Eknath Khadse : ...तर माझ्या आयुष्याचं विमान लँड झालं नसतं!

मुख्यमंत्र्यांचे आभार मानताना एकनाथ खडसे झाले भावूक


मुंबई : काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते आमदार एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांची तब्येत अचानक बिघडली आणि त्यांना हृदयविकाराचा झटका (Heart Attack) आला. त्यांच्या कन्या रोहिणी खडसे (Rohini Khadse) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांना फोन केला असता मुख्यमंत्र्यांनी ताबडतोब एअर ॲम्ब्युलन्सची (Air Ambulance) व्यवस्था केली आणि खडसेंना वेळेवर उपचार मिळण्यात यश आले. सध्या त्यांची प्रकृती ठीक असून ती सुधारत असल्याची माहिती खडसेंनी स्वतः एक ट्विट करत दिली आहे. दरम्यान, वेळप्रसंगी धावून आलेल्या मुख्यमंत्र्यांना फोन करुन खडसेंनी त्यांचे आभार मानले आहेत.


एकनाथ खडसे यांनी मुख्यमंत्र्यांना फोनवरून घडलेला प्रसंग सांगितला. एकनाथ खडसे म्हणाले, 'आपण वेळेवर मदतीला धावून आलात. एअर ॲम्ब्युलन्स पाठवल्याबद्दल मनःपूर्वक आभार. आपलं विमान जर वेळेवर आलं नसतं तर आमच्या आयुष्याचं विमान लँड झालं नसतं'. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी खडसे यांच्या प्रकृतीची विचारपूस करत तब्येतीची काळजी घेण्याचे आवाहन केले. तसेच दिवाळीच्या देखील (Diwali) शुभेच्छा दिल्या.


एकनाथ खडसे यांना हृदयविकाराचा झटका आला होता तेव्हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे साताऱ्यातील त्यांच्या दरे या गावी होते. त्यावेळी तिथून त्यांनी एअर ॲम्ब्युलन्सची व्यवस्था केली आणि खडसेंना जळगावहून मुंबईत आणण्यात आले. मुख्यमंत्र्यांच्या तातडीच्या प्रयत्नाने त्यांचे प्राण वाचले. मुंबईतील बॉम्बे हॉस्पिटलमध्ये एकनाथ खडसे यांच्यावर अँजिओप्लास्टीची शस्त्रक्रिया पार पडली. शस्त्रक्रियेदरम्यान त्यांना हृदयविकाराचा झटका आला होता. डॉक्टरांनी शॉक ट्रीटमेंट देऊन बंद पडलेलं हृदय पुन्हा सुरू केलं.



एकनाथ खडसेंनी मानले हितचिंतकांचे आभार


एकनाथ खडसे यांच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे. एकनाथ खडसे यांनी स्वत: ट्विट करत तब्येत चांगली असल्याची माहिती दिली. एकनाथ खडसे म्हणाले, मला हृदयविकाराचा त्रास झाला. आपण सर्वांनी दिलेल्या शुभेच्छांमुळे माझी तब्येत आता चांगली आहे. लवकरच मी पूर्णपणे बरा होऊन आपल्या सेवेत रुजू होईन. प्रसंग कोणताही असो, आपण माझ्या पाठीशी उभे राहता. आपले हेच सदिच्छांचे पाठबळ मला अधिक जोमाने काम करण्यासाठी बळ देते. आपणा सर्वांचे मन:पूर्वक धन्यवाद, अशा शब्दांत खडसेंनी सर्व हितचिंतकांचे आभार व्यक्त केले आहेत.

Comments
Add Comment

प्रो गोविंदा २०२६ : आर्यन गोविंदा पथकाने सलग दुसऱ्यांदा मारली बाजी; ७५ लाखांचा धनादेश आणि ट्रॉफीवर कब्जा

मुंबई : दहीहंडी उत्सवाचा थरार आणि खेळाडूंचा जोश अनुभवणाऱ्या 'प्रो गोविंदा सीझन ४' (Pro Govinda Season 4 2026) चा अंतिम सामना अत्यंत

Nagpur citizens : काठमांडूमधील नागपूरचे ११० नागरिक सुरक्षित; भारताकडे रवाना

नेपाळमधील काठमांडू येथे गेलेले नागपूर जिल्ह्यातील ११० नागरिक सुरक्षित नागरिकांच्या परतीच्या प्रवासासाठी

Eknath Shinde : राखीच्या धाग्यातून महिलांना मोठी ग्वाही; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं ‘लाडक्या बहिणीं’ना आश्वासन

राखीच्या धाग्यातून महिलांच्या सर्वांगीण विकासाचा शब्द - उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही माविम आणि उमेद

Central Railway : मध्य रेल्वेचा मोठा निर्णय; मुंबई-मडगांव दरम्यान ४ अतिरिक्त गणपती विशेष गाड्या धावणार

Mumbai : गणेशोत्सवाच्या काळात प्रवाशांची होणारी गर्दी लक्षात घेऊन मध्

Mumbai Indians : मुंबईत उतरलं ‘मुंबई इंडियन्स’चं खास विमान; Malaysia Airlinesच्या A330ची पहिली लँडिंग, क्रिकेट चाहत्यांना सुखद धक्का

मुंबई : मुंबई इंडियन्सच्या निळ्या-गोल्डन रंगांनी सजलेलं Malaysia Airlinesचं खास Airbus A330-300 विमान बुधवारी, २६ ऑगस्ट रोजी मुंबईत

Devendra Fadnavis : 'एमपीएससी' पेपरफुटीप्रकरणी कोणालाही सोडणार नाही - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

परीक्षा पद्धतीत सुधारणांसाठी उच्चस्तरीय समितीची स्थापना मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी)