World cup trophy: ऑस्ट्रेलियन खेळाडू मिशेल मार्शविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल

मुंबई: ऑस्ट्रेलियाचा ऑलराऊंडर मिशेल मार्शच्या हातात बीअर आणि पायाच्या खाली वर्ल्डकप ट्रॉफी ठेवण्याबाबत आक्षेप व्यक्त करताना एका आरटीआय कार्यकर्त्याने ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. यात कार्यकर्त्याने आरोप लगावला की मिशेल मार्शने ट्रॉफीवर पाय ठेवत त्याचा अपमान केला आहे.


आरटीआय कार्यकर्ता पंडित केशव देवने आपल्या तक्रारीत लिहिले की इंटरनेटवर एक फोटो पाहिला होता. यात ऑस्ट्रेलियाचा खेळाडू मिशेल मार्शला वर्ल्डकपच्या ट्रॉफीवर पाय ठेवताना पाहिले होते.


यामुळे देशातील १४० कोटी लोकांच्या सन्मानाला ठेस पोहोचली होती. यानंतर त्यांनी ठाणे देहली गेट येथे मिशेल मार्शविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. सोबतच भारतासोबत त्याच्या सामन्यावर आजीवन बंदी घालण्याचीही मागणी करण्यात आली आहे.


वर्ल्डकपचा फायनल सामना जिंकल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्सने ट्रॉफी देत सन्मानित केले होते. मात्र मिशेल मार्शने याचा अपमान केला.

Comments
Add Comment

बांगलादेशने अफगाणिस्तानला हरवून टी-२० मालिका जिंकली

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : बांगलादेशने दुसऱ्या टी-२० सामन्यात अफगाणिस्तानचा दोन विकेट्सने पराभव करून तीन

महिला विश्वचषक : पावसामुळे ऑस्ट्रेलिया विरुद्ध श्रीलंका सामना रद्द

कोलंबो (वृत्तसंस्था): शनिवारी कोलंबो येथे श्रीलंका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील महिला विश्वचषक सामना रद्द करावा

ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी गिलकडे नेतृत्व; रोहित शर्माचा खेळाडू म्हणून संघात सहभाग

वनडे आणि टेस्टसाठी शुभमन गिल तर टी २० साठी सूर्यकुमार यादव करणार भारताचे नेतृत्व मुंबई : भारतीय क्रिकेट नियामक

IND vs WI: तिसऱ्याच दिवशी वेस्ट इंडिजचा खेळ खल्लास, भारताचा एक डाव आणि १४० धावांनी विजय

अहमदाबाद : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील पहिल्या कसोटीचा निर्णय तिसऱ्याच दिवशी लागला.

IND vs WI: भारताने ४४८वर पहिला डाव केला घोषित, २८६ धावांची घेतली आघाडी

अहमदाबाद: भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्याला तिसऱ्या दिवशी नाट्यमय

वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या कसोटीत ध्रुव जुरेलचं पहिलं शतक! 'गन सॅल्यूट' करत केले सेलिब्रेशन

अहमदाबाद: भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्यात टीम इंडियाचा युवा यष्टिरक्षक-फलंदाज ध्रुव