IND vs NED: सेमीफायनलआधी टीम इंडियाचे टेन्शन वाढले

मुंबई: एकदिवसीय विश्वचषक २०२३मधील शेवटचा लीग सामना भारत आणि नेदरलँड्स यांच्यात रंगत आहे. बंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर हा सामना रंगत आहे. या सामन्यानंतर टीम इंडिया १५ नोव्हेंबरला न्यूझीलंडविरुद्ध सेमीफायनलचा सामना खेळणार आहे. मात्र त्याआधी मोहम्मद सिराजच्या दुखापतीने टीम इंडियाचे टेन्शन वाढवले आहे. कॅच घेताना मोहम्मद सिराज दुखापतग्रस्त झाला आणि मैदानाबाहेर गेला.


डावाच्या १५व्या ओव्हरमध्ये कुलदीप यादवच्या बॉलवर मोहम्मद सिराजकडून कॅच सुटला. मात्र या कॅचने सिराजला दुखापतग्रस्त केले. उंच उडालेला कॅच घेतला सिराजने आपले दोन्ही हात गळ्याच्या अतिशय जवळ ठेवले होते. बॉल सिराजच्या हातून खाली पडत सरळ त्याच्या गळ्याला लागली. यामुळे त्याला त्रास होऊ लागला.


या घटनेनंतर सिराज मैदानाबाहेर गेला. ही घटना १५व्या ओव्हरच्या तिसऱ्या बॉलवर घडली. यावेळी सिराजने कुलदीपच्या बॉलवर डच फलंदाज मॅक्स ओडाऊडचा कॅच सोडला. या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ आयसीसीकडून शेअर करण्यात आला आहे.



अय्यर आणि राहुलची बॅट तळपली


सामन्यात पहिल्यांदा बॅटिंग करताना भारतीय संघाने ५० षटकांत ४ बाद ४१० धावा केल्या. संघासाठी टॉप ५ फलंदाजांनी ५० धावांचा आकडा पार केला. मात्र चार नंबरच्या श्रेयस अय्यर आणि पाचव्या नंबरवर आलेल्या केएल राहुलने शतक ठोकले. अय्यरने नाबाद खेळी करताना ९४ बॉलमध्ये १० चौकार आणि ५ षटकारांच्या मदतीने १२८ धावांची नाबाद खेळी केली. तर राहुलने ६४ बॉलमध्ये ११ चौकार आणि ४ षटकारांच्या मदतीने १०२ धावांची खेळी केली. दोघांनी पाचव्या विकेटसाठी २०८ धावांची भागीदारी केली. ही भारतासाठी विश्वचषकातील चौथे अथवा त्याखालील स्थानासाठीच्या विकेटसाठी सगळ्यात मोठी भागीदारी ठरली.

Comments
Add Comment

Asia Cup: टीम इंडियाने सुपर ४ साठी केले क्वालिफाय, पाकिस्तानचे काय होणार?

दुबई: टीम इंडियाने आशिया कप २०२५च्या सुपर ४ साठी क्वालिफाय केले आहे. आता या ग्रुपमधून दुसरा कोणता संघ क्वालिफाय

पाकिस्तानशी हस्तांदोलन न केल्याबद्दल टीम इंडियावर कारवाई होणार?

नवी दिल्ली: काल भारत आणि पाकिस्तान या दरम्यान दुबईत झालेल्या आशिया चषक २०२५ स्पर्धेत सूर्याच्या टीमने

महिला क्रिकेटपटूंचा एमसीएकडून खास सन्मान!

मुंबईची ऐतिहासिक वाटचाल एका भिंतीवर मुंबई: मुंबई क्रिकेट असोसिएशनने (MCA) महिला क्रिकेटपटूंना अनोख्या पद्धतीने

...म्हणून सूर्याने पाकिस्तानी खेळाडूंशी हात नाही मिळवला, सांगितले हे कारण

मुंबई: आशिया कप २०२५ मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्यात भारताने ७ विकेट राखत विजय मिळवला. या

IND vs PAK: भारताने पाकड्यांना धुतले, ७ विकेट राखत मिळवला विजय

दुबई: आशिया कप स्पर्धेतील सहाव्या सामन्यात भारताने पाकिस्तानवर जबरदस्त विजय मिळवला आहे. पाकिस्तानने

हॉकी आशिया कपमध्ये भारतीय महिला संघ उपविजेता

अंतिम सामन्यात चीनकडून ४-१ ने पराभव बीजिंग : महिला हॉकी आशिया कपमध्ये भारतीय संघ उपविजेता राहिला. हांगझोऊ येथे