World Cup 2023: टीम इंडियाच्या विजयासाठी सोनिया गांधींसह अनेक राजकीय नेत्यांकडून शुभेच्छा

मुंबई: क्रिकेट विश्वचषकातील(world cup final) अंतिम सामना रविवारी १९ नोव्हेंबरला होत आहे. देशभरातील क्रिकेट चाहते आजचा हा उत्सव साजरा करण्यासाठी अहमदाबादेत पोहोचले आहेत. या निमित्ताने देशभरातील दिग्गज नेते भारताच्या विश्वचषक विजयासाठी शुभेच्छा देत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींसह काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांनी खेळाडूंना शुभेच्छा दिल्या आहेत.


काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांनी भारतीय संघाला शनिवारी शुभेच्छा दिल्या आणि म्हटले की खेळाने नेहमीच लिंग, क्षेत्र, भाषा, धर्म बाजूला ठेवत एकत्र केले आहे. अहमदाबादमध्ये २०२३च्या विश्वचषक क्रिकेट फायनलमध्ये भारताचा सामना ऑस्ट्रेलियाविरुद्ध होत आहे.


सोनिया गांधींनी आपल्या मेसेजमध्ये म्हटले, प्रिय टीम इंडिया, मी या वर्ल्डकपदरम्यान तुमच्या अविश्वसनीय कामगिरी आणि सर्वोत्कृष्ट टीम वर्कसाठी सगळ्यात आधी शुभेच्छा देत सुरूवात करेन. तुम्ही सातत्याने देशाचे नाव रोशन केले आहे आणि आम्हाला आनंदित होण्याची संधी दिली. तुम्ही जेव्हा फायनल सामन्यासाठी तयार आहात तेव्हा संपूर्ण देश तुमच्या पाठी आहे. मी तुम्हाला शुभेच्छा देतो. तुमच्याकडे वर्ल्डकप चॅम्पियन बनण्याची क्षमता आहे. टीम इंडियाला शुभेच्छा. जय हिंद



सपा प्रमुख अखिलेश यादवनीही दिल्या शुभेच्छा


सपा प्रमुख अखिलेश यादव यांनी म्हटले, आमचा संघ सातत्याने जिंकत आहे. मी फलंदाजांना शुभेच्छा देईल मात्र खासकरून गोलदाजांना खूप साऱ्या शुभेच्छा. त्यांनी चांगली कामगिरी केली आहे. संपूर्ण देशाला आशा आहे की यावेळेस भारत वर्ल्डकप जिंकेल.



असदु्द्दीन औवेसी म्हणाले, आमचा संघ जिंकणार


फायनलमध्ये येणे ही मोठी होष्ट आहे. आम्हाला विश्वास आहे की आम्ही चांगले खेळू आणि जिंकूही. मी आपल्याकडून अनेक शुभेच्छा देतो.



सचिन तेंडुलकर म्हणाला, आज संध्याकाळी आम्ही ट्रॉफी उचलणार


माजी भारतीय क्रिकेटर सचिन तेंडुलकर म्हणाला, मी येथे शुभेच्छा घेऊन आलो आहे. मला आशा आहे की संध्याकाळी आम्ही ट्रॉफी उचलू. आम्ही सगळे याच दिवसाची वाट पाहत होतो.



अहमदाबादसाठी रवाना झाली वंदे भारत ट्रेन


आयसीसी क्रिकेट विश्वचषकाच्या फायनल सामन्यासाठी स्पेशल वंदे भारत ट्रेन मुंबई सेंट्रल येथन अहमदाबादसाठी रवाना झाली.


Comments
Add Comment

IND vs PAK : पाकिस्तानला धूळ चारण्यासाठी भारतीय संघ सज्ज

मुंबई (प्रतिनिधी) : भारत आणि पाकिस्तान यांच्यातील क्रिकेटमधील संघर्ष हा जगातील सर

भारताची बॉक्सर जॅस्मिन लंबोरियाने जागतिक बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये पटकावले सुवर्णपदक, रचला इतिहास

नवी दिल्ली: भारताची प्रतिभावान बॉक्सर जैस्मिन लंबोरियाने जागतिक बॉक्सिंग चॅम्पियनशिप २०२५

BCCI च्या कुटुंबातील कोणीही मेलं नाही, म्हणून..., शुभम द्विवेदीच्या पत्नीची प्रतिक्रिया

"सामान्य लोक माझं ऐकतील आणि सामन्यावर बहिष्कार टाकतील" ऐशन्या द्विवेदी Asia Cup 2025 India Vs Pak Match Controversy: पहलगाम हल्ल्यात

भारत-पाकिस्तान सामन्यावर बीसीसीआयचा बहिष्कार?

मॅचमध्ये दिसणार नाहीत बोर्डाचे वरिष्ठ अधिकारी नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तान संघात रविवारी (१४ सप्टेंबर) दुबई

क्रिकेटमध्ये पाकिस्तानशी तर हॉकीमध्ये चीनशी... रविवारी भारताची दुहेरी 'कसोटी'!

उद्याचा रविवार क्रीडाप्रेमींसाठी दुहेरी थरार, हॉकी आणि क्रिकेटचे दोन्ही सामने महत्वाचे! नवी दिल्ली: उद्या दि. १४

जर्सीचे प्रायोजक १५-२० दिवसांत निश्चित होणार: राजीव शुक्ला

नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट जर्सीला प्रायोजक मिळण्यासाठी आणखी २ ते ३ आठवड्यांची वाट पाहवी लागणार आहे, असे