मुंबई: भारताने श्रीलंकेच्या संघाला विश्वचषक २०२३मधील ३३व्या सामन्यात खूपच वाईट पद्धतीने हरवले. टीम इंडियाने मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर ३०२ धावांनी विजय मिळवला. भारताच्या फलंदाजांसोबत गोलंदाजांनीही या सामन्यात जबरदस्त कामगिरी केली. टीम इंडियाचा खेळाडू शुभमन गिलने सामन्यानंतर प्रतिक्रिया दिली आहे.
शुभमन गिल सामन्यानंतर म्हणाला. मी नर्व्हस नाही आहे. मी सुरूवात माझ्या हिशेबाने करतो. डेंग्यूमुळे माझे वजन ४ किलोनी कमी झाले. मी पूर्णपणे फिट नाही. आपल्या खेळीबद्दल सांगताना गिल म्हणाला, मी गोलंदाजांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला होता. गेले सामने सोडले तर सर्वच सामन्यात चांगली सुरूवात मिळाली होती. आज काही बॉल सीम करत होते मी ते हिट केले. आम्ही चांगला परफॉर्म करून ३५० धावा केल्या.
भारताने श्रीलंकेविरुद्ध पहिल्यांदा गोलंदाजी करताना ८ बाद ३५७ धावा केल्या. यात शुभमन गिलने ९२ धावांची शानदार खेळी केली. शुभमनने ९२ बॉलचा सामना करताना ११ चौकार आणि २ षटकार लगावले. विराट कोहलीने ९४ बॉलमध्ये ८८ धावा केल्या.
कोहली आणि शुभमन यांच्या मोठी भागीदारी रचली गेली. अय्यरनेही ८२ धावा ठोकल्या. यात त्याने ६ षटकार आणि ३ चौकार ठोकले. रवींद्र जडेजाने ३५ धावांचे योगदान दिले.
प्रा. नंदकुमार काकिर्डे मोदी सरकारने सुरू केलेल्या काही योजना देशातील सर्वसामान्यांपर्यंत चांगल्या रीतीने पोहोचल्या असून…
उमेश कुलकर्णी जागतिक व्यापार संघटनेला ट्रम्प यांच्या टॅरिफ राजवटीने एक मोठा झटका दिला आहे. त्याविरोधात…
डॉ. सर्वेश सुहास सोमण, samrajyainvestments@gmail.com शेअर बाजारात दीर्घकालीन गुंतवणूक ही नेहमीच फायद्याची ठरत आलेली आहे.…
महेश देशपांडे सरत्या आठवड्यामध्ये ऑटो जगताच्या दृष्टीने काही महत्त्वाच्या बातम्या समोर आल्या. पहिली म्हणजे ग्रामीण…
- अल्पेश म्हात्रे, मुंबई डॉट कॉम मुंबईची दुसरी लाईफ लाईन असलेल्या बेस्ट उपक्रमाबद्दल गेले महिनाभर…
- सुनील जावडेकर सत्ताकारणाला समाजकारणाची जोड दिली तर एखादा राजकीय नेता त्याच्या आयुष्यात काय चमत्कार…