Madhuri Dixit Panchak : माधुरी दीक्षितच्या 'पंचक' सिनेमात तगड्या मराठी कलाकारांची फौज!

चित्रपट ५ जानेवारी २०२४ रोजी होणार प्रदर्शित


मुंबई : बॉलिवूडची (Bollywood) धक गर्ल माधुरी दीक्षितने (Madhuri Dixit) दसऱ्यानिमित्त तिच्या आगामी मराठी चित्रपट ‘पंचक’ची (Marathi movie Panchak) घोषणा केली होती. 'बकेटलिस्ट' (Bucket List) या चित्रपटातून माधुरीने मराठी सिनेसृष्टीत पदार्पण केले होते. यानंतर ‘१५ ऑगस्ट’ या मराठी चित्रपटाची निर्मितीही तिने केली होती. आता पुन्हा एकदा माधुरी आणि तिचे पती श्रीराम नेने (Shriram Nene) आपल्या ‘पंचक’ या आगामी चित्रपटासोबत मराठी प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यास सज्ज आहेत.

माधुरी दीक्षित आणि श्रीराम नेने यांनी ‘पंचक’ या चित्रपटाची निर्मिती केली आहे. एक खास व्हीडिओ शेअर करून या जोडप्याने त्यांच्या या आगामी मराठी चित्रपटाच्या रिलीज डेटची माहिती दिली. हा चित्रपट ५ जानेवारी २०२४ रोजी रिलीज होणार आहे. दरम्यान, आता या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार्‍या मराठीतील तगड्या कलाकारांची नावं समोर आली आहेत.

माधुरी दीक्षितच्या 'पंचक' या सिनेमात अभिनेता आदिनाथ कोठारे (Adinath Kothare) आणि तेजश्री प्रधान (Tejashree Pradhan) मुख्य भूमिकेत असणार आहेत. तसेच आनंद इंगळे (Anand Ingale), नंदिता पाटकर (Nandita Patkar), विद्याधर जोशी (Vidyadhar Joshi), भारती आचरेकर (Bharati Acharekar), सतीश आळेकर (Satish Alekar), सागर तळाशीकर, दिलीप प्रभावळकर (Dilip Prabhavalkar), दीप्ती देवी (Dipti Devi), संपदा जोगळेकर (Sampada Jogalekar), आशिष कुलकर्णी हे कलाकार या सिनेमात महत्त्वाच्या भूमिकेत झळकणार आहेत. एकंदरीतच या सिनेमात प्रेक्षकांना दमदार कलाकारांचा दर्जेदार अभिनय पाहायला मिळणार आहे.

माधुरीने दसऱ्याच्या दिवशी या सिनेमाची घोषणा करत लिहिलं होतं,"दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर आम्ही 'पंचक' या मराठी सिनेमाची निर्मिती करत आहोत. जयंत जठार आणि राहुल आवटे हा सिनेमा दिग्दर्शित करत असून आमची ही दुसरी निर्मिती आहे. एका अविस्मरणीय सिनेमॅटिक अनुभवासाठी सज्ज व्हा. ५ जानेवारी २०२४ रोजी हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे."



माधुरी दीक्षित आणि श्रीराम नेने यांनी ‘१५ ऑगस्ट’ या मराठी चित्रपटाची निर्मिती केली होती. त्यांनी निर्मित केलेला तो पहिला मराठी चित्रपट होता. आता त्यांच्या ‘पंचक’ या चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. माधुरीची ‘द फेम गेम’ ही वेबसीरिज काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीस आली होती. या सीरिजमध्ये माधुरीसोबत संजय कपूर, मानव कौल, सुहासिनी मुले, लक्ष्यवीर सरन या कलाकारांनी प्रमुख भूमिका साकारली होती.
Comments
Add Comment

स्व. मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर रंग फेकणाऱ्या आरोपीला पोलिसांनी केली अटक

मुंबई: हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पत्नी स्व. मीनाताई ठाकरे यांच्या दादर येथील

'वन राणी' टॉय ट्रेन पुन्हा सुरू होणार

मुंबई: चार वर्षांच्या खंडानंतर, संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील मिनी टॉय ट्रेन "वन राणी" सप्टेंबरच्या अखेरीस

फडणवीस सरकारचा विद्यार्थ्यांना दिलासा देणारा निर्णय

मुंबई : राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्ष व तंत्रशिक्षण संचालनालयामार्फत व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेश

मुंबई मेट्रो स्टेशनवर आता तुमचा व्यवसाय सुरू करा! काय आहे ही योजना?

मुंबई: मुंबईतील उद्योजक, स्टार्टअप्स आणि व्यावसायिकांसाठी एक मोठी संधी उपलब्ध झाली आहे. महा मुंबई मेट्रोने (MMMOCl)

नगरपरिषदा आणि नगरपंचायतीच्या प्रशासकीय इमारतींसाठी लागू झाले हे बंधन

मुंबई : राज्यातील नगरपरिषदा तसेच नगरपंचायतींच्या प्रशासकीय इमारती आता शासनाने तयार केलेल्या नमुना नकाशानुसारच

पर्यटनाला चालना देण्यासाठी या ठिकाणी जॉय मिनी ट्रेन सुरू करणार

मुंबई : राज्यातील महत्त्वाच्या पर्यटनस्थळांच्या ठिकाणी पर्यटन उपक्रमांना चालना देण्यासाठी शासन प्रयत्न करत