Uttarkashi tunnel collapse : उत्तरकाशीतील बोगद्यात ते ४१ मजूर नवव्या दिवशीही अडकूनच! बचावकार्यात झाली 'ही' मोठी चूक...

उत्तराखंड : उत्तराखंड (Uttarakhand) येथील उत्तरकाशी शहरामध्ये निर्माणाधीन सिल्क्यरा बोगद्याचा काही भाग कोसळल्याने (Uttarkashi Tunnel collapsed) ४० नव्हे तर ४१ मजूर आतमध्ये अडकले. या दुर्घटनेच्या नवव्या दिवशीही मजुरांना बाहेर काढण्यात यश आलेले नाही. त्यांना वाचवण्यासाठी अमेरिकन पद्धतीची आधुनिक मशीन मागवण्यात आली होती. ज्यामुळे मजूर बाहेर निघतीलच असा सर्वांना विश्वास वाटत होता. मात्र, पहिल्या दोन दिवसांत केलेल्या एका चुकीमुळे बचावकार्यातील अडथळे आणि वेळ वाढला आहे. सध्याची परिस्थिती पाहता कामगारांना सुखरूप बाहेर काढण्यासाठी आणखी पाच दिवस ते एक आठवडा लागू शकतो.


कामगारांना वाचवण्याच्या प्रयत्नात केंद्र सरकारने देखील सखोल लक्ष घातले आहे. बोगदा बांधकाम तज्ज्ञांच्या मते, बोगदा कोसळल्यानंतर दोन दिवसांनी मलबा हटवण्याची चूक झाली. बचाव पथकाने दोन दिवस ढिगारा हटवून सर्वात मोठी चूक केली, कारण कोसळल्यानंतर बोगदा स्थिर ठेवावा लागतो. चुकीमुळे बचावकार्याचा वेळ वाढला आहे.


विनोद कुमार, सेवानिवृत्त कार्यकारी संचालक, प्रकल्प आणि बोगदा अभियंता, कोकण रेल्वे कॉर्पोरेशन, नवी मुंबई, यांना या कामाचा ५१ वर्षांचा अनुभव आहे. त्यातूनच त्यांनी ही चूक निदर्शनास आणून दिली. कटरा येथील सलाल प्रकल्पात १९८७ साली बोगदा कोसळला होता तेव्हा हा धडा शिकल्याचे त्यांनी सांगितले. त्यावेळी ढिगारा हटवल्यामुळे बचावकार्याचा कालावधी दोन महिन्यांनी वाढला होता.


त्यानंतर मात्र १९९६ मध्ये जेव्हा गोव्यात असाच बोगदा कोसळला आणि त्यात १४ मजूर अडकले तेव्हा त्यांनी बोगद्यातून ढिगारा काढू दिला नाही. बोगद्यातून मार्ग काढल्यानंतर १३ कामगारांना सुखरूप बाहेर काढण्यात आले. त्याचवेळी ढिगारा खाली पडल्याने एका मजुराचा मृत्यू झाला होता. यावेळी सिल्क्यरा बोगद्यातून ढिगारा बाहेर काढण्याची चूक झाली आहे.


दरम्यान, बोगद्याच्या आत आणि वर मार्ग बनवणे ही बचावासाठी सर्वात प्रभावी पद्धत आहे. बोगद्यात सुमारे ६० मीटरचा रस्ता बनवायचा आहे. यामध्ये, एक SJVNL बोगद्याच्या वर, ONGC बोगद्यात तिरपे मार्ग बनवत आहे आणि THDCIL बोगद्याच्या दुसऱ्या टोकापासून मार्ग काढत आहे. सुरुवातीला अडचणी येतील, पण नंतर काम सोपे होईल. यामध्ये सर्वात मोठी बाब म्हणजे २२ मीटरचा रस्ता तयार करण्यात आला असून ३८ मीटरचा रस्ता तयार करायचा आहे. याशिवाय वरील मार्ग बनवण्याची प्रक्रियाही सुरु आहे. सध्या विनोद कुमार सुट्टीनिमित्त अबुधाबीला गेले आहेत, पण जर बोलावले तर मदत करण्याची पूर्ण तयारी त्यांनी दर्शवली आहे.


Comments
Add Comment

Chandipura Virus : गुजरातमध्ये 'चांदीपुरा' व्हायरसचा धुमाकूळ! २२ बालकांचा मृत्यू, १८४ संशयित रुग्ण; जाणून घ्या काय आहेत धोक्याची लक्षणे ?

गांधीनगर : पावसाळ्याच्या दिवसांत गुजरात राज्यात एका अत्यंत घातक आणि प्राणघातक आजाराने थैमान घातले आहे.

udhayanidhi stalin : अभिनेत्री तृषावरील अश्लील टिप्पणी भोवली! विरोधी पक्षनेते उदयनिधी स्टॅलिन यांना अटक; तामिळनाडूच्या राजकारणात मोठा भूकंप!

चेन्नई : तामिळनाडूच्या राजकारणात मंगळवारी सकाळी एक अत्यंत मोठी आणि धक्कादायक घडामोडी समोर आली. अभिनेत्री तृषा

Air India flight turbulence : हवेतील धक्क्यांमुळे एअर इंडियाचं विमान थेट खाली कोसळलं; १२ प्रवासी जखमी, दिल्लीत सुरक्षित लँडिंग

नवी दिल्ली : थायलंडच्या फुकेत शहरावरून दिल्लीकडे येणाऱ्या 'एअर इंडिया'च्या विमानाला मंगळवार, ४ ऑगस्ट रोजी हवेत

Bigg Boss 20 : 'बिग बॉस २०'ची तारीख ठरली! सलमान खानची 'करण-अर्जुन' शैलीत एंट्री; कुठे आणि कधीपासून पाहायला मिळणार शो?

मुंबई : सर्वात लोकप्रिय आणि चर्चित रिअॅलिटी शो 'बिग बॉस' (Bigg Boss) आपल्या २० व्या वर्षात पदार्पण करत असून, या ऐतिहासिक

Old Monk : मद्यप्रेमींना सर्वात मोठा धक्का! 'ओल्ड मंक'सह ६ ब्रँड्सवर FSSAI चा थेट दणका, नेमकं कारण काय?

भारतीय अन्नसुरक्षा आणि मानके प्राधिकरणाने (FSSAI) मद्य उद्योगातील नियमभंगाविरोधात मोठी कारवाई करत महाराष्ट्रातील

Annapurni Subramaniam : भारतीय शास्त्रज्ञ डॉ. अन्नपूर्णी सुब्रमण्यन यांना कॉस्पार विक्रम साराभाई पदक; हा मान मिळवणाऱ्या पहिल्या भारतीय महिला

मुंबई : भारतीय खगोलभौतिकशास्त्रज्ञ डॉ. अन्नपूर्णी सुब्रमण्यन यांना अंतराळ संशोधनातील उल्लेखनीय योगदानाबद्दल