World cup 2023: भारताची कमाल, दक्षिण आफ्रिकेवर २४३ धावांनी दणदणीत विजय

कोलकाता: भारताने विश्वचषकातील(world cup 2023) आपला विजयरथ दक्षिण आफ्रिकेविरुद्ध(south africa) कायम राखला आहे. भारताने आपल्या आठव्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेवर तब्बल धावांनी विजय मिळवला. भारताने पहिल्यांदा फलंदाजी करताना विराट कोहलीच्या दमदार शतकाच्या जोरावर ५ बाद ३२६ धावा केल्या होत्या. त्यानंतर आफ्रिकेचा संपूर्ण संघ धावांवर गडगडला.


भारताने पहिल्यांदा फलंदाजी करताना ५ बाद ३२६ धावा केल्या. यात विराट कोहलीचे शतक खास ठरले. आपल्या वाढदिवसाच्या दिवशी कोहलीने वनडेतील ४९वे शतक ठोकत सचिन तेंडुलकरच्या विक्रमाशी बरोबरी केली. भारताचा कर्णधार रोहित शर्माने ४० धावा केल्या तर शुभमन गिलने २३ धावा केल्या. त्यानंतर तिसऱ्या स्थानावर आलेल्या विराट कोहलीने १०१ धावांची जबरदस्त खेळी केली. यात त्याने १० चौकार ठोकले. तर श्रेयस अय्यरने त्याला चांगली साथ दिली. अय्यरने ७७ धावा ठोकल्या.


त्यानंतर आलेल्या के एल राहुलने ८ धावा केल्या. तर सूर्यकुमार यादवने २२ धावांची खेळी केली. दक्षिण आफ्रिकेकडून मार्को जेसन, लुंगी एनगिडी, कागिसो रबाडा, केशव महाराज, तबरेझ शाम्सी यांनी प्रत्येकी एक विकेट घेतला.


त्यानंतर भारताने दिलेले ३२७ धावांचे आव्हान घेऊन दक्षिण आफ्रिकेचा संघ मैदानात उतरला. मात्र भारताचे गोलंदाज जबरदस्त मारा करत राहिले आणि आफ्रिकेचा संपूर्ण संघ केवळ ८३ धावाच करू शकला. रवींद्र जडेजाने या सामन्यात पाच विकेट घेत आफ्रिकेच्या फलंदाजांना सळो की पळो करून सोडले.


आफ्रिकेकडून एकही फलंदाजांला चांगली कामगिरी करता आलेली नाही. क्विंटन डी कॉकने ५ धावा केल्या. टेम्बा बावुमाने ११, रासी वॅन डेर डुसेन १३, एडन मार्करमने ९ धावा केल्या. डेविड मिलरने ११ धावांची खेळी केली. तर मार्को जेन्सनने १४ धावा केल्या.

Comments
Add Comment

Asia Cup: टीम इंडियाने सुपर ४ साठी केले क्वालिफाय, पाकिस्तानचे काय होणार?

दुबई: टीम इंडियाने आशिया कप २०२५च्या सुपर ४ साठी क्वालिफाय केले आहे. आता या ग्रुपमधून दुसरा कोणता संघ क्वालिफाय

पाकिस्तानशी हस्तांदोलन न केल्याबद्दल टीम इंडियावर कारवाई होणार?

नवी दिल्ली: काल भारत आणि पाकिस्तान या दरम्यान दुबईत झालेल्या आशिया चषक २०२५ स्पर्धेत सूर्याच्या टीमने

महिला क्रिकेटपटूंचा एमसीएकडून खास सन्मान!

मुंबईची ऐतिहासिक वाटचाल एका भिंतीवर मुंबई: मुंबई क्रिकेट असोसिएशनने (MCA) महिला क्रिकेटपटूंना अनोख्या पद्धतीने

...म्हणून सूर्याने पाकिस्तानी खेळाडूंशी हात नाही मिळवला, सांगितले हे कारण

मुंबई: आशिया कप २०२५ मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्यात भारताने ७ विकेट राखत विजय मिळवला. या

IND vs PAK: भारताने पाकड्यांना धुतले, ७ विकेट राखत मिळवला विजय

दुबई: आशिया कप स्पर्धेतील सहाव्या सामन्यात भारताने पाकिस्तानवर जबरदस्त विजय मिळवला आहे. पाकिस्तानने

हॉकी आशिया कपमध्ये भारतीय महिला संघ उपविजेता

अंतिम सामन्यात चीनकडून ४-१ ने पराभव बीजिंग : महिला हॉकी आशिया कपमध्ये भारतीय संघ उपविजेता राहिला. हांगझोऊ येथे