LPG Cylinder : गॅस सिलिंडर ५७ रुपयांनी झाला स्वस्त

मुंबई : दिवाळीनंतर तेल कंपन्यांनी आज, व्यावसायिक एलपीजी गॅस सिलिंडरच्या किंमती कमी केल्या आहेत.


तेल कंपन्यांनी १९ किलोच्या व्यावसायिक एलपीजी सिलेंडरची किंमत ५७.५० रुपयांनी कमी केली आहे. नवे दर आजपासून लागू झाले आहेत.


दिवाळीपूर्वी १९ किलोच्या व्यावसायिक सिलिंडरच्या दरात १०१.५० रुपयांची वाढ करण्यात आली होती. मात्र, घरगुती एलपीजी सिलिंडरच्या किंमतीत कोणताही बदल झालेला नाही.


नवीन बदलानंतर, १९ किलोच्या सिलेंडरची किंमत दिल्लीत १७५५.५० रुपये, कोलकात्यात १८८५.५० रुपये, मुंबईत १७२८ रुपये आणि चेन्नईमध्ये १९४२ रुपये प्रति सिलेंडर आहे.


घरगुती सिलिंडरच्या किंमतीत कोणताही बदल झालेला नाही. १४.२ किलोच्या सिलेंडरची किंमत दिल्लीत ९०३ रुपये, कोलकात्यात ९२९ रुपये, मुंबईत ९०२.५० रुपये आणि चेन्नईमध्ये ९१८.५० रुपये प्रति सिलेंडर आहे.

Comments
Add Comment

उच्च न्यायालयाच्या निर्देशांनुसार दिल्लीत अनधिकृत मशिदीवर मनपाची कारवाई, दगडफेक करणाऱ्यांना पोलिसांचा दणका

नवी दिल्ली : दिल्ली उच्च न्यायालयाच्या निर्देशांनुसार एमसीडी अर्थात दिल्ली मनपाने तुर्कमान गेट परिसरातील

Petrol Diesel Price : गुड न्यूज! लवकरच पेट्रोल-डिझेलच्या किमती घसरणार; जाणून घ्या सविस्तर अपडेट

मुंबई : देशात सध्या महागाईचा आलेख सातत्याने उंचावत असून सर्वसामान्यांचे आर्थिक बजेट कोलमडले आहे. जीवनावश्यक

अमेरिकन व्हिसा पाहिजे, तर साडेतेरा लाख जमा करा !

व्हिसा नाकारला गेला तर पैसे परत नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अमेरिकेच्या व्हिसासाठी काही देशांतील नागरिकांना अर्ज

उत्तर प्रदेशमध्ये १५.४४ कोटी मतदारांची सखोल तपासणी

आता उरलेत १२ कोटी ५५ लाखांहून अधिक मतदार नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : उत्तर प्रदेशमध्ये मतदारांची विशेष सखोल चौकशी

सोनिया गांधी रुग्णालयात

नवी दिल्ली : काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या खासदार सोनिया गांधी यांना दिल्लीतील सर गंगाराम रुग्णालयात दाखल

Hydrabad Crime : अमेरिकेत हैदराबादच्या लेकीची निर्घृण हत्या; संशयित माजी रूममेट भारतात पळाला, तामिळनाडूत अटक

हैदराबाद : अमेरिकेतील मेरीलँड राज्यात डेटा आणि स्ट्रॅटेजी ॲनालिस्ट म्हणून कार्यरत असलेल्या निकिता गोडिशला (वय