हार्दिक पांड्या गुजरात टायटन्समधून मुंबई इंडियन्समध्ये आल्याच्या चर्चांना उधाणं आलं आहे. अश्यातचं हार्दिक पांड्यानंतर शुभमन गिल हा गुजरात टायटन्स पुढचा कर्णधार असा अंदाज वर्तवला जात आहे. गुजरात संघात शुभमन गिलने अतिशय महत्त्वाची भूमिका बजावली आहे. गेल्या मोसमात गिलने आपल्या बॅटने खूप धावा केल्या आहेत. या विश्वचषकात गिलही भारतीय संघाचा एक भाग होता. अशा परिस्थितीत पांड्या गेल्यानंतर कर्णधारपद शुभमन गिलकडे सोपवले जाईल, अशी चर्चा सुरु आहे.
आता गुजरात टायटन्सनेही पुढचा कर्णधार शुभमन गिल असेल असे संकेत दिले आहेत. गुजरातने पोस्टद्वारे संकेत देत हे स्पष्ट केले आहे. गुजरात टायटन्सने आपल्या ट्विटर हँडलवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये शुभमन गिलचा एक व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे.
“If the team is doing well and you’re not doing well, you still can take it and move on…” 🤩
𝙏𝙝𝙖𝙩’𝙨 𝙩𝙝𝙚 𝙨𝙥𝙞𝙧𝙞𝙩 𝙤𝙛 𝙩𝙝𝙚 𝙂𝙪𝙟𝙖𝙧𝙖𝙩 𝙏𝙞𝙩𝙖𝙣𝙨… #AavaDe pic.twitter.com/ZYcNwu5pfr
— Gujarat Titans (@gujarat_titans) November 25, 2023
या व्हिडिओला कॅप्शन दिले आहे की, ‘जर टीम चांगली कामगिरी करत असेल आणि तुम्ही चांगली कामगिरी करत नसाल, तरीही तुम्ही या टीमला पुढे नेऊ शकता आणि तुम्ही पुढे जाऊ शकता. हार्दिक पांड्या गुजरातमधून मुंबईत आल्याच्या बातम्या चर्चेत असतानाच ही पोस्ट आली आहे