Sunny Leone : सनी लिओनी देणार नविन मॉडेल्सना प्रेरणा!

मुंबई : बॉलीवूड अभिनेत्री सनी लिओनी (Sunny Leone) आता आणखी एक भूमिका बजावण्यासाठी सज्ज झाली असून ती एका नवीन भूमिकेत पाऊल ठेवणार आहे. देशभरातील महत्त्वाकांक्षी मॉडेल्सना प्रेरणा देणा-या आगामी रिअॅलिटी शो 'ग्लॅम फेम' मध्ये ती जज बनणार आहे.


हा एक अनोखा प्लॅटफॉर्म आहे ज्याचा उद्देश भारतातील नव्या मॉडेल्सच्या स्वप्नांना वेगळ्या उंचीवर घेऊन जाणं आहे. सनी लिओनी हिला जज होण्याबद्दलचा विचारले असता ती म्हणते, 'मॉडेल'ला प्रेरणा देऊन त्यांना त्यांच्या करीयरमध्ये पुढे जाण्यासाठी नक्कीच आम्ही मदत करणार आहोत. या शो मधून पुढच्या पिढीच्या महत्त्वाकांक्षी मॉडेल्सना मार्गदर्शन करण्याची अनोखी जबाबदारी माझ्यावर आहे आणि यासाठी मी उत्सुक आहे. माझा विश्वास आहे की मॉडेलने सध्याचा ट्रेंड समजून घेतला पाहिजे आणि हे व्यासपीठ प्रतिभावान तरुणांना स्फूर्ती देणार आहे.


या ग्राऊंडब्रेकिंग शोमध्ये अभिनेता नील नितीन मुकेश आणि ईशा गुप्ता यांच्यासमवेत सनी लिओनी एका प्रतिष्ठित जजिंग पॅनेलचा भाग असेल. 'ग्लॅम फेम' स्पर्धकांना या उल्लेखनीय व्यक्तींच्या सखोल अंतर्दृष्टीचा लाभ घेण्याची अनोखी संधी प्रदान करते. याव्यतिरिक्त, रोहित खंडेलवाल, संतोषी शेट्टी, दिनेश शेट्टी आणि प्रसिद्ध फॅशन आणि लाइफस्टाइल फोटोग्राफर डब्बू रतनानी यांसारखे मार्गदर्शक याचा भाग बनणार आहेत.


व्हॉटवर प्रॉडक्शन आणि कृष्णा कुंज प्रॉडक्शनची सहनिर्मिती असलेला 'ग्लॅम फेम' लवकरच जिओ सिनेमावर प्रदर्शित होणार आहे. हा शो महत्त्वाकांक्षी मॉडेल्सना तज्ञांकडून शिकण्याची आणि स्वतःचे मार्ग तयार करण्याची संधी देऊन मॉडेलिंग उद्योगात बदल घडवून आणेल. सनी लिओनी अनुराग कश्यपच्या निओ-नॉयर थ्रिलर 'केनेडी', राहुल भट्ट अभिनीत आणि जॅकी श्रॉफ, प्रियामणी आणि सारा अर्जुनसह तिचा तमिळ पदार्पण, 'कोटेशन गँग' साठी उत्साहित आहे.

Comments
Add Comment

‘दशावतार’ची छप्पर फाड कमाई !

मुंबई : सुबोध खानोलकर दिग्दर्शित 'दशावतार' चित्रपटाने पहिल्या आठवड्यात उत्तम कामे केली. या चित्रपटाने सहाव्या

कपिल शोच्या ग्रँड फिनालेत अक्षय कुमारचा जलवा !

मुंबई : ‘द ग्रेट इंडियन कपिल शर्मा शो’च्या तिसऱ्या सीझनचा समारोप अतिशय धमाल आणि भावनिक क्षणांनी झाला . या भागाचे

मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे 'जॉली एलएलबी ३' च्या निर्मात्याला दिलासा !

मुंबई : अक्षय कुमार आणि अर्शद वारसी यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या 'जॉली एलएलबी ३' या चित्रपटाविरोधात दाखल

पीएम मोदी बायोपिकची घोषणा

साऊथ स्टार उन्नी मुकुंदन होणार 'पंतप्रधान' मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनावर आधारित आणखी एक बायोपिक

Dashavtar Box Office Collection: दशावतारच्या कमाईत होतेय जबरदस्त वाढ, कमावले तब्बल इतके कोटी...

मुंबई: बॉलिवूडपासून ते दाक्षिणात्य सिनेमांपर्यंत सर्वांवर सध्या मराठी सिनेमा दशावतार भारी पडत आहे. दिवसेंदिवस

अभिनेत्री दिशा पटानीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या दोन आरोपींचा पोलिसांकडून एन्काऊंटर

मुंबई: अभिनेत्री दिशा पटानीच्या बरेली येथील घरावर गोळीबार करणाऱ्या दोन आरोपींचा पोलिसांनी एन्काऊंटरमध्ये