pollution: दिल्लीनंतर मुंबईच्या हवेतही बिघाड!

  88

प्रदूषणावर नियंत्रण मिळवण्यासाठी पालिकेकडून कठोर नियमावली जाहीर


मुंबई : मुंबईत वाढणारे हवेचे प्रदूषण रोखण्यासाठी पालिकेकडून कठोर नियमावली जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे हिवाळ्यात शेकोटी पेटवण्यावरही बंदी घातली जाणार आहे. याबाबत लवकरच सुधारित नियमावली जाहीर करण्यात येईल. मागील 24 तासात दिल्लीप्रमाणेच मुंबईतील काही भागातील हवेची गुणवत्ता बिघडल्याचं चित्र आहे. सोबतच, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रातील भागात देखील वायु प्रदूषणात भर पडली आहे. यामुळे दिवाळी, दसरा आणि फटाके विसरा, असं म्हणण्याची वेळ मुंबईवर आली आहे.


वाढत्या प्रदूषणामुळे मुंबईतील हवेची गुणवत्ता बिघडली असून त्याचा आरोग्यावर देखील परिणाम दिसू लागला आहे. राज्य सरकार आणि पालिकेकडून मार्गदर्शक नियमावली काढण्यात आली होती. मात्र, नियमावली धाब्यावर बसवल्या जात असल्याचे चित्र सर्वत्र दिसत आहे. अशातच, मुंबईत शेकोटीवर देखील बंदी घालण्यात आली असून पालिकेकडून प्रदूषणासंदर्भात कठोर पाऊलं उचलण्यात येणार आहेत. तसेच त्यासाठी सुधारित नियमावली जाहीर केली जाणार आहे.


मुंबईत बांधकाम सुरु असलेल्या ठिकाणी 15 दिवसांत स्प्रिंक्लर आणि महिनाभरात स्मॉग गन लावण्याचे आदेश पालिकेकडून देण्यात आले आहेत. जर या नियमांचं पालन केलं नाही तर जागच्या जागी 'स्टॉप वर्क' नोटीस देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच रस्त्यावर राहणाऱ्या बेघरांना हिवाळ्यात सुविधा देण्याचे प्रयत्न करण्यात येतील. एक एकर किंवा त्यापेक्षा अधिक क्षेत्रात बांधकाम असलेल्या जागेच्या अवतीभोवती किमान 35 फूट उंचीचे लोखंडी / पत्र्यांचे आच्छादन असावे. त्याशिवाय, संपूर्ण बांधकाम क्षेत्र ज्यूट किंवा हिरव्या कपड्याने झाकलेले असावे.


धूळ उडू नये यासाठी दिवसातून किमान 4-5 वेळा पाण्याची फवारणी करावी. रस्त्यांवरील धुळीचे प्रमाण कमी करण्यासाठी ॲण्टी स्मॉग मशीन लावाव्या लागतील. प्रत्येक बांधकामाच्या ठिकाणी स्वतंत्र वायू गुणवत्ता निर्देशांक मोजणारी यंत्रणा बसवावी. सर्व 24 वॉर्डमध्ये सहाय्यक आयुक्तांच्या निर्देशानुसार दोन वॉर्ड अभियंता, एक पोलीस, एक मार्शल आणि एक वाहन अशा स्कॉडच्या माध्यमातून गस्त घालण्यात येईल. यात नियम मोडल्याचे दिसल्यास रोख दंडात्मक कारवाई करण्यात येईल. तसेच कामबंद नोटीस देखील बजावण्यात येईल. त्यामुळे आता बांधकाम व्यावसायिकांना योग्य काळजी घेण्याची आणि नियम पाळण्याची गरज निर्माण झाली आहे. तसेच उघड्यावर कचरा जाळणे, तसेच शेकोट्या पेटवण्यास देखील बंदी घातली जाणार आहे.


दरम्यान, मुंबईसोबतच विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रातील देखील हवा बिघडली आहे. विदर्भातील काही जिल्हे आणि उत्तर महाराष्ट्रातील काही जिल्ह्यातील हवा गुणवत्ता पातळी वाईट श्रेणीत गेले आहेत. दिवाळी काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. अशात, ही परिस्थिती आणखी वाईट होण्याची स्थिती नाकारता येत नाही.


हिवाळ्यात सोसायट्यांमध्ये काम करणारे सुरक्षा रक्षक, बांधकामाच्या ठिकाणी राहणाऱ्या कामगारांकडून शेकोट्या पेटवल्या जातात. त्यामुळे मोठ्या प्रमाणात धूर निर्माण झाल्याने प्रदूषण वाढते. मुंबईत 2019 ते 2023 या कालावधीत ऑक्टोबरमधील प्रदुषण पातळीमध्ये सातत्याने वाढ झाली आहे. जे हवेच्या गुणवत्तेत लक्षणीय घट दाखवत आहेत. गेल्या महिन्यात ऑक्टोबरच्या तुलनेत मुंबईतील हवेच्या प्रदूषणात 42 टक्क्यांनी वाढ झाली आहे.

Comments
Add Comment

खड्डा विरहित मंडप उभारण्याची अट कायम, पालिकेने सूचवले आधुनिक तंत्रज्ञान

मुंबई (प्रतिनिधी): गणेशोत्सव मंडळांनी मंडपासाठी खणलेल्या खड्ड्यांवरील वाढीव दंड आकारण्याचा निर्णय मुंबई

शाळांमध्ये १४ ऑगस्टपासून पसायदानाचे पठण

संत ज्ञानेश्वर माउलींच्या ७५० व्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश मुंबई (प्रतिनिधी) :

ऑनलाईन लोनच्या नावाखाली तरुणीची फसवणूक, अश्लील फोटो केले व्हायरल

मुंबई : मुंबईच्या जोगेश्वरी भागात राहणाऱ्या तरुणीची ऑनलाइन फसवणूक करून तिचे अश्लील फोटो नातेवाईकांना

इंडिगोची ‘हॅपी इंडिगो डे सेल’ घोषणा, देशांतर्गत प्रवास १,२१९ पासून तर आंतरराष्ट्रीय ४,३१९ पासून

मुंबई: इंडिगोने आपल्या १९ व्या वर्धापनदिनानिमित्त ‘हॅपी इंडिगो डे सेल’ची घोषणा केली आहे. प्रवाशांना केवळ ₹१,२१९

या योजनेतून दर महिन्याला मिळतील ७ हजार रूपये...पाहा काय आहे ही योजना

मुंबई: भारतीय आयुर्विमा महामंडळाने महिलांसाठी एक विशेष योजना सुरू केली आहे, 'एलआयसी विमा सखी' (LIC Bima Sakhi). ही योजना

युगेंद्र पवारांचा साखरपुडा, मुंबईत पवार कुटुंब एकत्र

मुंबई : काही दिवसांपूर्वी अजित पवार यांचे पुत्र जय पवार यांच्या पुण्यात साखरपुडा झाला. आता अजित पवार यांचे भाऊ