
पंतप्रधानांना पनवती म्हणणार्या राहुल गांधींना भाजपचा पुराव्यासकट खोचक सवाल
मुंबई : क्रिकेट विश्वचषकाचा (Cricket World Cup 2023) यावर्षीचा अंतिम सामना भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यान (India Vs Australia final match) १९ नोव्हेंबर रोजी पार पडला. या सामन्यात भारताचा पराभव झाल्याने करोडो भारतीयांचे स्वप्न तुटले. यानंतर स्टेडिअममध्ये उपस्थित असलेले भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी ड्रेसिंग रुममध्ये जाऊन खेळाडूंची भेट घेतली आणि त्यांचे मनोबल वाढवले. ही गोष्ट मात्र काँग्रेसचे खासदार राहुल गांधींना (Rahul Gandhi) रुचली नसल्याने त्यांनी अप्रत्यक्षपणे पंतप्रधानांचा पनवती असा उल्लेख केला. त्यांच्या उपस्थितीमुळेच आपण हरलो, असं ते म्हणाले. त्यांच्या या वक्तव्यावर भाजपनेही तितकेच चोख प्रत्युत्तर दिलं आहे.
भाजपचे मीडिया सेलचे प्रमुख अमित मालवीय (Amit Malviya) यांनी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी (Indira Gandhi) यांच्यासंदर्भात एक जुना व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यात एका मुलाखतीत पाकिस्तानच्या (Pakistan) हॉकी संघातील खेळाडू भारत हरत असताना पंतप्रधान इंदिरा गांधी उठून निघून गेल्या होत्या हा प्रसंग सांगतो. १९८२ सालच्या आशियाई क्रीडा स्पर्धांच्या अंतिम सामन्याच्या वेळचा हा प्रसंग आहे.
पाकिस्तानी खेळाडू म्हणतो, “आम्ही भारतात आशियाई क्रीडा स्पर्धा खेळलो. तो आमच्यासाठी संस्मरणीय क्षण होता. दिल्लीत १९८२ आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये आम्ही भारताविरुद्ध अंतिम सामना खेळलो. त्या सामन्याला त्यांच्या पंतप्रधान इंदिरा गांधीही उपस्थित होत्या. त्या असताना आम्ही हा सामना ७-१ ने जिंकला. पाच गोल झाल्यानंतर इंदिरा गांधी निघून गेल्या. भारतात भारताला हरवणं हा आमच्यासाठी मोठा क्षण होता”, असं त्याने मुलाखतीत सांगितलं आहे.
The year was 1982. India was playing Hockey finals against arch rival Pakistan in the Asian Games held in New Delhi. Indira Gandhi, then Prime Minister was present in the stadium, watching the game. Indian team lost to Pakistan 1-7. Indira Gandhi, in an exemplary show of… pic.twitter.com/HYPyvKfcHF
— Amit Malviya (@amitmalviya) November 22, 2023
अमित मालवीय यांनी या व्हिडीओसोबत एक पोस्ट शेअर करत म्हटले आहे की, “ते वर्ष होतं १९८२. नवी दिल्लीमध्ये भारत पाकिस्तानविरुद्ध आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये हॉकीचा अंतिम सामना खेळत होता. तेव्हाच्या पंतप्रधान इंदिरा गांधी त्यावेळी स्टेडियममध्ये उपस्थित होत्या. तो सामना भारतानं पाकिस्तानविरुद्ध १-७ असा गमावला. पाकिस्ताननं ५ गोल केल्यानंतर इंदिरा गांधी मैदानातून निघून गेल्या. मग राहुल गांधींच्या मते इंदिरा गांधींना काय म्हणायला हवं?” असा खोचक सवाल उपस्थित करत अमित मालवीय यांनी राहुल गांधींना चपराक लगावली आहे.