मुंबई : बिग बॉस विजेता (Bigg Boss Winner) एल्विश यादव (Elvish Yadav) याचा ड्रग्ज प्रकरणाशी (Drugs case) संबंध आढळल्याने राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरा झाडायला सुरुवात झाली आहे. ड्रग्जमाफियांचे संरक्षण करणारे असं म्हणत प्रतिपक्षातील नेत्यांना टार्गेट केलं जात आहे. त्यातच राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनीदेखील या प्रकरणावर भाष्य केलं आहे. ड्रग्ज व्यवसायात कोणत्याही नेत्याचा संबंध असो, त्याला ठेचून काढलंच पाहिजे असं वक्तव्य मुनगंटीवार यांनी केलं.
सुधीर मुनगंटीवार म्हणाले, जी लोकं ड्रग्जशी संबंधित असतात त्यांना सोडलं नाही पाहिजे, ठेचून काढलं पाहिजे. यात दुमत असण्याचं काहीही कारण नाही. काँग्रेसचे असे अनेक नेते आहेत ज्यांच्याकडे नशेच्या पदार्थांचे लायसन्स आहेत. मुळात राजकीय नेते, आमदार, खासदार आणि त्यांच्या नातेवाईकांकडे नशेच्या पदार्थांचं लायसन्स नसलं पाहिजे. तसा नियमच पाहिजे. दारुविक्रीचे परवाने असलेले काँग्रेसचे अनेक नेते आहेत. त्यांची यादीच माझ्याकडे आहे, असा मुनगंटीवार यांनी काँग्रेसवर थेट आरोप केला आहे.
अजित पवार यांच्या मुख्यमंत्री पदाच्या इच्छेबाबात मुनगंटीवार यांना विचारण्यात आलं. त्यावेळी ते म्हणाले, एखाद्या नेत्यानं मुख्यमंत्री व्हावं ही इच्छा व्यक्त करण्यात गैर काहीच नाही. अपात्रतेच्या सुनावणीत काही अघटीत घडायचंच असेल तरी त्याचा मुख्यमंत्रीपदाशी काहीच संबंध नाही. देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलंच आहे की विधानपरिषदेचा मार्ग मोकळा आहे. एकनाथ शिंदेंच्याच माध्यमातून २०२४ च्या निवडणूका लढवणार असल्याचे मुनगंटीवार म्हणाले.
राज्यातील सत्ता संघर्षाबाबत बोलताना मुनगंटीवार म्हणाले की, सर्वोच्च न्यायालयाने अमुक एका बाजूने निर्णय द्या, असं सांगितलं नाही. निर्णय वेगाने व्हावा ही सर्वसामान्य भावना असू शकते असं मुनगंटीवार म्हणाले. जो हरणारा असतो तो निवडणुकीत प्रतिस्पर्ध्यावर पैसे वाटण्याचा आरोप करतोच. भाजपचा कोणी कार्यकर्ता काटेवाडीत प्रतिस्पर्ध्यावर पैसे वाटत असल्याचा आरोप करत असतील तर तो हरणारा असेल. आम्ही जर प्रतिस्पर्ध्यावर पैसे वाटत असल्याचा आरोप करत असु तर पराभवाच्या मानसिकतेत जात असू असं मुनगंटीवार म्हणाले.
भारत-पाकिस्तान सीमेवर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं उद्या अनावरण होणार आहे. मुख्यमंत्र्यांसह उद्या आम्ही पुतळ्याचं अनावरण करणार आहोत असे मुनगंटीवार म्हणाले. आम्ही पुणेकर या संस्थेच्या मदतीनं ४१ आरआर बटालियन -कुपवाडा येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा मोठा पुतळा उभा केला आहे. सीमेवरील सैन्य दररोज या पुतळ्याची पूजा करणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा राजदरबार किंवा दृक-श्राव्य पद्धतीचा अनोखा पुतळा नव्या संसद भवनात उभारण्याचा मानस असल्याचेही मुनगंटीवार म्हणाले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचं हे ३५० वं वर्ष असल्याच्या निमित्ताने विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं आहे. राज्यात शिवाजी महाराजांची माहिती देणारं जगातील सर्वात मोठं संग्रहालय तयार करणार आहे. तर लंडनमधील वाघनखे लवकरच दर्शनाकरता राज्यात येणार असल्याचे मुनगंटीवार म्हणाले.
नवी दिल्ली : देशातील सर्वात स्पर्धात्मक परीक्षांपैकी एक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या UPSC CSE मध्ये दरवर्षी…
मुंबई : 'मुंबईतील लँड स्कॅमचा बादशाह जर कोणी असेल, तर तो उद्धव ठाकरेच!' अशा शब्दांत…
कोविड महामारी दरम्यान संसर्ग झालेल्या लोकांना हृदयरोगांचा धोका सर्वाधिक मुंबई: गेल्या वर्षातील आकडेवारी पाहिल्यास असे…
पुणे : विद्येचं माहेरघर असणाऱ्या पुण्यात गुन्हेगारीचं क्षेत्र वाढतं चाललं आहे. दररोज कोणत्या ना कोणत्या…
मुंबई : झी मराठी (Zee Marathi) वाहिनीवर पाच वर्षांपूर्वी 'देवमाणूस' (Devmanus) ही मालिका सुरु झाली…
मुंबई: "भिऊ नको मी तुज्या पाठीशी आहे" संकट काळात स्वामी समर्थांच हे वाक्य जगण्यासाठी नवी…