Elvish Yadav FIR : बिग बॉस विजेता एल्विश यादव ड्रग्ज पार्ट्यांमध्ये द्यायचा सापांचं विष...

  106

पाच कोब्रा साप आणि काय काय... छापेमारीत जे सापडलं ते ऐकून तुम्हीही थक्क व्हाल!


नोएडा : बिग बॉस ओटीटी २चा (Bigg Boss OTT 2) विजेता एल्विश यादव (Elvish Yadav) अडचणीत आला आहे. ड्रग्ज पार्ट्यांमध्ये (Drugs parties) विषारी सापांचं विष पुरवल्याचा त्याच्यावर आरोप आहे. क्लब आणि पार्ट्यांमध्ये स्नेक बाईट (Snake Bite) देण्यासह अनेक गंभीर आरोप करत एल्विशविरोधात नोएडामध्ये (Noida) एफआयआर (FIR) दाखल करण्यात आला आहे. एल्विशसह पाच आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या पाचही आरोपींना अटक करण्यात आली असून एल्विश यादव मात्र फरार आहे.


पीएफए टीमने (PFA Team) नोएडाच्या सेक्टर ४९ मध्ये एका पार्टीवर छापा टाकून कोब्रा सापाबरोबर सापाचे विषही जप्त केले. पोलिसांनी नोंदवलेल्या एफआयआरमध्ये, या प्रकरणातील मुख्य आरोपी बिग बॉस ओटीटी २ विजेता एल्विश यादव असल्याचे म्हटले जात आहे. एल्विशनेच ही नोएडा आणि एनसीआरमध्ये हायप्रोफाईल स्नेक बाईट पार्टी आयोजित केल्याचा आरोप आहे. या प्रकरणात बँक्वेट हॉलमधून राहुल, टिटूनाथ, जयकरण, नारायण आणि रविनाथ या ५ आरोपींना अटक करण्यात आली आहे.


पीएफए संस्थेला माहिती मिळाली होती की, एल्विश यादव ड्रग्ज पार्ट्यांमध्ये विषारी सापांचं विष पुरवतो. विषारी सापांचे व्हिडीओ शूट करतो. पुढे पोलिसांनी सांगितले की, "एका माहितीदाराने एल्विशसोबत संपर्क साधला असता त्याने एजंट राहुलचा नंबर दिला होता. त्यानंतर माहिती देणाऱ्याने राहुलला पार्टी आयोजित करण्यास सांगितले. या पार्टीमध्येच पोलिसांनी छापा टाकून पाच आरोपींना अटक केली आहे. आता याप्रकरणी एल्विश यादवसह पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.



काय सापडलं छापेमारीत?


मिळालेल्या माहितीनुसार एका एनजीओने स्टिंग ऑपरेशन करत नोएडा पोलिसांकडे तक्रार केली होती. पीपल फॉर अॅनिमल वेलफेयर ऑफिसर पदावर काम करत असलेल्या गौरव गुप्ता यांनी ही एफआयआर दाखल केली होती. गौरव गुप्ता यांना असे प्रकार सुरू असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी केलेल्या छापेमारीत सापाचे विष, पाच कोब्रा, एक अजगर आणि दोन तोंड असलेला एक साप, एक घोडा पछाड साप आढळला आहे.

Comments
Add Comment

Amarnath Yatra 2025: अमरनाथ यात्रेबद्दल सरकारचा मोठा निर्णय, एक आठवड्याआधीच यात्रा थांबवली! 'हे' आहे कारण

खराब हवामान आणि यात्रा मार्गांची बिघडलेली अवस्था जबाबदार श्रीनगर : वार्षिक अमरनाथ यात्रा आज (दिनांक ३ )

देवाला भेटण्यासाठी ५ व्या मजल्यावरून मारली उडी, महिलेची आत्महत्या

हैदराबाद: तेलंगणाची राजधानी हैदराबादमध्ये एका धक्कादायक घटनेने खळबळ उडाली आहे. हिमायतनगर येथील ४३ वर्षीय पूजा

Operation Akhal: जम्मू-काश्मीरमधील कुलगाममध्ये ३ दिवसांपासून चकमक सुरू, आतापर्यंत ३ दहशतवादी ठार; २ दहशतवाद्यांना घेराव

कुलगाम: जम्मू-काश्मीरमधील कुलगाममध्ये ३ दिवसांपासून लष्कराचे ऑपरेशन अखल सुरू आहे. याद्वारे एके-४७ रायफल, एके

लष्करी अधिकाऱ्याकडून स्पाइसजेटच्या कर्मचाऱ्यांना लाथा-बुक्क्यांनी मारहाण, श्रीनगर विमानतळावर नेमके घडले काय?

एका कर्मचाऱ्याच्या पाठीच्या कण्याला फ्रॅक्चर आणि जबड्याला गंभीर दुखापत श्रीनगर: जम्मू काश्मीरमधील श्रीनगर

‘इस्राो’ची मंगळ तयारी

नवी दिल्ली : ३१ जुलै रोजी इस्रोने लडाखच्या त्सो कार या दुर्गम आणि मंगळ ग्रहासारख्या भासणाऱ्या प्रदेशात आपल्या

सैन्याच्या शौर्याचा काँग्रेसकडून सतत अपमान

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाराणसीत आरोप वाराणसी  : ऑपरेशन सिंदूर पूर्णपणे यशस्वी झाले आहे, पहलगामचे