मुंबई: मुंबईच्या वानखेडे स्टेडियममध्ये ग्लेन मॅक्सवेलने दुहेरी शतक ठोकत इतिहास रचला. मॅक्सवेलने आव्हानाचा पाठलाग करताना जबरदस्त खेळी करत ऑस्ट्रेलियाला हरलेला डाव जिंकून दिला. ऑस्ट्रेलियाने ९१ धावांवर जिथे ७ विकेट गमावलेले असताना मॅक्सवेल संघासाठी धावून आला.
अफगाणिस्तानचा संघ आज विजय मिळवेल असे वाटत होते मात्र मॅक्सवेल त्यांच्या तोंडातून विजयाचा घास हिरावून घेतला. मॅक्सवेलने २०१ धावांची नाबाद खेळी करत आपल्या संघाला सेमीफायनलमध्ये पोहोचवले. या विजयासह सेमीफायनलमध्ये पोहोचणारा ऑस्ट्रेलिया तिसरा संघ ठरला आहे.
अफगाणिस्तानने पहिल्यांदा फलंदाजी करताना २९१ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरादाखर ऑस्ट्रेलियाने ९१ धावांवर सात विकेट गमावल्या.त्यानंतर मॅक्सवेल आणि कमिन्सने २०२ धावांची नाबाद भागीदारी केली आणि अफगाणिस्तानच्या तोंडून विजयाचा घास हिरावून घेतला.