नवी दिल्ली : अंमलबजावणी संचलनालयाकडून आज दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची दारू घोटाळा प्रकरणात चौकशी केली जाणार आहे. ईडीने आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांना २ नोव्हेंबरला चौकशीसाठी समन्स पाठवले होते.
आज ११ वाजता त्यांना ईडीच्या कार्यालयात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. केजरीवाल यांना यासाठी समन्स बजावण्यात आले आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार तपास अधिकाऱ्यांच्या समोर हजर झाल्यानंतर तपास विभाग मुख्यमंत्र्यांचे विधान घेईल.
याआधी मुख्यमंत्र्यांना सीबीआयने एप्रिल महिन्यात चौकशीसाठी बोलावले होते.दरम्यान, आम आदमी पक्षाने यावर आक्षेप नोंदवला. आम आदमी पक्षाच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून ट्वीट करण्यात आले की आम आदमी पक्ष संपुष्टात आणणे हा केंद्र सरकारचा हेतू आहे. केंद्र सरकारला खोटी केस बनवून केजरीवाला तुरूंगात टाकायचे आहे.
सीएम केजरीवाल यांना मिळालेल्या समन्सवर दिल्लीचे मंत्री सौरभ भारद्वाज म्हणाले की केंद्र सरकारच्या ईडीने अरविंद केजरीवाल यांना २ नोव्हेंबरपर्यंत मुदत दिली आहे. याचा अर्थ स्पष्ट आहे की भाजपला आम आदमी पक्ष संपवायचा आहे.
प्रा. नंदकुमार काकिर्डे मोदी सरकारने सुरू केलेल्या काही योजना देशातील सर्वसामान्यांपर्यंत चांगल्या रीतीने पोहोचल्या असून…
उमेश कुलकर्णी जागतिक व्यापार संघटनेला ट्रम्प यांच्या टॅरिफ राजवटीने एक मोठा झटका दिला आहे. त्याविरोधात…
डॉ. सर्वेश सुहास सोमण, samrajyainvestments@gmail.com शेअर बाजारात दीर्घकालीन गुंतवणूक ही नेहमीच फायद्याची ठरत आलेली आहे.…
महेश देशपांडे सरत्या आठवड्यामध्ये ऑटो जगताच्या दृष्टीने काही महत्त्वाच्या बातम्या समोर आल्या. पहिली म्हणजे ग्रामीण…
- अल्पेश म्हात्रे, मुंबई डॉट कॉम मुंबईची दुसरी लाईफ लाईन असलेल्या बेस्ट उपक्रमाबद्दल गेले महिनाभर…
- सुनील जावडेकर सत्ताकारणाला समाजकारणाची जोड दिली तर एखादा राजकीय नेता त्याच्या आयुष्यात काय चमत्कार…