Miss Universe 2023 : आत्महत्याच करणार होती; पण आता गाजवली मिस युनिव्हर्स स्पर्धा!

जेन दीपिका गॅरेट ठरली मिस युनिव्हर्समधील पहिली प्लस साईज मॉडेल


सॅन साल्वाडोर : मिस युनिव्हर्स २०२३ (Miss Universe 2023) स्पर्धा १८ आणि १९ नोव्हेंबर रोजी एल साल्वाडोर (El Salvador) येथे आयोजित करण्यात आली होती. जिथे निकाराग्वाची शेयनिस पॅलासिओस (Sheynnis Palacios of Nicaragua) विजयी झाली. पॅलासिओसने जगभरातील देशांतील ८३ इतर प्रवेशकर्त्यांना हरवले. पण तिच्या विजयापेक्षाही, यंदाची स्पर्धा काही खास नियमांसाठी चर्चेत होती.


या वर्षी, मिस युनिव्हर्सने विवाहित, विभक्त आणि घटस्फोटित महिलांनाही सहभागाची परवानगी दिली आणि ट्रान्सवुमन (Transwoman) तसेच अधिक आकाराच्या महिलांनाही सहभागाची संधी होती. यातील ज्यांना पारितोषिक पटकावता आले नाही पण तरीही जे चर्चेत राहिले त्यांच्यापैकी एक म्हणजे मिस नेपाळ जेन दीपिका गॅरेट (Jane Dipika Garrett). ही प्लस-साईज मॉडेल (Plus Size Model) प्रेक्षकांच्या चांगलीच लक्षात राहिली. ती मिस युनिव्हर्समधील पहिली प्लस साईज मॉडेल ठरली आहे.


'मिस युनिव्हर्स २०२३' या स्पर्धेत सहभागी झालेल्या मिस नेपाळ जेन दीपिका गैरेटने झिरो फिगर, फिट अॅन्ड फाईन असा टॅग मोडून काढला आणि बॉडी पॉजिटिव्हिटीचा संदेश दिला. सौंदर्यवतींनी आपल्या साईजकडे लक्ष न देता फॅशन आणि सौंदर्य तसेच लूककडे लक्ष द्यायला हवं, असं तिचं मत आहे.


जेन मिस युनिव्हर्स २०२३ मध्ये जिंकू शकली नाही किंवा अंतिम फेरीत पोहोचली नाही, तरीही ती भारताच्या श्वेता शारदा सोबत टॉप २० मध्ये होती. याआधी, तिच्या आत्मविश्वासपूर्ण वागणुकीमुळे आणि शरीराच्या सकारात्मकतेच्या संदेशामुळे, ती स्पर्धेमध्ये आधीच प्रेक्षकांची आवडती बनली होती. जेव्हा ती स्टेजवर येईल तेव्हा उपस्थित गर्दी टाळ्यांचा कडकडाट करत तिला चीअर अप करत होती. किताब जिंकला नसला तरी तिने अनेक प्रेक्षकांची मने जिंकली.



कोण आहे जेन दीपिका गॅरेट?


जेन दीपिका गॅरेटचा जन्म अमेरिकेत झाला. सध्या ती नेपाळमधील काठमांडू परिसरात राहते. ती मॉडेल असण्यासोबत नर्स आणि बिझनेस डेव्हलपरदेखील आहे. महिलांच्या मानसिक आरोग्यासाठी तिने प्रयत्न केले आहेत. बॉडी पॉजिटिव्हिटीचा चांगला संदेश देणाऱ्यांच्या यादीत जेन दीपिका गैरेटचा समावेश होतो. सध्या जगभरात तिचं नाव चर्चेत आहे.



आत्महत्येचा केला होता प्रयत्न


जेनची ऊंची पाच फूट सात इंच आणि वजन ८० किलो आहे. हार्मोन्सच्या समस्यांमुळे जेनचं वजन वाढलं. वाढलेल्या वजनामुळे तिला अनेकांच्या चिडवण्याचा देखील सामना करावा लागला होता. एका वर्षाआधी तिने आत्महत्येचा प्रयत्नही केला होता. पण नंतर ती पूर्ण आत्मविश्वासाने स्पर्धेत उतरली आणि आता याच वाढलेल्या वजनाची तिने जगाला दखल घ्यायला लावली आहे.

Comments
Add Comment

Ahilyanagar: भरवस्तीत दुचाकीस्वाराचा गोळीबार; कुख्यात गुंड सागर मोहळकर रक्ताच्या थारोळ्यात

अहिल्यानगर: अहिल्यानगर जिल्ह्यातले जामखेड पुन्हा एकदा गोळीबाराच्या घटनेने हादरून गेले आहे. जामखेडमध्ये

Iran Israel War: इराणने दिला जगाला इशारा; ट्रम्प भडकले

मुंबई: अमेरिका आणि इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणने होर्मुझ सामुद्रधुनीवर नियंत्रण मिळवत जागतिक व्यापाराला

पाकिस्तान सोडा, मायदेशी परता; अमेरिकेचे कराची आणि लाहोरमधील वाणिज्य दूतावासातील कर्मचाऱ्यांना निर्देश

वॉशिंग्टन डीसी : पश्चिम आशियातील अमेरिका-इस्रायल आणि इराण युद्धाने आता रौद्र रूप धारण केले आहे. याचे पडसाद

Iran -Israel America War : इराणमधील त्या फोटोंनी जग हादरलं; ट्रम्प यांच्या पुतणीची तीव्र प्रतिक्रिया

मिनाब : अमेरिका आणि इस्रायलने इराणवर हल्ले सुरू केले त्याला इराणने प्रत्युत्तर देण्यास सुरुवात केली आणि नव्या

Donald Trump : एकीकडे युद्ध तर दुसरीकडे ट्रम्प प्रशासनात मतभेद ?

- ब्रिटन आणि स्पेनवर बहिष्कार टाकण्यावरून ट्रम्प प्रशासनात अंतर्गत मतभेत ? इराणवरील हल्ल्यांसाठी लष्करी तळ

क्षेपणास्त्र विरोधी क्षेपणास्त्रांचा साठा वेगाने घटत असल्यामुळे अमेरिका चिंतेत

वॉशिंग्टन डीसी : अमेरिका आणि इस्रायल यांनी संयु्क्तपणे २८ फेब्रुवारी २०२६ पासून इराणवर हवाई हल्ले सुरू केले. आज ४