Saturday, July 13, 2024
Homeताज्या घडामोडीNavi Mumbai Metro : नवी मुंबईतील मेट्रो अखेर उद्घाटनाशिवाय आजपासूनच सुरु होणार

Navi Mumbai Metro : नवी मुंबईतील मेट्रो अखेर उद्घाटनाशिवाय आजपासूनच सुरु होणार

जाणून घ्या कोणती स्थानके आणि कसे असणार तिकीट दर?

नवी मुंबई : नवी मुंबईत (Navi Mumbai) सुरु होणारी मेट्रो (Metro) गेल्या सहा महिन्यांपासून उद्घाटनाच्या प्रतिक्षेत होती. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांचा वेळ मिळत नसल्यामुळे नागरिकांची होणारी गैरसोय टाळण्याकरता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Cm Eknath Shinde) यांनी अखेर आजपासून मेट्रो सुरु करण्याचे आदेश सिडकोला दिले आहेत. प्रवासात ११ स्थानके असणार्‍या या मेट्रोचा मुख्यतः खारघर आणि तळोजामधील लोकांना फायदा होणार आहे. बेलापूर ते पेणघर या मार्गावर मेट्रो धावणार आहे. आज दुपारी तीन वाजता पहिली मेट्रो धावणार आहे, तर रात्री १० वाजता शेवटची मेट्रो असेल.

कोणती स्थानके असणार?

१. बेलापूर टर्मिनल
२. आरबीआय कॉलनी
३.बेलपाडा
४. उत्सव चौक
५.केंद्रीय विहार
६. खारघर गाव
७. सेंट्रल पार्क
८. पेठपाडा
९. अमनदूत
१०. पेठाली तळोजा
११. पेणघर
अशी ११ स्थानके या मेट्रो प्रवासात असणार आहेत.

कसे असणार तिकीट दर?

० – २ किमी : १० रुपये
२ – ४ किमी : १५ रुपये
४ – ६ किमी : २० रुपये
६ – ८ किमी : २५ रुपये
८ – १० किमी : ३० रुपये
१० किमी किंवा त्यापेक्षा जास्त अंतर : ४० रुपये

आज पहिली मेट्रो तीन वाजता धावणार असून उद्यापासून नियमितपणे सकाळी सहा ते रात्री दहा  या वेळेत मेट्रो धावणार आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -