मुंबई: भारताचा जबरदस्त फलंदाज विराट कोहली आता एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतक ठोकणारा फलंदाज ठराल आहे. कोहलीने न्यूझीलंडविरुद्ध विश्वचषकाच्या सेमीफायनलमध्ये आपले ५०वे शतक ठोकत सचिन तेंडुलकरला मागे टाकले.
न्यूझीलंडविरुद्ध विराट कोहलीने शानदार शतकी खेळी केली. विराट कोहली आता एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके करणारा फलंदाज ठरला आहे. सचिन तेंडुलकरच्या नावावर ४९ एकदिवसीय शतके होती. विराटने आता कोहलीलाही मागे टाकले. कोहलीने २७९व्या डावात आपली ५० शतके पूर्ण केली.
कोहलीने या खेळीदरम्यान आणखी काही रेकॉर्ड आपल्या नावे केले. कोहली आता विश्वचषकाच्या एका हंगामात सर्वाधिक धावा कऱणारा फलंदाजही बनला आहे. कोहलीने ८० धावा करताच त्याने सचिनचा हा रेकॉर्ड तोडला. सचिनने २००३ मध्ये विश्वचषकातल ६७३ धावा केल्या होत्या. कोहली विश्वचषकाच्या एका हंगामात सर्वाधिक ५०हून अधिक धावा करणारा फलंदाज ठरला आहे. कोहलीने याबाबतीत सचिन तेंडुलकरचा रेकॉर्ड तोडला. त्याने २००३च्या हंगामात ७ वेळा ५०हून अधिक धावसंख्या केली होती.
बीसीसीआयने शेअर केला व्हिडिओ
𝙈𝙊𝙉𝙐𝙈𝙀𝙉𝙏𝘼𝙇! 🫡🫡
Virat Kohli surpasses the legendary Sachin Tendulkar and now has the most centuries in Men’s ODIs 👏👏#TeamIndia | #CWC23 | #MenInBlue | #INDvNZ | @imVkohli pic.twitter.com/230u7JAxcJ
— BCCI (@BCCI) November 15, 2023
कोहलीने एकदिवसीय शतकांचे अर्धशतक पूर्ण करताच विराट कोहलीसाठी खास व्हिडिओ शेअर केला आहे. यात त्यांनी कोहलीच्या शतकांचा अर्धशतकीय प्रवास दाखवला आहे.