India vs Australia: तब्बल २० वर्षांनी भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यात रंगणार फायनल मुकाबला

मुंबई: भारताच्या यजमानपदाखाली खेळवला जात असलेला आयसीसी विश्वचषक २०२३ आता शेवटच्या टप्प्यात आला आहे. स्पर्धेच्या अंतिम फेरीतील संघ ठरले आहेत. हे संघ आहेत भारत आणि ऑस्ट्रेलिया. हे दोन्ही संघ २० वर्षांनी पुन्हा एकदा विश्वचषकाच्या फायनलमध्ये आमनेसामने असतील.


याआधी भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात २००३ वर्ल्डकपचा फायनल सामना खेळवण्यात आला होता.हा सामना दक्षिण आफ्रिकेच्या जोहान्सबर्गमध्ये खेळवण्यात आला होता. यात भारतीय संघाला १२५ धावांनी पराभव सहन करावा लागला होता. तेव्हा भारतीय संघाचे नेतृत्व सौरव गांगुलीच्या हातात होते. कांगारूंचे नेतृत्व रिकी पॉटिंग करत होता.



१९ नोव्हेंबरला होणार फायनल


२० वर्षानंतर दोन्ही संघ बदलले आहेत. आता भारतीय संघाची कमान रोहित शर्माच्या हातात आहे तर कांगारूंचे नेतृत्व वेगवान गोलंदाज पॅट कमिन्स सांभाळत आहेत. यावेळेस हा खिताबी सामना १९ नोव्हेंबरला अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये खेळवला जाईल.


२००३मध्ये गांगुलाच्या नेतृत्वात दादागिरी झाली होती. मात्र आता २० वर्षांनी भारत आणि ऑस्ट्रेलियाचे संघ खूप बदलले आहेत. यावेळेस भारताचे नेतृत्व रोहित शर्मा करत आहे. रोहितच्या नेतृत्वात भारतीय संघ तगडी दिसत आहे. यावेळेस वर्ल्डकपमध्ये नव्या भारताची दादागिरी पाहायला मिळेल.


भारतीय संघाने आतापर्यंत आपले १०ही सामने जिंकले आहेत. दुसरीकडे ऑस्ट्रेलियाने १० पैकी ८ सामने जिंकले आहेत. भारतीय संघाने आपल्या पहिल्या सेमीफायनल सामन्यात न्यूझीलंडला ७० धावांनी हरवत फायनल गाठली आहे. तर कांगारूच्या संघाने चोकर्स म्हटल्या जाणाऱ्या दक्षिण आफ्रिकेला ३ विकेटनी हरवत फायनलमध्ये प्रवेश केला.


आता ऑस्ट्रेलियाचा संघ ८व्यांदा फायनलमध्ये खेळण्यास उतरणार आहे. त्यांनी आतापर्यंत ७ पैकी पाचवेळा खिताब जिंकला आहे. त्यांना दोन वेळा वेस्ट इंडिज आणि १९९६मध्ये श्रीलंकेविरुद्ध पराभव सहन करावा लागला होता. तर ऑस्ट्रेलियाने सर्वाधिक ५ वेळा १९८७, १९९९, २००३, २००७ आणि २०१५मध्ये खिताब जिंकला होता.


तर भारतीय संघाचा विश्वचषकातील चौथा खिताबी सामना आहे. या संघाने १९८३मध्ये कपिल देवच्या नेतृत्वात पहिल्यांदा खिताब जिंकला होता. यानंर २००३मध्ये भारताला फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाकडून पराभव सहन करावा लागला होता. मात्र २०११मध्ये भारतीय संघाने दुसऱ्यांदा वर्ल्डकप पटकावला. धोनीच्या नेतृत्वात भारतीय संघ खेळला होता.

Comments
Add Comment

खेळाडूंच्या सुरक्षेसाठी प्रेक्षकांनाच सामना पाहण्यास बंदी!

विराट कोहली १५ वर्षांनी विजय हजारे ट्रॉफी खेळणार नवी दिल्ली : येत्या २४ डिसेंबरपासून देशातील सर्वात मोठ्या

बीसीसीआयच्या निर्णयामुळे महिला क्रिकेट खेळाडूही होणार मालामाल

देशांतर्गत क्रिकेटपटूंच्या मॅच फीमध्ये दुप्पट वाढ मुंबई : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने महिला

मुंबईकर जेमिमाह रॉड्रिग्सकडे दिल्ली कॅपिटल्सच्या कर्णधारपदाची धुरा

मुंबई : मुंबईकर जेमिमाह रॉड्रिग्स हीने भारतीय संघाला आयसीसी वनडे वर्ल्ड कप २०२५ ट्रॉफी जिंकून देण्यात प्रमुख

श्रीलंकेविरुद्धच्या टी ट्वेंटी मालिकेत भारताचा सलग दुसरा विजय

विशाखापट्टणम : भारत आणि श्रीलंका यांच्यात पाच सामन्यांची टी ट्वेंटी मालिका सुरू आहे. या मालिकेतील सलग दोन सामने

बुधवारपासून रंगणार विजय हजारे ट्रॉफीचा थरार; बीसीसीआयच्या नियमामुळे स्टार क्रिकेटपटूही मैदानात

मुंबई : विजय हजारे क्रिकेट स्पर्धेचा थरार उद्या म्हणजेच बुधवार २४ डिसेंबरपासून सुरू होत आहे. देशांतर्गत

U19 Asia Cup Vaibhav Suryavanshi : वैभव सूर्यवंशी, आयुष म्हात्रेसह प्रशिक्षकांवरही कारवाई होणार; पाकविरुद्ध फायनलमध्ये दारुण पराभव होताच BCCI अ‍ॅक्शन मोडवर!

मुंबई : पाकिस्तानविरुद्ध अंडर-१९ आशिया कपच्या अंतिम सामन्यात झालेल्या दारुण पराभवानंतर भारतीय क्रिकेट नियामक