मुंबई: भारतीय संघ आज दक्षिण आफ्रिकेसोबत सामना खेळत आहे. भारत(india) आणि दक्षिण आफ्रिका(south africa) यांच्यात विश्वचषक २०२३मधील(world cup 2023) ३७वा सामना कोलकाताच्या ईडन गार्डन मैदानावर खेळवला जात आहे. हा सामना विराट कोहलीसाठी(virat kohli) खास आहे. कोहली आपल्या वाढदिवसाच्या दिवशी सामना खेळत आहे. तो ३५ वर्षांचा झाला आहे. विराटने आपल्या करिअरदरम्यान अनेक जबरदस्त खेळी केल्या आहेत. यासोबतच अनेक रेकॉर्डही केले आहेत. त्याला आपल्या वाढदिवसाच्या दिवशी इतिहास रचण्याची संधी आहे.
विराटने वनडेमध्ये आतापर्यंत ४८ शतके ठोकली आहे. या फॉरमॅटमध्ये तो सर्वाधिक शतक ठोकण्याच्या बाबती सचिन तेंडुलकरची बरोबरी करू शकतो. कोहलीला यासाठी एका शतकाची आवश्यकता आहे. सचिनने ४९ वनडे शतक ठोकले आहेत. तर विराटने २८८ वनडे सामन्यात ४८ शतके ठोकली आहेत. कोहली आपल्या वाढदिवसाच्या दिवशी चाहत्यांना नक्कीच गिफ्ट देऊ शकतो. यासाठी त्याला खूप मेहनत करावी लागेल. द. आफ्रिकेचा संघ फॉर्मात आहे आणि त्यांचे गोलंदाज कोणत्याही परिस्थितीत कोहलीला रोखण्याचा प्रयत्न जरूर करतील.
विराटने भारतासाठी अनेक अविस्मरणीय खेळी केल्या आहेत. त्याने आतापर्यंत खेळलेल्या २८८ वनडे सामन्यात १३५३५ धावा केल्या आहेत. या दरम्यान त्याने २९ शतके आणि २९ अर्धशतके ठोकली आहेत. यासोबतच त्याने ७ वेळा दुहेरी शतक ठोरले आहे. विराटने ११५ टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये ४००८ धावा केल्या आहेत. या फॉरमॅटमध्ये एक शतक आणि ३७ अर्धशतके ठोकली आहेत.
कोलकाता: इंडियन प्रीमियर लीग २०२५मध्ये कोलकाता नाईट रायडर्सचा गुजरात टायटन्सविरुद्ध लाजिरवाणा पराभव झाला आहे. गुजरातने…
२४ एप्रिलला एकनाथ शिंदे यांची शक्तिप्रदर्शन सभा! सिंधुदुर्ग : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ…
माजी नगरसेवक राकेश कांदे यांचा वैभव नाईकांना थेट इशारा सिंधुदुर्ग : चेंदवण येथील सिद्धिविनायक उर्फ…
लहान नाल्यातील गाळ काढण्यापूर्वीचे आणि नंतरचे सीसीटीव्हीद्वारे चित्रीकरण मुंबई (खास प्रतिनिधी): पावसाळापूर्व कामांचा भाग म्हणून…
PM Modi : आजची धोरणे, निर्णय पुढील हजार वर्षांच्या भविष्याला आकार देणार आहेत : पंतप्रधान…
World Earth Day 2025: आपली शक्ती, आपला ग्रह - विश्व पृथ्वी दिन २०२५ मुंबई :…