Nitesh Rane : 'कमरेखाली' घसरलेला संजय राऊत कोणत्या हॉटेलात चड्डी विसरला?

दिवाळीत शिमगा करणा-या राऊतांना आमदार नितेश राणे यांनी फटकारले!


मुंबई : मुख्यमंत्र्यांविरोधात अश्लील भाषा करताना 'कमरेखाली' घसरलेल्या संजय राऊतांना (Sanjay Raut) भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी चांगलेच फटकारले आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांची सकाळी नऊची बांग बंद करण्यासाठी भाजपने आमदार नितेश राणे यांना मैदानात उतरवले. त्यानंतर राऊतांच्या भोंग्याला नितेश राणे यांनी 'जशास तसे' सडेतोड प्रत्युत्तर दिल्याने संजय राऊत बिथरले असून त्यांनी आज चक्क 'कमरेखाली' उतरुन मुख्यमंत्र्यांविरोधात अश्लील टीका केली.


समाजातली गुंडगिरी साफ मोडून काढावी, अन्यायाचा प्रतिकार करावा ही सदगुरू समर्थ रामदास स्वामी यांची शिकवण आहे.
हुंब्यासी हुंबा लाउनी द्यावा | टोणप्यास टोणपा आणावा |
लौदास पुढे उभा करावा | दुसरा लौद || १९/९/२९||
धटासी आणावा धट | उद्धटासी पाहिजे उद्धट |
खटनटासी खटनट | अगत्य करी || १९/९/३०||
समर्थांच्या या शिकवणीनुसार, आज आमदार नितेश राणे यांनी संजय राऊत यांना त्यांच्या भाषेतच चोख प्रत्युत्तर देत ऐन दिवाळीत शिमगा करणा-या राऊतांना अक्षरश: 'नागडे' करुन सोडले आहे.


नितेश राणे म्हणाले, संजय राऊत म्हणे मुख्यमंत्री कोणाची अंडरवेअर घालतायत हे तपासायला हवं. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांबद्दल अशी अश्लील भाषा करताना तुला लाज वाटली नाही? आणि जर भाषा करायचीच असेल तर तुझ्या अंडरवेअरवर नेमकं कोणाचं चिन्ह आहे? मशाल की घड्याळ की हात? अंडरवेअरचीच भाषा करायची असेल तर आयटीसी असो, नोवेटल आणि ताज असो, कोण आपली अंडरवेअर विसरुन बाहेर पळायचा? याच्याही माहितीचा एक वेगळा एपिसोड किंवा इंटरव्ह्यू घेऊ का? असे नितेश राणे यांनी राऊतांना ठणकावले.


आमच्या माहितीनुसार आजकाल तुझा पगार दहा जनपथवरुन येतोय. काँग्रेसचे पवन खेरा आणि वेणूगोपाल यांच्याकडून तुला नेमका किती पगार सुरु आहे? माहिती जर खोटी असेल तर बाळासाहेबांची शपथ घेऊन सांग की काँग्रेस आणि दहा जनपथ, खेराकडून तुला पगार येत नाही, असं आव्हान नितेश राणे यांनी राऊतांना दिलं.



संजय राऊत काड्या लावणारा माणूस


'तोडा आणि राज्य करा' ही भाजपची नीती आहे म्हणे, मग संजय राजाराम राऊत यांना एक आठवण करुन देईन की राजसाहेबांनी जेव्हा शिवसेना सोडली तेव्हा त्यांच्या कार्यकर्त्यांनी तुमची गाडी का फोडली? कारण तुम्ही ठाकरे घराण्यात ज्या काही काड्या, भांडणं लावत होता त्याच्यामुळे तुम्हाला फिरायला पण दिलं नाही. पवार घराण्यात तुम्ही काय काड्या लावल्या आहेत, काय तमाशा केला आहे याची माहिती अगर महाराष्ट्राला दिली तर कोणीच तुम्हाला घरात पण घेणार नाही, अशी परिस्थिती येईल. आताही तुमच्या मालकाच्या घरात तेजस आणि आदित्यमध्ये भांडणं कोण लावतंय? कोण काड्या घालतंय? म्हणून भाजपवर 'तोडा आणि राज्य करा' असे फालतु आरोप करण्यापेक्षा स्वतःचं आधी कॅरेक्टर बघा. कोणाकोणाच्या घरात तुम्ही काड्या लावताय आणि घाणेरडं राजकारण करताय याचा पाढा आम्हाला महाराष्ट्रासमोर वाचावा लागेल, एवढं लक्षात ठेवा, असा सल्ला नितेश राणे यांनी राऊतांना दिला.



संजय राऊत वाटतात खोटी जात सर्टिफिकेट्स


मविआची नेतेमंडळी म्हणतायत पवार साहेबांचं कास्ट सर्टिफिकेट फिरतंय ते नागपूरवरुन आलं आहे. हे भाजपचं षडयंत्र आहे. मग मी मविआच्या लोकांना सांगेन की भाजपवर आरोप करण्याअगोदर तुम्ही ज्या संजय राजाराम राऊतच्या मांडीला मांडी लावून बसताय त्याला विचारा की सुजित पाटकर म्हणजे त्याचा मानसपुत्र त्याला खोटं एसटी (ST) सर्टिफिकेट कोणी काढून दिलं? त्यानुसार कोणकोणत्या योजनांचा फायदा घेतला? याची माहिती संजय राऊतकडून घ्या. न्यायालयामध्ये पण हा विषय आलेला आहे. त्यामुळे आधी संजय राऊतवर कारवाईची मागणी करा आणि मग भाजपवर बोट उचला, असं नितेश राणे म्हणाले.



महाराष्ट्रामध्ये चेहरे वाचणारा नवीन ज्योतिषी रोहित पवार


आजकाल महाराष्ट्रामध्ये चेहरे वाचणारा नवीन ज्योतिषी आला आहे, ज्याला अजितदादांच्या चेहर्‍यावर काय लिहिलंय, फडणवीस साहेब कोणाच्या मागे आहेत या सगळ्याबाबत फार मोठं ज्योतिषशास्त्र कळतं. तो म्हणजे ओसाड गावचा पाटील रोहित पवार (Rohit Pawar). त्याला स्वतःच्या मतदारसंघातल्या मतदारांचा कधी चेहरा वाचायला जमलंच नाही, वेळच मिळाला नाही, कारण त्याला बाहेरचे चेहरे वाचायचेत, पुतिनचा चेहरा वाचायचाय. म्हणून जगभरात काय चाललंय हे पाहण्यापेक्षा या ओसाड गावच्या पाटलाने स्वतःच्या मतदारसंघातील लोकांचे चेहरे वाचावेत, नाहीतर २०२४ ला तुमचा बाजार उठणं निश्चित झालंय हे लक्षात ठेवा, असं नितेश राणे म्हणाले.

Comments
Add Comment

मुंबईहून सुटणाऱ्या लोकमान्य टिळक एक्सप्रेसचा अपघात टळला

मुंबई : उत्तर प्रदेशमधील चित्रकूट येथे एक मोठा रेल्वे अपघात टळला. मुंबईहून भागलपूरला जाणारी लोकमान्य टिळक

मुंबईत घर घेण्याचं स्वप्न स्वप्नच रहाणार, ४२६ फ्लॅट्सची सोडत, पण किंमती आवाक्याबाहेर? वाचा A टू Z

मुंबईत ‘घर’ का परवडेना? किंमत ५४ लाखांपासून १ कोटीपर्यंत! मग 'अत्यल्प व अल्प उत्पन्न' गटाचा नेमका अर्थ काय? मुंबई :

मुंबईमध्ये उभारणार आलिशान 'मरिना'! समुद्र पर्यटनाच्या दृष्टीने मुंबई बंदर प्राधिकरणाचे महत्त्वाचे पाऊल

मुंबई: मुंबईला लाभलेल्या अथांग समुद्राचा आणि समुद्रकिनाऱ्यांचा, समुद्राशी निगडित उपक्रमांसाठी वापर

मुंबईत इंडिया मेरिटाईम वीक परिषदेचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते उद्घाटन

मुंबई : दशकभरात केंद्र सरकारने मेरिटाईम अर्थात सागरी अर्थव्यवस्थेत केलेल्या धोरणात्मक सुधारणांमुळे आज भारत

Ajinkya Rahane : अजिंक्य रहाणेची झुंजार खेळी! १५९ धावांची खेळी करून रहाणेचं मोठं स्टेटमेंट; रोहित-विराटचा दाखला देत टीम इंडियात पुनरागमनाचा ठोकला दावा

मुंबई : रणजी ट्रॉफी २०२५-२६ (Ranji Trophy 2025-26) हंगामाच्या दुसऱ्या राऊंडमध्ये मुंबई संघ (Mumbai Team) छत्तीसगड (Chhattisgarh) विरुद्ध आपला

Kabutarkhana : 'गरज पडल्यास शस्त्र'...कबुतरखान्यांवरील बंदीवरून जैन समाज पुन्हा आक्रमक; जैन मुनींचा थेट 'आमरण उपोषणाचा' इशारा

मुंबई : मुंबईतील कबुतरखान्यांवर बंदी घालण्याच्या सरकारच्या निर्णयामुळे जैन समाज (Jain Community) आक्रमक झाला आहे. या