Short and Sweet : ‘शॉर्ट अॅण्ड स्वीट’मध्ये सोनालीचे आई-बाबा

  45


  • ऐकलंत का! : दीपक परब


सध्या प्रेक्षक गणेश दिनकर कदम दिग्दर्शित ‘शॅार्ट अॅण्ड स्वीट’ या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहात आहेत. या चित्रपटात सोनाली कुलकर्णी, हर्षद अतकरी, श्रीधर वत्सर आणि रसिका सुनील यांच्या प्रमुख भूमिका असून यात आणखीही दोन नवोदित कलाकार झळकणार आहेत. हे नवोदित कलाकार आहेत सोनालीचे आई - बाबा. पुण्यात चित्रीकरण असल्याने सोनालीचे आई-बाबा तिला सहजच सेटवर भेटायला गेले होते. त्यावेळी बसमधील प्रवास करतानाचा सीन चित्रित होत होता. सोनालीचे आई-बाबा तिथेच असल्याने दिग्दर्शकांनी त्यांना अभिनय करण्याची संधी दिली. दिग्दर्शकांनी दिलेल्या संधीला मान देत त्यांनीही अभिनय करण्याची संधी स्वीकारली. या चित्रपटात ते सहप्रवाशाच्या भूमिकेत झळकणार आहेत. आपल्या मुलीसोबत काम करण्याचा आनंद काही औरच आहे, अशा शब्दांत सोनालीच्या आई-बाबांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या, तर सोनालीही आई-बाबांसोबत काम करण्याच्या अनुभवाने कमालीची आनंदली आहे. शुभम प्रोडक्शन निर्मित या चित्रपटाचे पायल गणेश कदम, विनोद राव निर्माते आहेत. हा चित्रपट शुक्रवार ३ नोव्हेंबरपासून चित्रपटगृहात प्रदर्शित झाला आहे.

Comments
Add Comment

निसर्गवाचक हरपला...

प्रसिद्ध निसर्ग अभ्यासक : किरण पुरंदरे अरण्यऋषी, वन्यजीव अभ्यासक पद्मश्री मारुती चितमपल्ली म्हणजे निसर्गातील

चला जाऊ शाळेला!

मृदुला घोडके परवा माझ्या एका मैत्रिणीला फोन करत होते. २-४ वेळा बेल वाजली पण तिने उचलला नाही... काही मेसेजही नाही...

थोर विचारवंत पांडुरंगशास्त्री आठवले

कोकण आयकॉन : सतीश पाटणकर योगेश्वर कृषी, वृक्षमंदिर, मत्स्यगंधा, घरमंदिर अशा एकापेक्षा एक विलक्षण सामाजिक

आषाढ : मनोकामना पूर्ण करणारा महिना

विशेष : मृणालिनी कुलकर्णी जेव्हा जुलैमध्ये सूर्य कर्क राशीत प्रवेश करतो तेव्हा हिंदू पंचागानुसार आषाढ हा

कृत्रिम बुद्धिमत्ता

ओंजळ : पल्लवी अष्टेकर आजचे जग स्मार्ट झालेय, पण आपणही तितकेच स्मार्ट झालोय का? मोबाइल हातात घेणाऱ्या प्रत्येक

‘इधर तो जल्दी जल्दी हैं...’

नॉस्टॅल्जिया : श्रीनिवास बेलसरे गझल हा काव्यप्रकार लोकप्रिय करण्यात जगजीत सिंग आणि चित्रा सिंग या जोडीचे