World Cup 2023: श्रीलंकेला हरवत पॉईंट्स टेबलमध्ये बांगलादेशने घेतली मोठी उडी

मुंबई: बांगलादेशने वर्ल्डकपच्या इतिहासात पहिल्यांदा श्रीलंकेला हरवले. श्रीलंकेच्या संघाला ३ विकेटनी पराभवाचा सामना करावा लागला. या विजयासह शाकिब अल हसनच्या नेतृत्वातील बांगलादेश संघाने पॉईंट्स टेबलमध्ये उडी घेतली आहे. तर श्रीलंकेचा संघाला मात्र नुकसान सोसावे लागले.


आता बांगलादेशचा संघ पॉईंट्सटेबलवर सातव्या स्थानावर पोहोचला आहे. याआधी सातव्या स्थानावर श्रीलंकेचा संघ होता. मात्र श्रीलंकेचा संघ आठव्या स्थानावर पोहोचला आहे. याआी श्रीलंकेचा संघ सातव्या स्थानावर होता. मात्र आता श्रीलंकेचा संघ खाली घसरला आहे.



बांगलादेश-श्रीलंकेचे गुण समान मात्र


बांगलादेश आणि श्रीलंकेचे ४-४ गुण आहेत. मात्र चांगल्या रनरेटमुळे बांगलादेशचा संघ पॉईंट्स टेबलमध्ये श्रीलंकेच्या वर आहे. सोबतच या वर्ल्डकपमध्ये बांगलादेश आणि श्रीलंकेचे आव्हान संपुष्टात आले आहे.



भारत आणि दक्षिण आफ्रिका सेमीफायनलमध्ये


भारत आणि दक्षिण आफ्रिकेच्या संघाने सेमीफायनलसाठी क्वालिफाय केले आहे. भारताचे ८ सामन्यात १६ पॉईंट्स आहेत. रोहित शर्माच्या नेतृत्वात भारतीय संघाने आपले सर्व सामने जिंकले आहेत. दक्षिण आफ्रिकेचे ८ सामन्यांत १२ पॉईंट आहेत. यानंतर पॉईंट्स टेबलमध्ये तिसऱ्या स्थानावर ऑस्ट्रेलिया आहे. ऑस्ट्रेलियाचे ७ सामन्यात १० पॉईंट्स आहेत. तर चौथ्या स्थानावर न्यूझीलंड आहे त्यांचे ८ सामन्यात ८ पॉईंट्स आहेत.



पाकिस्तान सेमीफायनलच्या शर्यतीत कुठे


बाबर आझमच्या नेतृत्वात खेळणाफ्या पाकिस्तान संघाचे ८ सामन्यात ८ गुण आहेत. तर अफगाणिस्तानचेही ८ सामन्यात ८ गुण आहेत मात्र चांगल्या रनरेटमुळे पाकिस्तान अफगाणिस्तानच्या पुढे आहे. याच पद्धतीने न्यूझीलंडशिवाय पाकिस्तान आणि अफगाणिस्तानचे ८-८ पॉईंट्स आहेत. दरम्यान, अफगाणिस्तानने न्यूझीलंड आणि पाकिस्तानच्या तुलनेत एक सामना कमी खेळला आहे.

Comments
Add Comment

टी-२० गोलंदाजांच्या क्रमवारीत बुमराहची १० स्थानांची झेप

मुंबई : टी-२० गोलंदाजांच्या क्रमवारीत भारतीय वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने १० स्थानांची झेप घेतली आहे.

खेळाडूंच्या सुरक्षेसाठी प्रेक्षकांनाच सामना पाहण्यास बंदी!

विराट कोहली १५ वर्षांनी विजय हजारे ट्रॉफी खेळणार नवी दिल्ली : येत्या २४ डिसेंबरपासून देशातील सर्वात मोठ्या

बीसीसीआयच्या निर्णयामुळे महिला क्रिकेट खेळाडूही होणार मालामाल

देशांतर्गत क्रिकेटपटूंच्या मॅच फीमध्ये दुप्पट वाढ मुंबई : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने महिला

मुंबईकर जेमिमाह रॉड्रिग्सकडे दिल्ली कॅपिटल्सच्या कर्णधारपदाची धुरा

मुंबई : मुंबईकर जेमिमाह रॉड्रिग्स हीने भारतीय संघाला आयसीसी वनडे वर्ल्ड कप २०२५ ट्रॉफी जिंकून देण्यात प्रमुख

श्रीलंकेविरुद्धच्या टी ट्वेंटी मालिकेत भारताचा सलग दुसरा विजय

विशाखापट्टणम : भारत आणि श्रीलंका यांच्यात पाच सामन्यांची टी ट्वेंटी मालिका सुरू आहे. या मालिकेतील सलग दोन सामने

बुधवारपासून रंगणार विजय हजारे ट्रॉफीचा थरार; बीसीसीआयच्या नियमामुळे स्टार क्रिकेटपटूही मैदानात

मुंबई : विजय हजारे क्रिकेट स्पर्धेचा थरार उद्या म्हणजेच बुधवार २४ डिसेंबरपासून सुरू होत आहे. देशांतर्गत