अभ्युदय बँकेचे संचालक मंडळ बरखास्त, प्रशासक नियुक्त

  451

मुंबई : राज्यातील सहकारी क्षेत्रातील महत्त्वाची बँक असलेल्या अभ्युदय को-ऑपरेटिव्ह बॅंकेचे संचालक मंडळ भारतीय रिझर्व्ह बँकेने बरखास्त केले आहे. बॅंकेच्या संचालक मंडळाला १२ महिन्यांच्या कालावधीसाठी हटवण्यात आले आहे. संचालक मंडळाकडून खराब प्रशासन मानकांमुळे ही कारवाई करणे आवश्यक असल्याचं आरबीआयने सांगितले आहे. रिझर्व्ह बॅंकेकडून बॅंकेच्या कारभाराचे व्यवस्थापन करण्यासाठी स्टेट बँक ऑफ इंडियाचे माजी मुख्य महाव्यवस्थापक सत्य प्रकाश पाठक यांची “प्रशासक” म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.


प्रशासकासोबतच आरबीआयकडून सल्लागारांची समिती देखील नियुक्त करण्यात आलेली आहे. प्रशासकांच्या मदतीसाठी असलेल्या सल्लागार समितीमध्ये स्टेट बँकेचे माजी महाव्यवस्थापक व्यंकटेश हेगडे, चार्टर्ड अकाउंटंट महेंद्र छाजेड आणि कॉसमॉस को-ऑपरेटिव्ह बँकेचे माजी व्यवस्थापकीय संचालक सुहास गोखले यांचा समावेश आहे.


या सहकारी बँकेत मोठ्या प्रमाणावर निम्न-मध्यमवर्गीयांची खाती आहेत. बँकेवर कारवाई झाल्याने ग्राहकांमध्ये सध्या चिंतेचे वातावरण आहे. अभ्युदय को-ऑपरेटिव्ह बँकेच्या संकेतस्थळावर उपलब्ध माहितीनुसार 31 मार्च 2020 पर्यंत, बँकेकडे 17.30 लाखांहून अधिक ठेवीदार आहेत आणि एकूण ठेवी रु. 10,838 कोटी आहेत. बँकेचे भांडवल पर्याप्तता गुणोत्तर 12.60 टक्के होते. बँकेच्या संकेतस्थळावर 2020 नंतरची माहिती सार्वजनिकपणे उपलब्ध नाही.


दरम्यान, आरबीआयकडून बँकेवर कोणतेही व्यावसायिक निर्बंध घातलेले नाहीत. त्यामुळे बँकेचे व्यवहार सुरळीत राहणार आहेत. त्यामुळे ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे. प्रशासकामुळे बँकेच्या कामाकाजावर कोणत्याही प्रकारचा परिणाम होणार नसल्याचे आरबीआयने स्पष्ट केले आहे.

Comments
Add Comment

ग्रामीण भागातील प्रत्येक रस्त्याला विशिष्ट क्रमांक

महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा महत्त्वाकांक्षी निर्णय ग्रामीण रस्ते होणार अतिक्रमणमुक्त ! मुंबई :

लालबागच्या राजाचे VIP दर्शन वादाच्या भोवऱ्यात! जनसामान्यांवर अन्याय होत असल्याचा आरोप

मुंबई: संपूर्ण राज्यात गणेशोत्सवाची धामधूम सुरू असून, राज्यभरातून अनेक लोकं या दिवसात मुंबईत लालबागच्या

आता आणखी किती दिवस?' ऋषभ पंतने सोशल मीडियावर शेअर केली ही पोस्ट

मुंबई : भारतीय क्रिकेट संघाचा स्टार विकेटकीपर फलंदाज ऋषभ पंतने आपल्या दुखापतीबद्दल एक मोठी अपडेट दिली आहे.

केंद्रीय मंत्री जे. पी. नड्डा लालबाग राजाच्या दर्शनाला : देशाच्या प्रगतीसाठी केली प्रार्थना

मुंबई : केंद्रीय मंत्री जे. पी. नड्डा यांनी रविवारी मुंबईतल्या गणेश मंडळांना भेट दिली . मुख्यमंत्री देवेंद्र

जरांगे आरक्षण मिळेपर्यंत पाणी पण बंद करणार

मुंबई : ओबीसी कोट्यातून सरसकट मराठा समाजाला आरक्षण मिळावे अशी मागणी करत मनोज जरांगेंच्या नेतृत्वात त्यांचे

मराठा आरक्षणसाठी युवकाची आत्महत्या

मुंबई : मराठा आरक्षणासाठी मुंबईतील आझाद मैदानात मनोज जरांगेंनी बेमुदत उपोषण सुरू केले आहे. तर त्यांच्यासोबत