Tuesday, March 18, 2025
Homeक्रीडाWorld Cup 2023SA vs NZ: द. आफ्रिकेने न्यूझीलंडला धुतले, १९० धावांनी जिंकला सामना

SA vs NZ: द. आफ्रिकेने न्यूझीलंडला धुतले, १९० धावांनी जिंकला सामना

पुणे: आयसीसी विश्वचषक २०२३मध्ये(icc world cup 2023) द. आफ्रिकेने न्यूझीलंडला तब्बल १९० धावांनी हरवले. न्यूझीलंडसमोर विजयासाठी ३५८ धावांचे आव्हान होते. मात्र न्यूझीलंडचा संपूर्ण संघ १६७ धावांवर आटोपला. द. आफ्रिकेच्या गोलंदाजांसमोर किवीच्या फलंदाजांनी अक्षरश: लोटांगण घातले. न्यूझीलंडचे फलंदाज नियमित अंतराने बाद होते गेले. त्यामुळे त्यांना इतका मोठा पराभव सहन करावा लागला.

द. आफ्रिकेचा संघ पॉईंट्स टेबलमध्ये अव्वलस्थानी

या विजयानंतर द. आफ्रिकेचा संघ पॉईंट्स टेबलमध्ये अव्वल स्थानावर पोहोचला आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वातील भारतीय संघ आता दुसऱ्या स्थानावर घसरला आहे. द. आफ्रिकेने ७ सामन्यांत १२ पॉईंट्स मिळवले आहेत. द. आफ्रिकेच्या संघाला ६ सामन्यात विजय मिळाला. तर एका सामन्यात पराभव सहन करावा लागला. भारतीय संघाचे ६ पैकी ६ सामने जिंकल्याने त्यांचे १२ पॉईंट्स झाले आहेत. भारतीय संघाने आपले सारे सामने जिंकले आहेत. भारत आणि आफ्रिकेचे १२-१२ पॉईंट्स झाले आहेत. मात्र चांगल्या रनरेटमुळे द. आफ्रिकेचा संघ टॉपवर पोहोचला आहे.

न्यूझीलंडसमोर ३५८ धावांचे आव्हान

न्यूझीलंडविरुद्ध पहिल्यांदा फलंदाजी करण्यास उतरलेल्या आफ्रिकेच्या संघाने ५० षटकांत ४ बाद ३५७ धावा केल्या. द. आफ्रिकेच्या ३५७ धावांच्या आव्हानाला उत्तर देताना न्यूझीलंडच्या संघातील फलंदाज एकएक अंतराने बाद होते गेले. त्यांना पहिला झटका ८ धावांवर बसला. यानंतर सातत्याने त्यांचे विकेट पडत गेले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -