Loan and Finance : एसबीआय कार्ड आणि रिलायन्स रिटेल यांच्या संयुक्त प्रयत्नाने रिलायन्स एसबीआय कार्ड लॉन्च

मुंबई : एसबीआय कार्ड ही भारतातील सर्वात मोठी प्युअर-प्ले क्रेडिट कार्ड जारीकर्ता आणि भारतातील सर्वात मोठा रिटेलर, रिलायन्स रिटेल यांच्या एकत्रित प्रयत्नांतून 'रिलायन्स एसबीआय कार्ड' लॉन्च करण्यात आले. हे एक-प्रकारचे जीवनशैलीसंबंधित क्रेडिट कार्ड असून अगदी सर्वसाधारण ते प्रीमियम गटात मोडणाऱ्या ग्राहकांच्या विविध गरजांनुरूप व्यापक आणि फायद्याचा खरेदी अनुभव देते. कार्डधारकांना रिलायन्स रिटेलच्या व्यापक आणि वैविध्यपूर्ण इकोसिस्टममध्ये व्यवहार करताना रिवॉर्ड्स आणि फायदे अनलॉक करण्यास सक्षम करते, फॅशन आणि लाईफस्टाईलपासून ते किराणा, ग्राहक इलेक्ट्रॉनिक्स ते फार्मा, फर्निचर ते दागिने आणि बरेच खरेदी पर्याय कार्डवर उपलब्ध आहेत. याशिवाय, रिलायन्स एसबीआय कार्ड वापरकर्ते एसबीआय कार्डद्वारे सुरू असलेल्या विचारपूर्वक तयार करण्यात आलेल्या ऑफरचा आनंदही घेऊ शकतात.


या उद्योगक्षेत्रातील दोन प्रमुख नेतृत्वांमधील समन्वयात्मक युतीचे उद्दिष्ट एसबीआय कार्डच्या विस्तृत नेटवर्कचा फायदा घेऊन ग्राहकांपर्यंत पोहोचण्याचे आणि रिलायन्स रिटेलच्या अनन्य किरकोळ प्रस्तावाचा लाभ घेत विशेष स्वागत लाभांपासून ते विशिष्ट तयार करण्यात आलेला टेलर-मेड प्रवास आणि मनोरंजन फायद्यांपर्यंत विशेष रिवॉर्ड्सचा स्पेक्ट्रम आणण्याचे आहे, तसेच रिलायन्स रिटेल नेटवर्कवर व्यवहार करण्यासाठी नूतनीकरण शुल्क माफी आणि रिलायन्स रिटेल व्हाउचर यासारखे विशेष खर्च-आधारित वैशिष्ट्यपूर्ण लाभ मिळतील. ही भागीदारी ग्राहक अनुभव पुन्हा परिभाषित करण्यासाठी आणि भारतीय बाजारपेठेत क्रेडिट कार्ड रिवॉर्डसाठी एक नवीन मापदंड तयार करण्याची आकांक्षा बाळगते.


हे को-ब्रॅंडेड कार्ड रिलायन्स एसबीआय कार्ड आणि रिलायन्स एसबीआय कार्ड प्राइम अशा दोन प्रकारांत लॉन्च करण्यात आले आहे. प्रत्येक कार्ड हे अतिशय काळजीपूर्वक तयार केले असल्याने निरनिराळ्या ग्राहक गरजा लक्षात घेऊन विविध रिवॉर्ड आणि लाईफस्टाईल लाभ त्यावर उपलब्ध असतील.


रिलायन्स रिटेल लिमिटेडचे संचालक व्ही सुब्रमण्यम म्हणाले, "रिलायन्स रिटेलमध्ये, आम्ही आमच्या ग्राहकांचा खरेदी अनुभव दररोज अधिक आनंददायी बनवून त्यांना आनंद देण्यासाठी नेहमीच नवीन मार्ग शोधत असतो. एसबीआय कार्डसह आमचे को-ब्रँडेड क्रेडिट कार्ड हे या वचनबद्धतेच्या दिशेने उचललेले आणखी एक पाऊल आहे. आमच्यासोबत ऑनलाइन आणि सर्व स्टोअरमध्ये खरेदी करण्यासाठी रिलायन्स एसबीआय कार्ड, विविध प्रकारचे फायदे, विशेष सवलती आणि बक्षिसे ऑफर करण्यासाठी, कार्ड उद्योगातील आघाडीवर असलेल्या एसबीआय कार्डसोबत भागीदारी करण्यास आम्ही उत्सुक आहोत. एसबीआय कार्डसह, आम्ही अपेक्षांना खरे उतरण्याची तसेच आमच्या ग्राहकांना आनंदी ठेवण्याची आशा करतो.”


एसबीआय कार्डचे एमडी आणि सीईओ अभिजित चक्रवर्ती म्हणाले, “आम्हाला रिलायन्स रिटेलसोबत भागीदारी करताना आनंद होत आहे. त्यामुळे भारताच्या संघटित रिटेलची व्याख्या नव्याने रचायला मदत झाली. ही भागीदारी ग्राहक-केंद्रिततेवर भर देत आमचे सामायिक लक्ष आणि जागतिक दर्जाचा ग्राहक अनुभव प्रदान करण्याच्या वचनबद्धतेचा परिणाम आहे. एसबीआय कार्डमध्ये, आम्ही आमच्या ग्राहकांना त्यांच्या जीवनशैलीच्या गरजा पूर्ण करताना मजबूत मूल्य देणारी उत्पादने वितरीत करण्यावर नेहमीच विश्वास ठेवला आहे. रिलायन्स एसबीआय कार्ड हे एक सर्वसमावेशक उत्पादन म्हणून विकसीत झाले असून ते प्रमुख ग्राहक विभागांसाठी उपयुक्त आहे. आमच्या मजबूत को-ब्रँड पोर्टफोलिओमध्ये समाविष्ट झालेला हा एक शक्तिशाली पर्याय आहे आणि उपलब्ध वैश्विक वापर मार्गांमुळे हे लोकप्रिय क्रेडिट कार्ड बनेल अशी आमची अपेक्षा आहे.”


रिलायन्स एसबीआय कार्ड PRIME चे वार्षिक नूतनीकरण शुल्क ₹ 2,999 + लागू कर आणि रिलायन्स एसबीआय कार्डचे ₹ 499 + लागू कर याप्रमाणे आहे. रिलायन्स एसबीआय कार्ड PRIME वर ₹ 3,00,000 चा वार्षिक खर्च आणि रिलायन्स SBI कार्ड वर ₹ 1,00,000 चा खर्चाचा टप्पा गाठल्यावर कार्डधारक नूतनीकरण शुल्क माफीचा लाभ घेऊ शकतात. हे कार्ड पुनर्चक्रण केलेल्या प्लास्टिकने बनलेले आहे आणि RuPay प्लॅटफॉर्मवर सादर करण्यात आले आहे.


रिलायन्स रिटेलकडे एकाच ठिकाणी कंझमशन बास्केटमध्ये स्टोअर्स आणि डिजिटल कॉमर्स प्लॅटफॉर्मचा वैविध्यपूर्ण पोर्टफोलिओ आहे. प्रमुख किरकोळ ब्रँड्समध्ये रिलायन्स स्मार्ट, स्मार्ट बाजार, रिलायन्स फ्रेश सिग्नेचर, रिलायन्स डिजिटल, रिलायन्स ट्रेंड्स, जिओमार्ट, आजिओ, रिलायन्स ज्वेल्स, अर्बन लॅडर, नेटमेडस् आणि बरेच काही समाविष्ट आहे.

Comments
Add Comment

Gold Silver Rate Today: आज दोन दिवसांच्या ब्रेकनंतर सोन्यात प्रति ग्रॅम १७ रूपयांनी वाढ प्रति किलो चांदीत थेट २००० रूपयांची वाढ 'या' कारणांमुळे जाणून घ्या आजचे दर

मोहित सोमण:दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर सोन्याने आज पुन्हा एकदा वेग धरला आहे. आज सोने जागतिक अस्थिरतेच्या

Tata Consumer Products Q2FY26 Results: टाटा कंज्यूमर प्रॉडक्टचा सुस्साट निकाल ११% निव्वळ नफा वाढत फंडामेंटलमध्येही सुधारणा

मोहित सोमण:टाटा कंज्यूमर प्रॉडक्ट (Tata Consumer Products) या टाटा समुहाच्या फ्लॅगशिप कंपन्यांचे तिमाही निकाल जाहीर झाले. टाटा

शेअर बाजारात सकाळी घसरण संध्याकाळपर्यंत वाढ! भूराजकीय अस्थिरतेवर घरगुती गुंतवणूकदार भारी ! रिअल्टी, बँक तेजीसह सेन्सेक्स ३९.७८ व निफ्टी ४१.२५ अंकांने उसळला जाणून घ्या सविस्तर विश्लेषण

मोहित सोमण: आज आठवड्यातील पहिल्या दिवशी शेअर बाजारात वाढ नोंदवली गेली आहे. अस्थिरतेच्या काळातही मजबूत

Studds Accesories Limited IPO Day 3: बिडींग आज संपुष्टात तिसऱ्या दिवशीही जबरदस्त मागणी कायम ! एकूण सबस्क्रिप्शन ४१.३७ पटीवर पोहोचले

मोहित सोमण:स्टड्स अँक्सेसरीज लिमिटेड (Studds Accesories Limited) आयपीओ बिडींगचा अखेरचा दिवस आज संपुष्टात आला आहे. एकूण ४५५.४९

HSBC PMI Index: सलग बाराव्या महिन्यात वाढती रोजगारी भारताची उत्पादन निर्मिती क्षमता नव्या क्षितीजावर! एस अँड पी ग्लोबलची PMI आकडेवारी जाहीर!

प्रतिनिधी: मोठी वाढलेली, वाढलेले औद्योगिक उत्पादन, व वाढलेल्या उपभोगाच्या आधारे औद्योगिक उत्पादन क्षेत्रात

निर्यातदारांना निश्चिंत करण्यासाठी पंतप्रधान मोदीचे धोरणात्मक पाऊल आज व्यापाऱ्यांना भेटणार

नवी दिल्ली: प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, लवकरच निर्यातदारांच्या मते, पंतप्रधान नरेंद्र मोदी आज