Snowfall Places: snowfall ची मजा घ्यायचीये, डिसेंबरमध्ये फिरण्यासाठी या आहेत जागा

मुंबई: थंडीचा मौसम सुरू झाल्यानंतर अनेकांना एखाद्या हिल स्टेशनला जाऊन snofall एन्जॉय करण्याची इच्छा असते. कडाक्याची थंडी आणि snoowfallमध्ये फिरण्याची काही वेगळीच मजा असते. डिसेंबर महिना सुरू होण्यास काहीच दिवस उरले आहेत. जर तुम्हालाही थंडीत अशी मजा घ्यायची आहे तर आम्ही तुम्हाला अशी काही ठिकाणे सांगत आहोत जिथे तुम्ही फिरण्याचा आनंद घेऊ शकता.


गुलमर्ग - जर तुम्हाला बर्फवृष्टीसह स्कीईंगची मजा घ्यायची आहे तर यासाठी गुलमर्गशिवाय दुसरा चांगला पर्याय नाही. गुलमर्ग काश्मीरमधील एक पर्यटक डेस्टिनेशन आहे जे आपल्या सुंदरतेसाठी ओळखले जाते.


लेह - डिसेंबर महिन्यात फिरण्यासाठी लेह सगळ्यात सुंदर ठिकाण आहे. डिसेंबरमध्ये येथे जाण्यासाठी विमानाचे तिकीटही स्वस्त मिळते. थंडीत या ठिकाणी कमी गर्दी असते तसेच हॉटेल्समध्येही मोठा डिस्काऊंट मिळतो. डिसेंबर महिन्यात या ठिकाणी मोठ्या प्रमाणात बर्फ पडतो.


औली - स्कीइंग स्लोप अथवा विंटर गेम्सची मजा घ्यायची असेल तर औली उत्तराखंडमधील बेस्ट जागा आहे. येथे बर्फवृष्टी होणे ही सामान्य गोष्ट आहे. येथे तुम्ही आशियातील सर्वात लांब केबल कार आणि स्कीईंगची मजा घेऊ शकतात. दिल्ली-एनसीआरमध्ये राहणाऱ्यांसाठी औली हे चांगले हनीमून डेस्टिनेशन आहे.


मॅक्लॉडगंज - बर्फवृष्टी पाहायची असेल तर गरम कपडे पॅक करा आणि मॅकडॉलगंजसाठी निघा. हिमाचल प्रदेशातील हे ठिकाण आहे. येथे भरपूर बर्फवृष्टी होते. बर्फाने झाकलेले डोंगर, पॅराग्लायडिंग आणि नद्दी व्ह्यू पॉईंट येथील मुख्य आकर्षणाचा केंद्र आहे.

Comments
Add Comment

Maharashtra Rain Update : पुढील २४ तास अतिधोक्याचे! ८ आणि ९ नोव्हेंबरला मोठे वादळ धडकणार; अनेक राज्यांमध्ये IMD कडून 'महा-अलर्ट' जारी!

मुंबई : राज्यात अखेर थंडीची चाहूल जाणवू लागली आहे. पहाटेच्या वेळी तापमानात घट होऊन गारवा वाढल्याचे चित्र अनेक

मुंबईतील इतर भागांमध्ये अनधिकृत फेरीवाल्यांवर कधी होणार कारवाई ?

आंदोलनाच्या इशाऱ्यानंतर कुलाबा कॉजवेवरील अनधिकृत फेरीवाले हटवले मुंबई (खास प्रतिनिधी) : कुलाबा कॉजवेवरील

मेट्रोंना विविध सेवा देणारी आता एकच कंपनी

मुंबई (प्रतिनिधी): मुंबई महानगर प्रदेशातील विविध प्राधिकरण आणि कंपन्यांचे मेट्रो प्रकल्पांचे एकत्रिकरण

रविवारी मुख्य व हार्बर रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक

मुंबई (प्रतिनिधी) : मध्य रेल्वेवर विविध अभियांत्रिकी आणि देखभाल कामांसाठी रविवारी ९ नोव्हेंबर रोजी उपनगरी

कृषी समृद्धी योजनेस राज्य सरकारची मान्यता

मुंबई (प्रतिनिधी) : "कृषी क्षेत्रात भांडवली गुंतवणूक आणि पायाभूत सुविधा निर्मितीसाठी गुंतवणूक करण्याचा निर्णय

एमसीए निवडणुकीचा मार्ग मोकळा

मुंबई (प्रतिनिधी) : मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या निवडणुकीतील अंतिम उमेदवार यादीवर आक्षेप घेत एमसीएच्या काही