Thursday, July 18, 2024
Homeताज्या घडामोडीDiwali Narakchaturdashi : दिवाळीत उटणं लावण्याची प्रथा का पडली? काय आहेत उटणं...

Diwali Narakchaturdashi : दिवाळीत उटणं लावण्याची प्रथा का पडली? काय आहेत उटणं लावण्याचे फायदे?

धनत्रयोदशीनंतरच्या (Dhanteras) दिवशी म्हणजे नरकचतुर्दशीला (Narakchaturdashi) दिवाळीतलं पहिलं अभ्यंगस्नान (Abhyangasnan) करण्याची प्रथा आहे. यामागची कथा अशी की, नरकासुर (Narakasur) नावाच्या राक्षसाने देशोदेशीच्या १६ हजार उपवर राजकन्यांना आपल्या बंदिवासात ठेवलं होतं. श्रीकृष्णाने अश्विन कृष्ण चतुर्दशीच्या दिवशी नरकासुराचा वध केला आणि त्यांना मुक्त केलं. या सर्व स्त्रियांनी आपल्या सुटकेनंतर दिवे लावून आनंद व्यक्त केला. पुढे तीच प्रथा चालू राहिली.

मरताना नरकासुराने, आजच्या तिथीला जो अभ्यंगस्नान करेल त्याला नरकाची पीडा होऊ नये. तसंच माझा मृत्युदिन सर्वत्र दिवे लावून साजरा केला जावा, अशी श्रीकृष्णापाशी इच्छा व्यक्त केली होती. त्यावर कृष्णाने ही इच्छा पूर्ण होईल असं आश्वासन दिलं होतं. त्यामुळे पहाटे अभ्यंगस्नान या दिवशी करण्याची प्रथा पडली अशी कथा आहे. तसंच या दिवशी पायाखाली कारेटं फळ राक्षसाचं प्रतीक म्हणून चिरडलं जातं आणि नरकासुराचा वध केला जातो.

काय आहेत उटणं लावण्याचे फायदे?

दिवाळीचा सण म्हणजे थंडीला सुरुवात. या काळात त्वचेची काळजी घ्यावी लागते. उटणे त्वचेसाठी उपयुक्त आहे. तसेच ते आयुर्वेदिक (Ayurvedic) पद्धतीने घरच्या घरीही बनवता येऊ शकते. ही पद्धत जाणून घेण्यासाठी वाचा हा लेख – घरच्याघरी आयुर्वेदिक उटणं? जाणून घ्या तयार करण्याची पद्धत…

  • कित्येक जणांना त्वचेवर मुरमं येतात आणि त्याचे डाग पडतात. काही जणांचा चेहरा प्रदुषणामुळे काळा पडतो. तर काहींच्या चेहऱ्यावर सुरकुत्या दिसू लागतात. या समस्यांपासून सुटका मिळविण्यासाठी तुम्ही उटण्याचा वापर करू शकता.
  • आपल्या शरीरावरील नको असलेले केस काढायचे असेल तरीही तुम्ही उटणे वापरू शकता. उटणे हा शरीरावरील केस काढून टाकण्यासाठी नैसर्गिक आणि सुरक्षित पर्याय आहे.
  • उटण्यामुळे चेहऱ्यावर तेज येते. उटण्यामधील नैसर्गिक औषधी गुणांमुळे त्वचा मुलायम व ताजीतवानी होते.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -