Elvish Yadav Reply : एल्विश यादव म्हणतो, 'तो मी नव्हेच'!

  99

गुन्हा दाखल झाल्यानतंर एल्विश सोशल मीडियावर व्यक्त झाला...


नोएडा : बिग बॉस ओटीटी २चा (Bigg Boss OTT 2) विजेता एल्विश यादववर (Elvish Yadav) ड्रग्ज पार्ट्यांमध्ये (Drugs parties) विषारी सापांचं विष पुरवल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. क्लब आणि पार्ट्यांमध्ये स्नेक बाईट (Snake Bite) देण्यासह अनेक गंभीर आरोप करत एल्विशविरोधात नोएडामध्ये (Noida) एफआयआर (FIR) दाखल करण्यात आला आहे. एल्विशसह पाच आरोपींवर गुन्हा दाखल करुन त्यांना अटक करण्यात आली. मात्र, एल्विश पोलिसांच्या हाती लागला नाही.


मनेका गांधी यांच्या पीपल फॉर अॅनिमल वेलफेयर या संस्थेने स्टिंग ऑपरेशन करत नोएडा पोलिसांकडे तक्रार केली व एल्विशवर गंभीर आरोप केले होते. ऑफिसर पदावर काम करत असलेल्या गौरव गुप्ता यांनी एफआयआर दाखल केली होती. यानुसार पोलिसांनी नोएडाच्या सेक्टर ४९ मध्ये एका पार्टीवर छापा टाकून कोब्रा सापाबरोबर सापाचे विषही जप्त केले. या प्रकरणातील मुख्य आरोपी एल्विशच असल्याचे एफआयआरमध्ये नमूद करण्यात आले होते.


दरम्यान, या प्रकरणी एल्विशने सोशल मीडियावर आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे. त्याचा हा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. आपला या प्रकरणाशी काहीही संबंध नसल्याचं तो या व्हिडीओमध्ये म्हणाला आहे. त्याने म्हटले आहे, मी आज सकाळी उठल्यावर पाहिलं की, माझ्याबाबत कशा प्रकारच्या बातम्या पसरत आहेत आणि काय आरोप होत आहेत की एल्विशने नशिल्या पदार्थांची विक्री केली आहे, एल्विशला अटक झाली आहे वगैरे वगैरे. पण माझ्यावर करण्यात आलेले सगळे आरोप निराधार आहेत, खोटे आहेत. यात एक टक्काही सत्यता नाही, असं तो म्हणाला.


पुढे त्याने म्हटले आहे की, मी यूपी पोलिसांना पूर्ण सहकार्य करण्यास तयार आहे. तसंच मी पोलीस, प्रशासन, माननीय मुख्यमंत्री योगी आदित्यनाथजी या सगळ्यांना एक विनंती करु इच्छितो की या प्रकरणात माझा एक टक्का जरी सहभाग आढळला तर मी सगळी जबाबदारी घ्यायला तयार आहे आणि मी मीडियाला विनंती करतो की, त्यांना जोपर्यत ठोस पुरावा मिळत नाही तोपर्यत माझी बदनामी करु नये. या आरोपांशी माझं काही देणंघेणं नाही, असं एल्विशने या व्हिडीओत स्पष्ट केलं आहे. त्यामुळे या प्रकरणाला आता काय नवं वळण मिळणार हे पाहावं लागणार आहे.




Comments
Add Comment

भारताच्या स्वदेशी हवाई संरक्षण यंत्रणांची यशस्वी चाचणी

नवी दिल्ली : डीआरडीओने भारताच्या एकात्मिक हवाई संरक्षण यंत्रणेसाठी शुक्रवारी २३ ऑगस्ट रोजी यशस्वी चाचण्या

भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात २१ वर्षीय विद्यार्थीनी जखमी

लखनऊ : भटक्या कुत्र्यांचा हल्ला सध्या चर्चेत असून भटक्या कुत्र्यांच्या जीवघेण्या हल्ल्याच्या बातम्या अजूनही

ऐन सणासुदीच्या काळात सर्वसामान्यांना महागाईचा फटका, डाळी, रवा, मैदा, खाद्यतेल, साखरेचे भाव वधारले

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : गणेश चतुर्थीला ३, ४ दिवस बाकी असून या सणादरम्यान लागणाऱ्या

भारतीय जनता पक्षाच्या नव्या राष्ट्रीय अध्यक्षाचा शोध सुरुच

पदासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघात विचारमंथन सुरू नवी दिल्ली : भारतीय जनता पक्षाच्या नव्या राष्ट्रीय

टोल कर्मचाऱ्यांची दादागिरी... ऑपरेशन सिंदूरमध्ये सहभागी असलेल्या जवानाला मारहाण केल्याप्रकरणी NHAI ची मोठी कारवाई

मेरठ: ऑपरेशन सिंदूरमध्ये सहभागी असलेल्या जवानावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी NHAI ने मोठी कारवाई केली असून संबंधित

कर्नाटकचे काँग्रेस आमदार के. सी. वीरेंद्र यांना ईडीकडून अटक

छापेमारीत आढळले १२ कोटी रुपये, ६ कोटींचे सोने गंगटोक : कर्नाटक काँग्रेसचे आमदार के. सी. वीरेंद्र यांना सक्तवसुली