Interest Rates: पोस्ट ऑफिस की बँक, RDवर कुठे मिळेल जास्त फायदा

मुंबई: भारतीय कुटुंबांना छोटी छोटी बचत करून भविष्यासाठी पैसा जमा करण्याची चांगली सवय आहे. या छोट्या सेव्हिंग स्कीमसाठी बँक तसेच पोस्ट ऑफिसमधील(post office) रिकरिंग डिपॉझिटला(RD) पसंती दिली जाते. ऑक्टोबर-डिसेंबर तिमाहीत पोस्ट ऑफिसने आरडीवरील व्याजदर ६.७ टक्के केले आहे. त्यामुळे तुम्ही बँकेत की पोस्ट ऑफिसमध्ये गुंतवणूक करावी घ्या जाणून...

रिकरिंग डिपॉझिट म्हणजे काय?


आरडी एक प्रकारचा सिस्टमेटिक सेव्हिंग प्लान आहे जिथे तुम्ही दर महिन्याला बचत करून काही पैसे काही वर्षांपर्यंत जमा करू शकता. हा पैसा आरडीचा कालावधी पूर्ण झाल्यावर व्याजासह परत मिळतो. याला मध्यमवर्गातील लोकांची मोठी पसंती असते.

बँक आणि पोस्ट ऑफिसमध्ये RD वेगळी कशी


बँक आणि पोस्ट ऑफिसमधील RDमध्ये सगळ्यात मोठे अंतर वेळेचे आहे. बँक तुम्हाला RD साठी ६ महिने ते पाच वर्षांपर्यंतचा कालावधी निवडण्याची संधी देते तर पोस्ट ऑफिसमध्ये केवळ पाच वर्षांची RD होऊ शकते.

व्याजदरात किती आहे फरक


जर आरडीवरील व्याजदराबाबत बोलायचे झाल्यास काही खासगी बँकाच पोस्ट ऑफिसच्या पुढे आहेत. अधिकतर बँक एफडीवर पोस्ट ऑफिसपेक्षा कमी व्याज देतात. एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक, एक्सिस बँक, कॅनरा बँक आणि बँक ऑफ बडोदा अधिक व्याजदर देत आहेत. यांचे व्याजदर ६.७५ टक्के ते ७ टक्क्यांपर्यंत आहेत.

कोण सुरू करू शकतं खाते


आरडी खाते सुरू करण्यासाठी तुम्हाला भारताचा नागरिक असणे आवश्यक आहे. जर तुमचे वय १० वर्षांपेक्षा कमी आहे तर तुम्ही अभिभावकासह खाते खोलू शकता.

किती रूपयांनी सुरू करू शकता गुंतवणूक


पोस्ट ऑफिसमध्ये तुम्ही कमीत कमी १०० रूपये प्रती महिना बचत करू शकता. जास्तीत जास्त तुम्ही कितीही पैसे टाकू शकता.
Comments
Add Comment

Udhampur Accident: धमपूरमध्ये टँकरची डंपरला जोरदार धडक लागताच लागली भीषण आग; महामार्गावर थरकाप उडवणारी परिस्थिती

उधमपूर : जम्मू-काश्मीरमधील उधमपूर परिसरात जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्गावर काल रात्री उशिरा तेल टँकर आणि

Narendra Modi : आधुनिक क्रीडा परिसंस्था उभारण्यासाठी केंद्र सरकार कटिबद्ध; पंतप्रधान नरेंद्र मोदी

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले की, २१ व्या शतकासाठी आधुनिक क्रीडा परिसंस्था उभारण्यास

Kanpur Plane Crash : धक्कादायक! कानपूरमध्ये प्रशिक्षण विमान शेतात कोसळले; अनुभवी पायलटसह सह-पायलटचा अंत

कानपूर : उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) कानपूर (Kanpur) येथे एक अत्यंत दुःखद घटना घडली आहे. गुरुवारी गंगा नदीच्या

Rule Change From 1st September : LPG गॅस सिलेंडर, आयटीआर अन् थेट तुमच्या...; १ सप्टेंबरपासून बदलणार ५ मोठे नियम!

ऑगस्ट महिना (August Month) अखेरच्या टप्प्यात आला असून १ सप्टेंबरपासून देशात अनेक महत्त्वाच्या आर्थिक आणि प्रशासकीय

Nepal Floods Impact on Bihar and UP : नेपाळच्या पुराचा बिहार-उत्तर प्रदेशालाही धोका; ७ जिल्ह्यांना अलर्ट, पुढील ४८ तास महत्त्वाचे

पाटणा : नेपाळमध्ये आलेल्या भीषण पुराचा परिणाम आता भारतातील सीमावर्ती राज्यांवरही होण्याची शक्यता आहे.

Dating App Gang : 'नको तेच केलं!' डेटिंग ॲपवरून तरुणाला जाळ्यात ओढले अन्...; जयपूरमध्ये ‘गे डेटिंग ॲप गँग’चा पर्दाफाश

जयपूर : गे डेटिंग ॲप्सच्या माध्यमातून तरुणांशी मैत्री करून त्यांना भेटण्यासाठी बोलावायचे आणि त्यानंतर हल्ला