हेल्‍थकेअर जाहिरातींमधील उल्‍लंघनाच्या तक्रारीत ३४ टक्‍के वाढ!

एएससीआयकडून सहामाही तक्रार अहवाल २०२३ सादर


मुंबई : अॅडव्हर्टाइझिंग स्टॅण्डर्ड्स कौन्सिल ऑफ इंडिया (एएससीआय) ने एप्रिल ते सप्‍टेंबर २०२३ कालावधीसाठी त्‍यांचा सहामाही तक्रार अहवाल प्रकाशित केला आहे. या अहवालाच्‍या माध्यमातून उदयोन्‍मुख ट्रेण्‍ड्स आणि जाहिरात मानकांबाबत माहिती सादर करण्‍यात आली आहे.


या अहवालामधून निदर्शनास येते की, कार्यवाही केलेल्‍या तक्रारींमध्‍ये (४४९१) ३४ टक्‍के वाढ झाली आहे, तसेच कार्यवाही केलेल्‍या जाहिरातींच्‍या आकडेवारीमध्‍ये (३५०१) २७ टक्‍के वाढ झाली आहे. यामधून जबाबदार जाहिराती व ग्राहक संरक्षणाप्रती एएससीआयची दृढ कटिबद्धता दिसून येते.


कार्यवाही करण्‍यात आलेल्‍या ३,५०१ जाहिरातींपैकी ५६४ (१६ टक्‍के) जाहिरातींनी प्रत्‍यक्ष कायद्याचे उल्‍लंघन केले, ज्‍यामध्‍ये गेल्‍या वर्षीच्‍या तुलनेत २२ टक्‍क्‍यांची वाढ झाली. कार्यवाही करण्‍यात आलेल्‍या एकूण जाहिरातींपैकी ३५ टक्‍के जाहिरातींना विरोध करण्‍यात आला नाही आणि त्‍वरित मागे घेण्‍यात आल्‍या किंवा सुधारित करण्‍यात आल्‍या. तसेच ४७ टक्‍के जाहिरातींनी एएससीआय कोडचे उल्‍लंघन केले आणि जाहिरातींना मागे घेण्‍याची किंवा सुधारित करण्‍यास सांगण्‍यात आले. फक्‍त २ टक्‍के तक्रारी फेटाळण्‍यात आल्‍या.


कार्यवाही करण्‍यात आलेल्‍या ३,५०१ तक्रारींमध्‍ये डिजिटल मीडिया ७९ टक्‍क्‍यांसह उल्‍लंघनाचे प्रमुख स्रोत राहिले. प्रिंट मीडिया व टेलिव्हिजनचे अनुक्रमे १७ टक्‍के व ३ टक्‍के योगदान होते, तर इतर माध्‍यमांचे नोंदवलेल्‍या उल्‍लंघनांमध्‍ये २ टक्‍के योगदान होते.


एकूण तक्रारींमध्‍ये २१.३ टक्‍के ग्राहकांच्‍या तक्रारी होत्‍या, ज्‍यामधून जाहिरात मानकांचे पालन करण्‍याप्रती जनतेचा मोठा सहभाग दिसून येतो. एएससीआयने स्‍वत:हून ७५.४ टक्‍के तक्रारी केल्‍या, ज्‍यामधून संभाव्‍य उल्‍लंघने ओळखण्‍याप्रती संस्‍थेचा सक्रिय दृष्टिकोन निदर्शनास येतो.



या अहवालामधील काही प्रमुख निष्‍पत्ती पुढीलप्रमाणे...


डिजिटल वर्चस्‍व: व्‍यापक ७९ टक्‍के समस्‍याग्रस्‍त जाहिराती ऑनलाइन आढळून आल्‍या, ज्‍यामधून डिजिटल जाहिरात जगतातील आव्‍हाने निदर्शनास येतात.


नियामक सतर्कता: एएससीआयच्‍या केंद्रित देखरेख यंत्रणांनी माध्‍यमामधील आक्षेपार्ह कन्‍टेन्‍टचे निराकरण करण्‍यासाठी डिजिटल सर्व्‍हायलन्‍सला चालना दिली. कार्यवाही करण्‍यात आलेल्‍या जाहिरातींपैकी ९८ टक्‍के जाहिरातींमध्‍ये काही स्‍वरूपात सुधारणा करण्‍याची गरज होती.


ऐच्छिक अनुपालन: डिजिटल जाहिरात क्षेत्रात, एएससीआय येथे करण्‍यात आलेल्‍या एकूण तक्रारींपैकी २२ टक्‍के तक्रारी प्रभावकांनी केल्‍या. प्रभावक मार्गदर्शकतत्त्वांसाठी कार्यवाही केलेल्‍या ९९.४ टक्‍के जाहिरातींनी उल्‍लंघन केल्‍याचे आढळून आले. एएससीआयला गेल्‍या वर्षीच्‍या ८६ टक्‍क्‍यांच्‍या तुलनेत घेतलेल्‍या ९२ टक्‍के प्रभावक केसेसमध्‍ये शिफारशींचे अनुपालन दिसण्‍यात आले, ज्‍यामधून एएससीआयच्‍या सीसीसी शिफारशींचे मोठ्या प्रमाणात पालन होण्‍याचा संकेत दिसून येतो.


हेल्‍थकेअर प्रकाशझोतात: हेल्‍थकेअर सर्वाधिक उल्‍लंघन करणारे क्षेत्र ठरले, जेथे कार्यवाही केलेल्‍या सर्व जाहिरातींमध्‍ये हेल्‍थकेअरशी संबंधित जाहिराती २१ टक्‍के होत्‍या. या वाढीसाठी डिजिटल व्‍यासपीठांवरील औषधांसंदर्भात अधिकाधिक जाहिराती कारणीभूत आहेत.


कायदेशीर उल्‍लंघन: एएससीआयला ड्रग अॅण्‍ड मॅजिक रिमीडिज अॅक्‍ट ऑफ १९५४ चे प्रत्‍यक्ष उल्‍लंघन करणाऱ्या जाहिरातींमध्‍ये मोठी वाढ झाल्‍याचे निदर्शनास आले, यामुळे जाहिरातदारांना जाहिराती मागे घेण्‍याच्‍या किंवा त्‍यामध्‍ये सुधारणा करण्‍याच्‍या सूचना देण्‍यात आल्‍या. एएससीआयने गेल्‍या आर्थिक वर्षात पाठवलेल्‍या ४६४ जाहिरातींच्‍या तुलनेत सहा महिन्‍यांमध्‍ये आयुष मंत्रालयाकडे ५६५ जाहिराती पाठवल्‍या.

एएससीआयच्‍या मुख्‍य कार्यकारी अधिकारी व सेक्रेटरी-जनरल मनिषा कपूर म्‍हणाल्‍या, ''एएससीआय डिजिटल जाहिरातीमुळे निर्माण होणाऱ्या आव्‍हानांचा सामना करण्‍याप्रती कटिबद्ध आहे. ग्राहक ऑनलाइन अधिकाधिक वेळ व्‍यतित करतात, तसेच ऑनलाइन आक्षेपार्ह जाहिरातींचा अधिकाधिक प्रसार केला जात आहे, यामुळे सर्व भागधारकांनी एकत्र येत त्‍यांच्‍या ऑनलाइन सुरक्षिततेचा प्रश्‍न सोडवला पाहिजे. ऑनलाइन क्षेत्रावर सतत सतर्कता ठेवल्‍याने एएससीआय कोडचे उल्‍लंघन करणाऱ्या जाहिराती व ब्रॅण्‍ड्सना ओळखण्‍यास मदत होते, ज्‍यासाठी जाहिराती प्रामाणिक, उत्तम व सुरक्षित असणे आवश्‍यक आहे. आम्‍ही आशा करतो की, विविध क्षेत्रे या उल्‍लंघनांना ओळखतील आणि अधिक जबाबदार जाहिराती तयार करण्‍याप्रती कटिबद्ध होतील.''

Comments
Add Comment

केरळच्या ६ जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट, तामिळनाडूमध्येही मुसळधार पावसाचा इशारा

नवी दिल्ली : देशातील अनेक राज्यांमध्ये आज मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. विशेषतः हवामान विभागाने

"माझी वरपर्यंत ओळख आहे" : अवैध दारूसाठा प्रकरणी व्यापारी अटकेत !

सुरत : गुजरातमधील सुरतमध्ये एका बर्थडे पार्टीत पोलिसांनी हॉटेलबाहेर उभ्या असलेल्या वाहनातून दारूच्या साठ्यासह

बिहारमधून निवडणूक लढवणार ७२ वर्षांचे आजोबा

पाटणा : बिहारमध्ये विधानसभेची निवडणूक होत आहे. यंदा बडा खोदाबंदपूर गावात राहणारे राम स्वार्थ प्रसाद हे ७२

पुराचा फटका बसलेल्यांना दिलासा मिळणार, केंद्राकडून आली मोठी मदत

नवी दिल्ली : केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री अमित शहा यांनी २०२५-२६ या वर्षासाठी कर्नाटक आणि महाराष्ट्र

पुन्हा एकदा मोदी आणि अमित शाहंचा झंझावात दिसणार

पाटणा : विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्ताने बिहारमध्ये पंतप्रधान मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह

सीमेलगतची अनधिकृत धार्मिक स्थळे हटवणार

राष्ट्रीय सुरक्षेसाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय नवी दिल्ली  :केंद्र सरकारने पाकिस्तान, बांगलादेश, म्यानमार