आम्ही तुमच्यासोबत आहोत, आज आणि नेहमी...पराभवानंतर टीम इंडियाला पंतप्रधान मोदींनी दिला पाठिंबा

अहमदाबाद: आयसीसी क्रिकेट विश्वचषक २०२३च्या अंतिम सामन्यात भारताला हरवत ऑस्ट्रेलियन संघाने सहा विकेटनी विजय मिळवला. ऑस्ट्रेलियाचा संघ सहाव्यांदा चॅम्पियन ठरला. तर तिसऱ्यांदा खिताब जिंकण्याचे भारताचे स्वप्न भंगले. सोबतच भारताच्या यजमानपदाखाली खेळवण्यात आलेल्या आयसीसी वनडे विश्वचषक २०२३ची सांगता भारतासाठी निराशाजनक ठरली.


यावेळेस पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भारताच्या खेळाडूंचे सांत्वंन केले. त्यांनी लिहिले, प्रिय टीम इंडिया, वर्ल्डकपदरम्यान तुमची प्रतिभा आणि दृढ संकल्प उल्लेखनीय होता. तुम्ही खूपच छान खेळलात आणि देशाला गौरव मिळवून दिलात. आम्ही आज आणि नेहमीच तुमच्यासोबत उभे आहत.


तर काँग्रेस नेते राहुल गांधी म्हणाले, टीम इंडिया तुम्ही संपूर्ण स्पर्धेत जबरदस्त कामगिरी केली. जिंकलात किंवा हरलात आम्ही तुमच्यावर प्रेम करतो. सोबतच विश्वचषकात शानदार विजयासाठी ऑस्ट्रेलियाचे अभिनंदन.


रविवारी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये रंगलेल्या विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताला सहा विकेट राखत हरवले. या सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाला विजयासाठी २४१ धावांचे आव्हान दिले होते. मात्र पॅट कमिन्सच्या संघाने हे आव्हान ४३ षटकांतच पूर्ण केले. ऑस्ट्रेलियाचा संघ सहाव्यांदा विश्वविजेता ठरला.

Comments
Add Comment

विराटचा दोन डावातील सलग ११ शतकांचा विक्रम

मुंबई  :  विराट कोहलीने त्याचे ५३वे एकदिवसीय शतक झळकावले आहे. रायपूरमध्ये सुरू असलेल्या दक्षिण

आयसीसी क्रमवारीत कोहलीची विराट भरारी

मुंबई : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील एकदिवसीय मालिकेदरम्यान आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने नुकतीच

दक्षिण आफ्रिकेच्या टी - २० मालिकेसाठी भारताचा संघ जाहीर

फिटनेसवर ठरणार शुभमन गिलचा निर्णय नवी दिल्ली : दक्षिण आफ्रिकेच्या टी-२० मालिकेसाठी आता भारताचा संघ जाहीर

एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत दक्षिण आफ्रिकेने साधली बरोबरी

रायपूर : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात सुरू असलेल्या तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना दक्षिण

रायपूर ODI : द. आफ्रिकेपुढे ३५९ धावांचे लक्ष्य

रायपूर : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात सुरू असलेल्या तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना

रायपूरमध्ये होणार भारत विरूद्ध दक्षिण आफ्रिका एकदिवसीय मालिकेतील दुसरा सामना

रायपूर: दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा रांचीतील पहिला सामना जिंकून भारतीय संघाने एकदिवसीय मालिकेची दमदार सुरुवात