Sharad Pawar Vs Ajit Pawar : काही दिवस संकटांचे विस्मरण करून कुटुंबासमवेत दिवस घालवावे लागतात

पवार कुटुंबाच्या एकत्रित दिवाळी साजरी करण्यावर शरद पवारांचं मोठं वक्तव्य


पुणे : राज्यात राजकारणात मोठमोठ्या घडामोडी घडवून आणणारे पवार कुटुंबिय (Pawar family) चार महिन्यांपूर्वी दोन गटांत विभागले गेले. अजित पवार (Ajit Pawar) सत्तेत सामील होत उपमुख्यमंत्री झाले तर शरद पवार (Sharad Pawar) यांनी सरकारच्या विरोधी भूमिका कायम ठेवली. यामुळे दोन्ही गटांत प्रचंड वाद प्रतिवाद झाले. राष्ट्रवादी पक्ष, चिन्ह नेमका कोणाचं, अध्यक्ष कोण इतका हा वाद शिगेला पोहोचला. सध्या यासंबंधी कोर्टास केस सुरु आहे. त्यामुळे प्रत्येक दिवाळी एकत्र साजरं करणारं पवार कुटुंबिय यंदाची दिवाळी (Diwali Festival) एकत्र साजरी करणार का हा मोठा प्रश्नच सगळ्यांना पडला होता. त्यानुसार सणासुदीला एकत्र यायचं ठरवत या कुटुंबाने काल एकत्र दिवाळीचा सण साजरा केला.


डेंग्यूची लागण झाल्याने अजित पवार गेले काही दिवस कोणत्याही सांस्कृतिक अथवा सामाजिक कार्यक्रमात सहभागी झाले नाहीत. अनेक सभांना देखील जाणं त्यांना शक्य झालं नाही. पण काल दिवाळीच्या पहिल्या दिवशी मात्र आपल्या कुटुंबासमवेत वेळ घालवणं अजित पवारांनी पसंत केलं. एकमेकांविषयी टीका करणारे पवार कुटुंबिय काल सणानिमित्त बाणेरमध्ये प्रतापराव पवारांच्या निवासस्थानी जमले होते. यावेळी शरद पवार, अजित पवार, सुप्रिया सुळे (Supriya Sule) हे तिघेही उपस्थित होते.


'माणसाच्या आयुष्यात चढ उतार असतात, अडचणी असतात वेळप्रसंगी अडचणींना तोंड द्यावे लागते पण काही दिवस संकटांचे विस्मरण करून कुटुंबासमवेत दिवस घालवावे लागतात', असं मोठं वक्तव्य यावेळी शरद पवारांनी केलं. यानंतर मात्र अजितदादांनी थेट दिल्लीची वाट धरली आहे. यामुळे आता यंदाच्या दिवाळीत नेमके काय राजकीय फटाके फुटणार याची चर्चा रंगू लागली आहे.

Comments
Add Comment

Sunetra Pawar : 'दादांचे प्रगत, पुरोगामी महाराष्ट्राचे स्वप्न सर्वांच्या साथीने पूर्ण करायचे आहे'

पुणे : दादांनी (अजित पवार) तुम्हाला आणि मला दिलेला हा जो विकासाचा वारसा आहे तो वारसा अर्ध्यावर सोडून देणे हे

Meghna Sakore Bordikar : 'परभणी गुंतवणूक परिषदेतून १,६०० कोटींची गुंतवणूक; स्थानिक युवकांना रोजगाराच्या संधी'

परभणी : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात परभणी जिल्ह्यात उद्योगवाढीसाठी पोषक वातावरण निर्माण

Suman Kale Murder Case : पारधी समाजाच्या सुमन काळे हत्या प्रकरणात राज्य शासनाची नव्याने एसआयटी; विशेष तपास पथक गठित

अहिल्यानगर : अहिल्यानगर येथील पारधी समाजातील सुमन काळे यांच्या सन २००७ मधील संशयास्पद पोलिस कोठडीतील मृत्यू

Ashish Shelar : दहिहंडी उत्सवाला युनेस्कोमध्ये घेऊन जाणार, सांस्कृतिक कार्यक्रम मंत्री अँड आशिष शेलार यांची घोषणा

मुंबई : महाराष्ट्र शासनातर्फे दहिहंडी उत्सवाला युनेस्कोच्या (UNESCO) जागतिक वारसा यादीत नेण्यासाठी प्रयत्न करीत

Prakash Abitkar : गरीब, गरजू रुग्णांच्या अवयव प्रत्यारोपणासाठी कॉर्पस फंडातून मदत द्यावी - आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर

गारगोटी येथे रुबी हॉल क्लिनिकच्या माध्यमातून सुसज्ज डायग्नोस्टिक सेंटर उभे करण्याचे नियोजन रुबी हॉल क्लिनिक

106 Maharashtra Martyrs To Be Honored : संयुक्त महाराष्ट्राच्या १०६ हुतात्म्यांना नव्या प्रशासकीय इमारतीत मानाचे स्थान मिळणार

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मुख्य सचिवांना कार्यवाहीचे निर्देश मुंबई : संयुक्त महाराष्ट्राच्या