Monday, May 12, 2025

क्रीडाताज्या घडामोडी

World Cup 2023: अफगाणिस्तानच्या विजयाने पॉईंटटेबलमध्ये मोठा बदल, इंग्लंड १०व्या स्थानी

World Cup 2023: अफगाणिस्तानच्या विजयाने पॉईंटटेबलमध्ये मोठा बदल, इंग्लंड १०व्या स्थानी

मुंबई: अफगाणिस्तान संघाचा यंदाच्या विश्वचषकातील आतापर्यंतचा प्रवास हा ऐतिहासिक राहिला आहे. संघाने लखनऊच्या इकाना स्टेडियममध्ये नेदरलँड्सला ७ विकेटनी हरवत स्पर्धेतील चौथा विजय मिळवला. या विजयासह अफगाणिस्तान पॉईंट टेबलमध्ये पाचव्या स्थानावर पोहोचला आहे. त्यांनी पाकिस्तानला मागे टाकले.


आपल्या चौथ्या विजायननंतर अफगाणिस्तान संघाचे गुण न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्याबरोबर झाले आहेत. तर गतविजेता इंग्लंडचा संघ दहाव्या स्थानावर आहे.


अफगाणिस्तानने या स्पर्धेत आतापर्यंत ७ सामने खेळलेत यात ४ मध्ये त्यांनी विजय मिळवला. तर अफगाणिस्तानच्या खाली असलेल्या पाकिस्तानने ७ पैकी तीन सामन्यात विजय मिळवला. अशातच अफगाणचा संघ पुढील सामन्यात विजयासाठी पुरेपूर प्रयत्न करून सेमीफायनलसाठी दावा ठोकू शकतो.



टॉप ४मध्ये कोणताही बदल नाही


टॉप ४मध्ये यजमान भारत १४ गुणांसह अव्वल स्थानी आहे. यानंतर दक्षिण आफ्रिका १२ गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे. त्यानंतर ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड अनुक्रमे ८-८ गुणांसह तिसऱ्या आणि चौथ्या स्थानावर आहेत.



बाकी संघांची ही स्थिती


टॉप ४ नंतर अफगाणिस्तानचा संघ ८ पॉईंट्ससह -०.३३०च्या नेट रनरेटसह पाचव्या स्थानावर आहे. यानंतर पाकिस्तानचे ६ पॉईंट असून ते सहाव्या स्थानावर आहेत. श्रीलंकेचा संघ सातव्या स्थानावर तर नेदरलँड्स ४ पॉईंट्ससह आठव्या आणि बांगलादेश नवव्या तर इंग्लंड दहाव्या स्थानावर आहे.

Comments
Add Comment