Car loan : कॅप्री ग्लोबलतर्फे १०,००० कोटींचे कार लोन्स वितरणाचे ध्येय

  138

मुंबई : कॅप्री ग्लोबल कॅपिटल लिमिटेड Capri Global Capital Limited (CGCL) या नॉन-बँकिंग वित्तीय कंपनीने ऑक्टोबर २३ मध्ये १००० कोटी रुपयांची कर्जे वितरित केली. कारसाठी घेतल्या जाणाऱ्या कर्जांच्या वितरणात (Car loan) लक्षणीय वाढ झाल्याचे कंपनीने नमूद केले आहे. कंपनीने आर्थिक वर्ष २३-२४ मध्ये १०,००० कोटी रुपयांची कर्जे वितरित करण्याचे लक्ष्य सीजीसीएलने ठेवले आहे. कामकाज सुरू केल्यानंतर ३० महिन्यांच्या आतच कार कर्ज वितरणाच्या व्यवसायाचा आवाका चांगलाच वाढला आहे. भारतातील ३२ राज्ये व केंद्रशासित प्रदेशांतील ७२२ ठिकाणांहून कर्जे वितरित केली जात आहे.


कॅप्री ग्लोबल कॅपिटलचे व्यवस्थापकीय संचालक राजेश शर्मा ह्या यशाबद्दल म्हणाले, "FY24च्या दुसऱ्या तिमाहीतील (Q2) आकडेवारीनुसार, आमचा कार कर्जाचा एकत्रित व्यवसाय 4500 कोटींवर पोहचला आहे. आम्ही 13000 कोटी रुपयांची कार कर्जे वितरित केली आहेत. कार कर्जांना असलेली मागणी, विशेषत: मध्यम विभागातील एसयूव्हींच्या खरेदीसाठी होत असलेली मागणी, वाढत आहे. ही वाढ विशेषत्वाने श्रेणी 2 व श्रेणी 3 शहरांमध्ये दिसून येत आहे. समावेशक कर्जवितरण पद्धतींप्रती कंपनीने दाखवलेल्या बांधिलकीची परिणती ग्राहकांच्या विस्तृत श्रेणींमध्ये झाली आहे. अगदी प्रारंभिक स्तरावरील गाड्यांपासून ते प्रीमियम गाड्यांपर्यंत सर्व प्रकारच्या गाड्यांसाठी कर्जे घेतली जात आहेत. आम्ही ह्या बाजारपेठांमधील आमचे शाखांचे जाळे व मनुष्यबळ 50 टक्क्यांहून अधिक वाढवले आहे. सध्या 1800 कर्मचारी आमच्या ग्राहकांना अपवादात्मक दर्जाची कार कर्ज सेवा देत आहेत. बँका व त्यांच्या ग्राहकांसाठी कार कर्जांच्या क्षेत्रातील विश्वासाचा सहयोगी म्हणून असलेले आमचे वादातीत आघाडीचे स्थान नुकत्याच मिळालेल्या यशामुळे अधिक भक्कम झाले आहे. तुलनेने अल्पकाळात हा लक्षणीय टप्पा गाठला जाणे ही उत्कृष्टतेप्रती राखलेल्या बांधिलकीला तसेच बाजारातील उत्क्रांत होत जाणाऱ्या मागणीशी जुळवून घेण्याच्या आमच्या क्षमतेला मिळालेली पावती आहे."


आपल्या सेवांचा विस्तार करण्याप्रती सीजीसीएलने दाखवलेली बांधिलकी अनेक सहयोगांमध्ये महत्त्वाची ठरली आहे. ह्या सहयोगांमध्ये, बँक ऑफ बरोडा, युनियन बँक ऑफ इंडिया, इंडियन बँक, बँक ऑफ इंडिया, एचडीएफसी बँक, इंडियन ओव्हरसीज बँक, पंजाब अँड सिंध बँक व येस बँक ह्या आठ आघाडीच्या व्यावसायिक बँकांशी झालेल्या सहयोगांचा समावेश आहे. ह्या सहोयगांमुळे सीजीसीएलचे बाजारपेठेतील स्थान तर भक्कम झालेच आहेत, शिवाय, अधिक व्यापक ग्राहकवर्गासाठी कार कर्जांची उपलब्धता वाढली आहे.

Comments
Add Comment

Gold Rate: पाच दिवसांच्या विश्रांतीनंतर जीएसटी कपातीसह सोन्यातही घसरण !

मोहित सोमण: आज सोन्याच्या निर्देशांकात अखेर घसरण झाली आहे. सलग पाच दिवस सोन्यात तेजी दिसल्याने बाजारात सोने

Stock Market: अखेरच्या सत्रात बाजारात 'धक्का' तरीही सेन्सेक्स १५०.३० व निफ्टीत १९.२५ अंकांने वाढ

मोहित सोमण:आज इक्विटी बेंचमार्क निर्देशांकाची अखेर वाढीत झाली आहे. जीएसटी काऊन्सिलची बैठक काल आणि आज या दोन

IIM मुंबई NIRF मॅनेजमेंट रँकिंगमध्ये सहावा क्रमांक राखण्यात यशस्वी

मुंबई:इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट मुंबई (IMM) ने नॅशनल इन्स्टिट्यूशनल रँकिंग फ्रेमवर्क (NIRF) २०२५ च्या

itel A90 लिमिटेड एडिशन लाँच मिलिटरी ग्रेड प्रोटेक्शनसह ७००० रूपयांत लाँच

MIL STD 810H - सह मिलिटरी-ग्रेड टफनेस आणि धूळ, पाणी आणि थेंब प्रतिरोधकतेचे 3P कंपनीकडून आश्वासन परवडणाऱ्या किमतीत

GST कपातीनंतर भविष्यात मजबूत परताव्यासाठी हे सिमेंट शेअर खरेदी करा! 'या' टार्गेट प्राईजसह

Choice Equity Broking कंपनीचा अहवाल मोहित सोमण:जीएसटी कपातीच्या पार्श्वभूमीवर आता गुंतवणूकदारांना चांगला परतावा बाजारात

जीएसटी कपात होताच Auto FMCG Consumers Durable शेअर्समध्ये मागणीचा पाऊस

मोहित सोमण: जीएसटी २.० कपातीच्या घोषणेनंतर आज शेअर बाजारात मोठ्या प्रमाणात ऑटो व एफएमसीजी कंज्यूमर ड्युरेबल्स