मुंबई: आयसीसी एकदिवसीय विश्वचषकाच्या(world cup 2023) सेमीफायनलमध्ये कोणता संघ खेळणार याचे चित्र मोठ्या प्रमाणात स्पष्ट झाले आहे. मात्र त्यावर शिक्कामोर्तब होणे बाकी आहे. न्यूझीलंडच्या(new zealand) संघाने श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात विजय मिळवत सेमीफायनलमधील आपले स्थान पक्के केले आहे. दरम्यान, पाकिस्तानसाठी मात्र सगळेच संपले आहे असे नाही. त्यांना जर स्पर्धेत टिकून राहायचे असेल तर अशक्य ते शक्य करावे लागेल.
पाकिस्तान क्रिकेट संघाचा आयसीसीच्या विश्वचषकातील प्रवास संपल्यातच जमा आहे. मात्र पाकिस्तानी संघासाठी एक आशा अद्याप कायम आहे. न्यूझीलंड आणि श्रीलंका यांच्यात होणाऱ्या सामन्याआधी बाबर आझमच्या संघासाठी जे समीकरण होते ते पूर्ण पणे बदलले आहेत. सामन्याआधी श्रीलंकेच्या विजयासाठी अथवा पावसामुळे सामना रद्द होण्याची प्रार्थना केली जात होती. मात्र यापैकी काहीच घडले नाही. त्यामुळे आता जे समीकरण बनले आहे ते अशक्य वाटत आहे.
पाकिस्तानच्या संघाला सेमीफायनलमध्ये जिंकण्यासाठी सगळ्यात आधी टॉस जिंकावा लागेल आणि इंग्लंडने जिंकल्यास त्यांनी गोलंदाजीचा निर्णय घ्यावा अशी प्रार्थना करावी लागेल. पाकिस्तानला पहिल्यांदा फलंदाजी करताना मोठा स्कोर उभा करावा लागेल आणि इंग्लंडला स्वस्तात बाद करावे लागेल. फक्त ३०० धावांनी त्यांचे काम होणार आहे. मात्र इतका स्कोर केल्यास इंग्लंडला १३ धावांवर ऑलआऊट करावे लागेल. पाकिस्तानने ४०० धावा केल्या तर इंग्लंडला ११२ धावांवर रोखावे लागेल. ४५० धावा केल्यास इंग्लंड संघाला १६२ धावांवर रोखावे लागेल.
सगळ्यात कमालीची बाब म्हणजे पाकिस्तानी संघाने आतापर्यंत एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कधीही ४००ची धावसंख्या उभारलेली नाही. अशातच त्यांना सेमीफायनलचे स्वप्न साकार करण्यासाठी सगळ्यात मोठा वनडे स्कोर उभा करावा लागेल.
मुंबई : इंडियन प्रीमियर लीग २०२५मध्ये आज मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स आमनेसामने होते.…
मुंबई : महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या वतीने फ्रान्समधील कान आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी (Cannes…
मुंबई : सध्या उष्णतेत वाढ होत आहे. घराबाहेर पडताना नागरिक उन्हापासून बचाव करण्यासाठी निरनिराळ्या उपाययोजना…
तुमच्या शरीराला होतील ५ फायदे मुंबई: उन्हाळ्याच्या दिवसात हळू हळू पारा वाढू लागतो.उन्हाळ्यात दुपारी आकाशातून…
सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील प्रसिद्ध न्यूरोसर्जन डॉ. शिरीष वळसंगकर (Dr. Shirish Valsangkar) यांनी राहत्या घरी…
बदलापूर : मध्य रेल्वेच्या प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. अंबरनाथ,टिटवाळा, बदलापूर या ठिकाणाहून मुंबई…