुपर एट फेरीतीली इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड हा सामना

IPL 2026 : आयपीएल कधी सुरू होणार ? हाती आली महत्त्वाची माहिती

मुंबई : मिनी ऑक्शन झाला त्यावेळी आयपीएल २०२६ ही स्पर्धा २६ मार्च २०२६ पासून सुरू होईल असे सूतोवाच बीसीसीआयने केले

मुंबईत कबड्डी स्पर्धांसाठी मैदाने होणार अल्प दरात उपलब्ध

महापालिका सभागृहात ठराव मंजूर मुंबई (विशेष प्रतिनिधी) : कबड्डी हा भारतीय सांघिक खेळ असून कबड्डीची पंढरी म्हणून